बाजरी

खोडकिडा

Acigona ignefusalis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • हा किडा वाढणार्‍या शेंड्यांवर आणि पानांवर प्रादुर्भाव करतो आणि खोडाच्या आत प्रवेश करतो.
  • अळ्या २० मि.मी.
  • लांबीच्या लालसर तपकिरी डोके असलेल्या व पांढऱ्या रंगाच्या असतात.
  • पिवळ्या रंगाची अंडी पुंजक्यांनी घातली जातात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

बाजरी

लक्षणे

खोडकिड्याच्या अळ्या बाजरीच्या पानांवर आणि पानांच्या टोकांवर हल्ला करतात. अळ्या खोडामध्ये छिद्रे करून आतून पोकळ करत असल्याकारणाने झाडे अकाली सुकतात. पूर्ण वाढलेल्या अळ्या २० मि.मी. लांबीच्या लालसर तपकिरी डोके असलेल्या व पांढऱ्या रंगाच्या असतात ज्यावर कधीकधी काळे ठिपकेही असु शकतात. प्रौढ पतंगांचे पंख ८-१५ मि.मी. लांबीचे आणि पांढर्‍या रंगाचे असतात. पिवळ्या रंगाची अंडी पुंजक्यांनी पानांवर घातली जातात.

Recommendations

जैविक नियंत्रण

कामगंध सापळे वापरून खोडकिड्यांची संख्या कमी केली जाऊ शकते. शेताच्या कडेने आणि धान्य साठवणीच्या ठिकाणी हे सापळे शक्यतो बाजरी किंवा इतर गवते वापरून केलेल्या साच्यावर लटकून ठेवावे. प्रदुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात नीम तेलाचा वापर केल्यास खोडकिड्यांविरुद्ध परिणामकारक नियंत्रण मिळु शकते. 'ढकला-खेचा' पद्धतही चांगलीच परिणामकारक असते: डेस्मॉडियम सारख्या पिकांसोबत आंतरपीक करावे. डेस्मॉडियम खोडकिड्याच्या पतंगांना पळवुन लावते, म्हणजे पतंग बाजरीपासुन दूर 'ढकलले' जातात. नॅपियर किंवा सुदान गवतासारखे सापळा पीक शेताच्या कडेने लावावे. ह्या पिकांमुळे खोडकिड्यांचे पतंग आकर्षित होतात, म्हणजे बाजरीपासुन ते दूर 'खेचले' जातात.

रासायनिक नियंत्रण

कीटनाशकांचा वापर कठिण तसेच खार्चिक असतो. डायमिथोएटचा वापर केला जाऊ शकतो पण त्याच्या खर्च वाजवी नसतो.

कशामुळे झाले

आद्र भागात वार्षिक तीन पिढ्या होऊ शकतात मात्र कोरड्या क्षेत्रात दोनच पिढ्या होतात. अळ्या खोडामध्ये छिद्रे करून आतून खात असल्याने मुळांपासुन अन्न व पाणी पुरवठा झाडाच्या इतर भागात पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो. खोडकिड्यांच्या अळ्या पिकाच्या अवशेषात जिवंत राहू शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाणांची निवड करा.
  • पेरणी लवकर करा जेणेकरुन उपद्रव टाळता येईल.
  • चवळी सारख्या यजमान नसलेल्या पिकांसोबत आंतरपीक करावे.
  • शेताच्या कडेने फुलांची झाडे लाऊन नैसर्गिक शिकार्‍यांची (परजीवी वॅस्पस) संख्या वाढेल असे वातावरण निर्माण करा.
  • जर खोड कुड बांधण्यासाठी (बांधकामासाठी) वापराची असल्यास त्यांना थोडे जाळून मगच वापरावे.
  • पीकांचे सर्व अवशेष पूर्णपणे काढुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा