चाफर बीटल

बाजरी

चाफर बीटल

Chiloloba acuta

किडा

थोडक्यात

  • हिरवे धातुसारखे बीटल्स तृणधान्यच्या फुलांना खाताना दिसतात.
  • फुलांना झालेल्या नुकसानाने, दाणे कमी भरतात.
  • विष्ठेमुळे फुले रंगहीन होतात.
  • हे कळ्या आणि पानांवरही गरज भासल्यास हल्ला करतात.

मध्ये देखील मिळू शकते


चाफर बीटल

बाजरी

लक्षणे

दक्षिण भारतात, धातुसारखे हिरवे बीटल्स चिलोलोबा अॅक्युटा हे बहुधा उत्तरीपूर्व पावसाळ्यानंतर गवतात सापडतात. तथापि, हे काही वेळा बाजरी, मका आणि ज्वारी देखील मुख्यतः परागकण (म्हणुन हे सामान्य नाव परागकण बीटल) खातात. खाताना हे फुलांना नुकसान करतात ज्यामुळे दाणे भरणीत बाधा येते. विष्ठेमुळे फुले रंगहीन होतात. जरी यांना परागकण आणि फुले खाणारे मानले जात असले तरी ते गरज भासल्यास कळ्या आणि पानांवरही हल्ला करतात. अळ्या भुसभुशीत, कुजणार्‍या सेंद्रिय घटकात आढळतात आणि यांना उपद्रव मानले जात नाही.

शिफारशी

जैविक नियंत्रण

चाफर बीटलच्या मोठ्या अळ्या मध्यम ते उच्च मात्रेच्या हेटेरोर्‍हाब्डिटिस बॅक्टेरियोफोरा आणि काही स्टेनेर्नेमा प्रजाती (एस. सियाम्कायाइ, एस. थर्मोफिलम आणि एस. अब्बासी) सुत्रकृमीजन्य जंताना फार संवेदनशील असतात. बुरशीच्या काही प्रजाती, उदा. मेटार्‍हायझियम अॅनिसोप्लिये, अळ्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी नियंत्रक म्हणुन वापरल्या जाऊ शकतात. या सुत्रकृमीवर अधारीत उत्पाद आपल्या भागात उपलब्ध आहेत का ते तपासा. निंबोळी पेंड ने जमिनीचे उपचार केले असताही अळ्यांचे खाणे आणि आकार कमी होतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. प्रौढांना लक्ष्य करण्यासाठी कीटकनाशके वापरली जाऊ शकतात.

कशामुळे झाले

चाफर बीटल, चिलोलोबा अॅक्युटा, हा किडा भारतीय उपखंडात चांगलाच विखुरलेला आढळतो. प्रौढ बहुधा चमकणार्‍या धातुसारखे हिरवे असतात पण काही प्रजाती लाल किंवा गर्द निळ्या रंगाच्याही असतात. त्यांच्या शरीरावर अनियमितपणे पसरलेले केसांचे पुंजके असतात, जे बाजुला आणि शरीराच्या खालच्या बाजुला जास्त स्पष्ट दिसतात. माद्या फिकट पांढरी अंडी एकेकटी मातीच्या वरच्या थरात, पानांवर किंवा कुजणार्‍या लाकडात घालतात. अळ्या C आकाराच्या असतात आणि जमिनीतील सेंद्रिय घटक (खोड, फांद्या किंवा काटक्या) खातात. दक्षिण भारतात प्रौढ उत्तरीपूर्व पावसाळ्यानंतर सर्वसामान्यपणे गवतात आढळतात. ते क्वचित बाजरी, मका आणि ज्वारीलाही उपाद्रव करतात आणि फुल व दाण्यांना नुकसान करतात.


प्रतिबंधक उपाय

  • चाफर बीटल्स किंवा फुलांच्या नुकसानीच्या चिन्हांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • जर उपलब्ध असेल तर जाळीदार झाडूने बीटल गोळा करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा