फुलकोबी

कोबीवरील जिवाणूजन्य मऊ कूज

Pectobacterium carotovorum subsp. carotovorum

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • खोलगट मऊ ठिपके.
  • झाडाचे भाग मऊ आणि रंगहीन.
  • पाने, फांद्या आणि मुळे प्रभावित होतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
कोबी
फुलकोबी

फुलकोबी

लक्षणे

सुरवातीला पाण्याने भिजल्यासारखे भाग तयार होतात. ते मोठे होतात आणि खोलगट तसेच मऊ पडतात. ठिपक्यांखालील झाडाचा भाग मऊ आणि दुधाळ ते काळा असा रंगहीन होतो. गंभीर संक्रमणात पाने, फांद्या आणि मुळे पूर्णपणे कुजतात. घाणेरडा वास देखील येतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजतागायत, ह्या रोगाविरुद्ध कोणत्याही जैविक नियंत्रण माहितीत नाहीत. जर आपणांस ह्याच्या घटना आणि लक्षणांची गंभीरता कमी करणारी कोणतीही यशस्वी पद्धत माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जिवाणूचा उपचार करु शकत नसल्याने नियंत्रण उपाय हे फक्त प्रतिबंधक रुपानेच केले जातात. जिवाणूचा प्रतिबंध आणि उपसर्ग दाबण्यासाठी कॉपरवर आधारीत बुरशीनाशकांचा वापर करा. सिप्रोफ्लॉक्झॅसिनही रोगाचा प्रतिबंध करते.

कशामुळे झाले

पेक्टोबॅक्टेरियम कॅरोटोव्होरम नावाच्या जिवाणू मुळे नुकसान होते जे जमिनीत आणि पिकांच्या अवशेषात तग धरतात. हत्यारे, किडे, गारपिटीमुळे झाडाला झालेल्या जखमातुन आणि नैसर्गिक छिद्रातुन हे जिवाणू आत शिरतात. जिवाणूचे वहन किडे, हत्यारे, संक्रमित झाड सामग्रीचे ने-आण, माती किंवा संक्रमित पाण्यामुळे होते. ओल्या आणि २५-३० अंशाच्या ऊबदार वातावरणात ही खूप मोठी समस्या बनते आणि जर झाडांना कॅल्शियमची कमतरता असेल तर ती अधिकच गंभीरही होते. ह्यांची लागण फक्त शेतातच नव्हे तर साठवणीतही होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • हवा चांगली खेळती राहील आणि पाणी साचणार नाही अशा प्रकारे ओळी आखून, रोगमुक्त आणि निरोगी रोपांची लागवड करा.
  • झाडांना जखम होणार नाही ह्याची काळजी घ्या.
  • आपली हत्यारे साफ करुन निर्जुंतकही करा.
  • तुषार सिंचन वापरु नका.
  • संक्रमित झाडे काढुन नष्ट करा.
  • कोरड्या वातावरणातच काढणी करा.
  • साठवणीत पाठविण्यापूर्वी तोडलेला माल तपासुन पहा.
  • साठवणीची जागा कॉपरयुक्त द्रावणांनी स्वच्छ करा आणि वाळलेले गवत किंवा कागदाचा वापर दोन गड्ड्यांच्या मध्ये करा म्हणजे गड्ड्यांना जखम होणार नाही.
  • काढणी नंतर झाडांचे अवशेष काढुन नष्ट करा.
  • तीन वर्षांसाठी यजमान नसलेल्या पिकांसह फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा