कोबी

कोबीवरील जाळी विणणाऱ्या अळ्या

Hellula undalis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • कोबीच्या पानांवर मोठ्या प्रमाणात जाळी आणि विष्ठा दिसते.
  • शेंड्याकडील फुटवे नष्ट होतात.
  • पाने छोट्या गुच्छाने असतात.
  • प्रौढ पतंग राखाडीसर तपकिरी असुन त्यावर नागमोडी रेषा असतात.
  • मुख्य दांड्याच्या बाजुन पोखरलेल्या बोगद्याच्या मुखावर विष्ठा जमा होते.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
कोबी
फुलकोबी

कोबी

लक्षणे

सुरवंट कोवळ्या रोपांचा नाश करतात. छोटे सुरवंट पानात खणतात व खोडाला, पानांना आणि शिरांना पोखरतात. ते पानांना बाहेरुन खातात. अळ्या कोबीत पोखरुन झाडाच्या मध्यापर्यंत पोचुन मुख्य फुटव्यांचाच नाश करतात ज्यामुळे कोबी लागत नाही. कोबीच्या जुन्या झाडात, नविन फुटवे येतात आणि हल्ला केलेल्या झाडांना अनेक लहान कोबी लागतात ज्यांना काहीच बाजारमूल्य नसते. सुरवंटाच्या कोबी खाण्यामुळे वाढ खुंटते. ते खाताना रेशमी नळ्या बनवितात. झाडांची मर होते व प्रभावित झाडाच्या भागातुन विष्ठा बाहेर येते. मुख्य फुटव्याला नुकसान झाल्यामुळे संक्रमित झाडांना बहुधा पानांचे अनेक लहान गुच्छ लागतात आणि बाजुने फांद्या विकसित होतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

परजीवी वॅस्पस जसे कि ब्रॅकोनिड, इक्न्युमोनिड आणि चालसिडॉइड वॅस्पस वापरा. बॅसिलस थुरिंगिएनसिसची शिफारस केली जाते आणि अळ्या त्यांच्या संरक्षक रेशमी कोशात जाण्यापूर्वी आणि त्या कोबीच्या मध्यापर्यंत पोचण्यापूर्वीच वापर करावा. नीमचा वापर दर अठवड्याला केला असताही प्रभावी ठरतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. आपल्या झाडांना कीटकांपासून बचाव करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करणे कठीण आहे कारण त्यांचे संरक्षण जाळ्यांनी होते किंवा ते पिकांच्या आत शिरलेले असतात. अॅसेफेट आणि परमेथ्रिनचा वापर ८-१० दिवसांच्या अंतराने करावा. कार्बामेटस आणि ऑर्गनो-फॉस्फेटसचा पतंग दिसताक्षणीच झाडांवर वापर केल्याने पतंगांचे नियंत्रण झाले आहे.

कशामुळे झाले

हेलुला अंडालिस च्या सुरवंटांनी ब्रासिका कुटुंबातील (कोबी, फुलकोबी) पिकांना खाल्ल्यामुळे लक्षणे उद्भवतात, जे उष्णकटिबंधीय आणि उपउष्णकटिबंधीयातील अग्रणी आहेत. अंडी अंडाकृति असतात आणि एकेकटी किंवा पुंजक्याने तसेच काही वेळा साखळीनेही घातली जातात. सुमारे तीन दिवसांनी अंडी ऊबतात आणि पाच विकसन टप्प्यांतुन जाऊन अळ्या मोठ्या होताना राखाडीसर पिवळ्या असतात आणि त्यांवर गुलाबीसर लांब पट्टे असतात. सुरवंट फिकट पांढरे असुन फिकट गुलाबीसर तपकिरी पट्टे शरीरावर असतात आणि डोका काळा असतो. प्रौढ सुरवंटांवर फिकट पट्टे असतात. अखेरच्या टप्प्यावर सुरवंट १२-१५ मि.मी. लांबीचे असुन रेशमी कोषाच्या आतुन खातात. पुढचे पंख बहुधा राखाडीसर तपकिरी असुन त्यावर नागमोडी रेषा आणि काळे डाग असतात. प्रौढ पतंग राखाडीसर तपकिरी असुन छोटे आणि खर तर नाजुक असतात. त्यांच्या पंखांचा विस्तार १८ मि.मी. पर्यंत असु शकतो. ऊबुन बाहेर येऊन संभोगानंतर, माद्या सुमारे १५० किंवा जास्त अंडी पुढच्या ३-१० दिवसात घालतात. प्रौढ पतंग लांब अंतरापर्यंत उडू शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • स्वच्छ लागवड सामग्री वापरा आणि फक्त निरोगी, जोमदार, कीडमुक्त रोपेच लावा.
  • कोबीच्या ब्रासिका पिकाच्या दोन ओळींमध्ये मोहरी (ब्रासिका ज्युनशिया) किंवा चायनीज कोबी (बॉक चॉय) सारखी सापळा पिके लावा.
  • सापळा पिकाची पहिली ओळ मुख्य पिकाच्या लागवडीच्या १५ दिवस आधी तर दुसरी ओळ लागवडीनंतर २५ दिवसांनी लावा.
  • रोपवाटिकेत आणि लागवडीनंतरही कोवळ्या रोपांचे नियमित निरीक्षण करण्याची सवय ठेवा.
  • शेत तणमुक्त ठेवा.
  • सुरवंट आणि नुकसानाच्या लक्षणांसाठी पिकाची तपासणी करा.
  • शेतात स्वच्छता बाळगा आणि प्रभावित झाडांना मुळासकट उपटुन जाळा.
  • उपद्रवाची लोकसंख्या कमी करण्यासाठी पीक फेरपालट करणे महत्वाचे आहे.

प्लँटिक्स डाऊनलोड करा