कोबी

कोबीवरील फुलपाखरु

Pieris brassicae

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • बाहेरच्या पानांवर मोठी छिद्रे दिसतात.
  • निळसर हिरवी विष्ठा पानांच्या आतल्या बाजुस किंवा कोबीच्या गर्भात दिसते.
  • सुरवंट आणि त्यांची विष्ठा बहुधा झाडांवर दिसते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

कोबी

लक्षणे

ही फुलपाखरे फार विशिष्ट आहेत आणि ती अंडी घालण्यासाठी जागा शोधत असताना झाडांवर बागडताना दिसतात. शेताचे व्यवस्थित निरीक्षण केले असता पानांच्या खालच्या बाजुला हिरवट-पिवळी अंडी पाहण्यात येतील. बाहेरच्या पानांचे नुकसान हे त्यांच्या अस्तित्वाचे पुरेसे प्रमाण आहे. कोबीच्या गड्ड्याला उभा चिरला असता बाहेरच्या पानांवरील छिद्राव्यतिरिक्त आतल्या पानांचे नुकसानही दिसुन येते. सुरवंट आणि त्यांची विष्ठा बरेचदा झाडात सापडते. कोबी, फुलकोबी, ब्रसेल स्प्राऊटस, स्विड आणि सलगम सारख्या सर्व कोबीवर्गीय पीकांवर प्रादुर्भाव होतो. काही प्रकारचे तणही प्रभावित होतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

बॅसिलस थुरिंगिएनसिस किंवा सिकारोपॉलीस्पोरो स्पिनोसा (स्पनिसाड) सारखे नैसर्गिकपणे निर्माण होणार्‍या जिवाणूंवर आधारीत उत्पाद सुरवंटांना नियंत्रित करतात आणि पानांच्या वरच्या आणि खालच्या बाजुला व्यवस्थित मारल्यास चांगलेच परिणामकारक असतात. ही कीटनाशके पर्यावरणात रहात नाहीत. स्टिनेरनेमा कारपोकाप्से सुत्रकृमी या सुरवंटाविरुद्ध वापरासाठी उपलब्ध आहे आणि पाने ओली असताना वापर केला गेला पाहिजे उदा. थंड ढगाळ हवामान.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पायरेथ्रम, लाम्बडासिहॅलोथ्रिन किंवा डेल्टामेथ्रिन सारखे सक्रिय घटक असलेले उत्पाद ह्या सुरवंटांसाठी वापरले जाऊ शकतात. पायरेथ्रमचा वापर खूप वेळा केला जाऊ शकतो अगदी काढणीच्या एक दिवस आधीपर्यंत केला जाऊ शकतो. लाम्बडासिहॅलोथ्रिन आणि डेल्टामेथ्रिनचा वापर फक्त दोनदाच करण्याची शिफारस केली जाते आणि काढणी आधी किमान सात दिवसांचे बंधन पाळणे आवश्यक आहे.

कशामुळे झाले

पिरिस रापे आणि पी. ब्रासिके (क्रमश: कोबीवरील छोटे आणि मोठे फुलपाखरु) मुळे लक्षणे उद्भवतात. त्यांचे जीवनचक्र बहुधा सारखेच असते पण आयुष्यकाळ थोडा कमी किंवा जास्त असु शकतो. फुलपाखरांचे शरीर काळे असते आणि पंख चमचमणारे पांढरे असुन पुढच्या पंखांची टोक विशिष्ट काळी असतात (दोन काळे ठिपके माद्यांत असतात). कोषातुन बाहेर आल्यानंतर काही अठवड्यात माद्या पिवळसर पांढरी अंडी पानांच्या खालच्या बाजुला घालतात. अंडी उबुन सुरवंट बाहेर आल्यानंतर झाडांचे भाग खाऊ लागतो. लहान पांढऱ्या फुलपाखरांचे सुरवंट कोबीच्या गड्ड्याला पोखरत असल्याने जास्त नुकसान करतात. ते फिकट हिरवे असतात आणि त्यांना बारीक मखमलीसारखे केस असतात. मोठ्या फुलपाखरांचे सुरवंट पिवळे आणि काळे असतात आणि त्यांच्या शरीरावर दिसण्यासारखे केस नसतात आणि ते बहुतेक करुन पानांच्या फक्त बाहेरच्या भागांनाच खातात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रदुर्भावाच्या लक्षणांसाठी शेताचे खासकरुन पानाच्या खालच्या बाजुचे नियमित निरीक्षण करा.
  • अंड्यांचे पुंजके असलेली पाने काढून टाका.
  • पानांवरील सुरवंट वेचुन काढा.
  • झाडांवर कीटक-प्रूफ जाळे पसरून माद्यांना अंडी घालण्यापासून प्रतिबंधित करा.
  • मित्र किड्यांवर आणि पक्षांवर प्रभाव पडु नये म्हणुन कीटनाशकांचा वापर मर्यादित करा.
  • संवेदनशील पिके कोबीच्या पीकाजवळ लावु नका.
  • तण नियंत्रण चोखपणे करा नाहीतर ते पर्यायी यजमान म्हणुन कामी येतात.

प्लँटिक्स डाऊनलोड करा