इतर

ज्वारीवरील लांबट काणी

Tolyposporium ehrenbergii

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • फिकट तपकिरी, जवळपास दंडगोलाकार आणि थोडीशी वक्र असलेली "काणी" कणसावर पसरलेली दिसते.
  • बीजाणूफळे फुटुन काळ्या बीजांणूचे पुंजके बाहेर येतात.
  • ८-१० गडद तपकिरी तंतु बाहेर दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

हा रोग सामान्यत: थोड्या फुलांनाच संक्रमित करतात, जी बीजाणूफळात रुपांतरित होऊन संपूर्ण कणसावर पसरतात. ही बीजाणूफळे साधारणत: दंडगोलाकार, लांबट आणि थोडीशी वक्र अशा बुरशीच्या रचनेची असतात. त्यांवर थोडे जाडसर फिकट तपकिरी पडद्याचे आवरण असते. हे बीजाणूफळे वरच्या बाजुने फुटून काळ्या रंगाच्या बुरशीचे बीजाणू सोडतात आणि रोगाचा आणखी प्रसार करतात. साधारण ८-१० गर्द तपकिरी तंतु ह्या रचनेत दिसतात जे कणसावरील इतर फुलांचे प्रतिनिधित्व करतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

रोगाचा प्रसार रोखण्यासाठी ऑरगॅनिक मर्क्युरियल द्रावणाची बीजप्रक्रिया करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

रासायनिक नियंत्रण

ह्या रोगाचा उपचार करण्यासाठी सध्यातरी कोणतेही रसायनिक उपचार उपलब्ध नाहीत. जर आपल्याकडे ह्या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

कशामुळे झाले

टॉलिपोस्पोरियम एहरेनबेरगिल नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात. त्याचे बीजाणू बहुधा एकत्र चिकटलेले असून एखाद्या चेंडुसारखे आकार घेत असल्याने जमिनीत बरेच वर्षांपर्यंत जगु शकतात. ही बीजाणूफळे ज्वारीच्या दाण्यांनाही चिकटु शकतात आणि संसर्गाचा प्राथमिक स्त्रोत बनतात. ज्वारीच्या झाडांवर फुले दिसु लागल्यावर लक्षणांची सुरुवात होते आणि विश्रांती घेत असलेली बीजाणूफळे फुलांत उबुन जास्त बीजाणू उत्पन्न करतात. हे बीजाणू वार्‍याच्या झुळकीबरोबर वाहुन पानांवर आणि इतर झाडांवर आणि पाण्याने फुलांच्या गुच्छातील एकेका फुलांना संक्रमित करतात. वार्‍याबरोबर वाहणारे बीजाणूसुद्धा पाण्याच्या थेंबात बसुन उबतात जे थेंब पानांवर विसावलेले असतात आणि फुले फुलण्याच्या मोसमात फुलांना संक्रमित करतात.


प्रतिबंधक उपाय

  • फक्त निरोगी बियाणेच वापरा.
  • बाजारात बरेचसे रोग प्रतिकारक किंवा सहनशील वाण उपलब्ध आहेत, फक्त त्यांचीच निवड करा.
  • संक्रमित दाणे आणि झाडाचे इतर भाग लगेच जमा करा.
  • दर २-३ वर्षांनी पीक फेरपालट करा म्हणजे जमिनीतील बीजाणूफळे मरतील.
  • हंगामाच्या सुरुवातीस पेरणी करा ज्यामुळे लहान रोपे टी.
  • एहरेनबेरगिलच्या उगवण कालावधी दरम्यान वार्‍याबरोबर वहन होऊन येण्यापासुन होणार्‍या संसर्गापासुन वाचतील.

प्लँटिक्स डाऊनलोड करा