कोबी

अल्टरनेरिया ठिपके

Alternaria brassicae

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर राखाडीसर तपकिरी, विविध मापांचे गोलाकार ठिपके येतात ज्यांना बहुधा पिवळी प्रभावळ असते.
  • कालांतराने, केंद्र पातळ कागदासारखी होतात आणि अखेरीस तो भाग गळुन पडतो आणि बंदुकीने गोळी मारल्यासारखे छिद्र निर्माण होते.
  • पाने पिवळी होऊन गंभीर बाबतीत पानगळ होऊ शकते.
  • संक्रमित बियाणांतुन नविनच रुजलेली रोपे जमिनदोस्त होतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
कोबी
फुलकोबी

कोबी

लक्षणे

झाडाचे वरचे सर्व भाग बाधीत होऊ शकतात आणि विविध पिकात वेगवेगळी संवेदनशीलता पहायला मिळते. बहुधा राखाडीसर तपकिरी, गोलाकार ठिपके प्रथम जुन्या पानांवर दिसतात. हे ठिपके मापाने टाचणीच्या टोका इतके ते मोठ्या १२ मि.मी. व्यासाचेही असु शकतात ज्यांची केंद्रे तपकिरी असतात. ह्या डागांच्या केंद्रात काळ्या बुरशीचे बीजाणू पुंजक्याने असु शकतात आणि पिवळी प्रभावळ असते. कालांतराने केंद्राचा भाग पातळ कागदासारखा होतो आणि अखेरीस गळुन पडल्याने बंदुकीने गोळी मारल्यासारखी छिद्रे तयार होतात. पाने पिवळी पडतात आणि गंभीर बाबतीत पानगळही होऊ शकते. संक्रमित बियाणांतुन रुजलेल्या रोपातील जंतुंमुळे बहुधा कोवळे रोप जमिनदोस्त होते. शेंगांवर, खोडाच्या बुडाशीसुद्धा ठिपके येऊ शकतात ह्यामुळे ह्या लक्षणाला काळेपाय असेही म्हटले जाते.

Recommendations

जैविक नियंत्रण

ह्या जंतुंसाठी कोणतेही जैव उपचार किंवा पद्धती उपलब्ध नाहीत. जर आपल्याकडे ह्या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बुरशीनाशके वापरण्याच्या गरजा समजुन घेण्यासाठी निरीक्षण आणि योग्य निदान अतिशय जरुरीचे आहे. बीजप्रक्रियेची मोठी शिफारस केली जाते. रोग नियंत्रणाचा आणखी एक मार्ग म्हणजे पहिले लक्षण दिसताच पानांवर फवारणी करणे. अखेरीस साठवणीच्या आधीही बुडवुन काढणे हा ही साठवणीच्या काळात रोगाचा विकास न होऊ देण्याचा एक उपाय आहे. किती उपचारांची गरज आहे, पीक कोणते आहे आणि हवामान कसे आहे ह्याप्रमाणे पुष्कळशी मिश्रणे आहेत ज्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. अॅनिलॅझिन, क्लोरोथॅलोनिल,डिफेनोकोनॅझॉल, आयप्रोडियॉन, मँकोझेब, मॅनेब, ही ह्या मिश्रणात येतात.

कशामुळे झाले

लक्षणे थोडी पिकावरही अवलंबुन असतात आणि बियाणात रहाणार्‍या अल्टरनेटिया ब्रासिके नावाच्या बुरशीमुळे होतात, जी कोबी आणि ब्रासिका जातीच्या अन्य प्रजातींमध्ये सामान्यपणे सापडते. ह्याच जातीशी संबंधित अल्टनेरिया ब्रासिकोला नावाची बुरशी ह्या काही पिकांमध्ये सापडु शकते. ह्या बुरशीचे संक्रमण मुख्यत: बियाणांतुन होते. बियांवर बुरशीचे बीजाणू असु शकतात किंवा बुरशीचे तंतु बियांच्या आतल्या पेशीत असु शकतात. दोन्ही बाबतीत, बुरशी हळुहळु विकसित होणार्‍या रोपाला संक्रमित करते आणि कालांतराने लक्षणे दिसु लागतात. संवेदनशील तणात किंवा न कुजलेल्या रोपाच्या अवशेषात बुरशी विश्रांती घेते. तसे असता, निरोगी रोपांवर पडलेले बीजाणू रोपाच्या किंवा पानांच्या नैसर्गिक छिद्रातुन किंवा रोपाच्या जखमेतुन आत शिरतात. तरीही आद्र हवामान, वार्‍यासकट पाऊस आणि उबदार हवामान (२०-२४ डिग्री सेल्शियस) संक्रमणाच्या प्रक्रियेस अनुकूल असते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोतांकडील निरोगी बियाणे वापरण्याची खात्री करा.
  • सलगमच्या काही जातींमध्ये ह्या जंतुंविरुद्ध काही प्रतिकार तयार झालेला आहे.
  • हवा चांगली खेळती रहाण्यासाठी लागवड करताना रोपात पुरेसे अंतर ठेवा.
  • शेताचे रोगाच्या लक्षणांसाठी नियमित निरीक्षण करा.
  • जमिनीला स्पर्श करणारी पाने वेचुन काढुन टाका.
  • पीक घेतल्यानंतर संक्रमित रोपांचा कचरा काढुन टाका.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण खास करुन ब्रासिका जातीचे काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा