कोबी

ग्रेट सदर्न व्हाईट फुलपाखरे

Ascia monuste

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर खाल्ल्याने नुकसान दिसते.
  • अनियमित छिद्र पानांच्या कडांवर दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
कोबी
फुलकोबी

कोबी

लक्षणे

जेव्हा झाडाच्या पानांवर खाल्ल्याचे नुकसान दिसते ते प्रादुर्भावाचे स्पष्ट लक्षण आहे. ग्रेट सदर्न व्हाईट फुलपाखरांचे सुरवंटच हे नुकसान करत असतात. बहुधा ते पानांच्या कडांना, बाहेरुन सुरु करुन आतपर्यंत खातात. ह्या प्रकारच्या खाण्याने पानांच्या कडांवर अनियमित छिद्रे होतात. झाडाचे जमिनीवरील सर्व भाग खाण्याची क्षमता ह्या सुरवंटात असते. ते कोबीवर्गीय भाज्या (कोबी, फ्लॉवर, ब्रॉकोली) अधाशाप्रमाणे खातात. पानांच्या वरच्या बाजुस अंड्यांचे पुंजके दिसतायत का आणि गटा-गटाने सुरवंट खातायत का हे पहाण्यासाठी लक्ष ठेवित चला. शेतात कदाचित प्रौढ पतंग देखील आढळून येतील.

Recommendations

जैविक नियंत्रण

बॅसिलस थुरिंगिएनसिस (बीटी) जे एक नैसर्गिक कीटनाशक असुन कोबीवरील किडीच्या अळ्यांना निशाणा करते तसेच मानवांसाठी आणि भक्षकांसाठीही सुरक्षित आहे, त्याची फवारणी करा. नीम तेलाचे फवारणी करा, जे नीमच्या झाडापासुन बनविले जाते, जे नैसर्गिकरीत्या किडींना पळवुन लावते आणि मारतेही.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक/पर्यावरणपोषक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्यावरील लिखाणाप्रमाणे बहुतेक कीटनाशकांद्वारे अशिया मोन्युस्टेचा नियंत्रण प्रभावीपणे केले जाते पण हे सर्व काही नैसर्गिक भक्षकांसाठी सुरक्षित नाहीत: क्लोरँट्रानिलिप्रोल, सायनट्रानिलिप्रोल, इन्डोक्साकार्ब, स्पिनोसॅड, क्लोरफेनापिर, मॅलेथियॉन. ह्याव्यतिरिक्त कीटनाशकांच्या वापराने प्रतिकार निर्माण होऊ शकतो ज्यामुळे कालांतराने प्रादुर्भावावर कीटनाशकांचा प्रभाव पडत नाही.

कशामुळे झाले

अॅसिया मोन्युस्टे नावाच्या किड्याच्या सुरवंटांमुळे नुकसान उद्भवते. कोबीवर्गीय पिकांचे भरपूर नुकसान करणारा हा उपद्रवी किडा आहे. प्रौढ माद्या पिवळ्या रंगाची फिरकीच्या आकाराची अंडी पानांच्या वरच्या बाजुस पुंजक्यांनी घालतात. अंडी नोव्हेंबर आणि मे महिन्यादरम्यान घातली जातात, जो उष्णकटिबंधीय प्रदेशातील ऊबदार आणि पावसाळी मोसम असतो. सुरवंट रंगाने पिवळे असुन राखाडी पट्टे असतात. पट्टे डोक्यापासुन शेपटीपर्यंत असतात आणि त्यावर छोटे काळे ठिपके असतात. प्रौढ नर फुलपाखरे पांढरी असतात तर माद्या मळकट पांढर्‍या ते राखाडी असतात. प्रौढांचा जिवनकाळ सुमारे १९ दिवसांचा असतो. ते खाद्य शोधण्यासाठी, संभोगासाठी आणि पिल्लांना वाढीसाठी चांगली परिस्थिती असेल अशी जागा शोधण्यासाठी लांब अंतरांपर्यंत जातात. अभ्यास असे दर्शवितो कि हा प्रादुर्भाव ओल्या आणि उबदार परिस्थितीत जिथे तापमान १६ ते ३५ अंश असते तिथे फोफावतात. आणि थंड हवामान तसेच भारी पावसाने ह्यांचे जगणे कठीण होते.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • जांभळे किंवा लाल कोबीचे वाण लावा कारण ते कोबीवरील किडी तसेच पतंगांसाठीही कमी आकर्षक असतात.
  • खाल्ल्याने झालेले नुकसान वा अंड्यांचे पुंजके यासारख्या प्रादुर्भावाच्या लक्षणांसाठी झाडांचे नियमित निरीक्षण करत चला.
  • जर अंडी सापडलीच तर हाताने वेचून काढा.
  • पतंगांच्या नैसर्गीक भक्षक किडे आणि पक्षांना निवारा मिळेल याची सोय करा.
  • झाडांवर प्रादुर्भावाचे किडे पोहचु नयेत म्हणुन आच्छादने घाला.
  • थाइम, सेज आणि रोजमेरीसारख्या वनौषधी तसेच झेंडू आणि नॅस्टरटियमची लागवड अधे-मधे करुन सोबत पिके घ्या.
  • नर पतंगांना पकडुन त्यांच्या प्रजोत्पादनात बाधा आणण्यासाठी कामगंध सापळे लावा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा