ढोबळी मिरची आणि मिरची

गोगलगाय

Gastropoda

इतर

5 mins to read

थोडक्यात

  • गोगलगायी पान, फुल आणि कंदात खाण्यासाठी छिद्रे करतात.
  • झाडाच्या पानावर आणि जमिनीच्या पृष्ठभागावर त्या चिकट रुपेरी माग सोडतात.
  • कोवळी रोपे त्यांना खूप आवडतात त्यामुळे प्रादुर्भाव शक्यतो त्यांच्यावर जास्त आढळतो.
  • कोवळी रोपे मरु शकतात.

मध्ये देखील मिळू शकते

30 पिके
जव
द्वीदल धान्य
कारले
कोबी
अधिक

ढोबळी मिरची आणि मिरची

लक्षणे

गोगलगायींचा उपद्रव खूप प्रसृत आहे आणि जर त्यांची लोकसंख्या जास्त झाली तर पिकाचा गंभीर नाश होऊ शकतो. त्या अनियमितपणे खातात आणि पानांत मोठे छिद्र सोडतात पण फांद्या, फुले, कंदांनाही प्रभावित करतात. बटाट्याच्या पिकात त्या बटाटे कंदांच्या सालींवर गोल उथळ छिद्रे करतात किंवा आतपर्यंत पोखरुन बोगदे करतात, ज्यामुळे खूप नुकसान होते. नुकसानीचा मागोवा त्यांनी पानांवर आणि जमिनीच्या पृष्ठभागावर मागे सोडलेल्या रुपेरी चिकट मागामुळे घेता येतो. त्या बहुधा आर्द्र हवामानात अवतरतात आणि त्यांचे लक्ष खास करुन कोवळ्या रोपांवर असते आणि कोवळ्या रोपांना पूर्णपणे खाऊन मोठे नुकसान करू शकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

फेरिक फॉस्फेटवर आधारीत गोळ्या देखील सेंद्रिय शेती करणार्‍यांच्या वापरासाठी मान्य आहेत. हेजहॉग्ज, पक्षी, बेडुक, ब्लाइंडवर्मस आणि जमिनीवरील भुंगे सारखे भक्षकही शेतातील उपद्रवाच्या उपस्थितीस आळा घालू शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. गोगलगायची भिन्नता आणि जीवनचक्रामुळे, रसायनिक नियंत्रणाच्या टप्प्यात ते येत नाहीत. मेटालडिहाइडवर आधारीत गोळ्या वापरुन त्यांना त्यांच्या बिळाबाहेर प्रलोभित करता येते. ह्या गोळ्या पावसानंतर पसरा जेव्हा गोगलगाई सर्वात जास्त कार्यरत असतात.

कशामुळे झाले

गोगलगाय कुजत असलेल्या सेंद्रिय घटकांना आणि बरेचशा पिकांचे पान, मूळ आणि कंद खातात. गोगलगाय जमिनीखालचे रहिवाशी आहेत, खोड किंवा जंतुनी केलेल्या भेगा आणि बोगदे वापरुन त्या पसरतात. जमिनीवर त्या फक्त संभोगासाठीच येतात. बटाट्याच्या सालीवर त्या गोल उथळ छिद्रे करतात किंवा कंदात खोल पोखरतात, ज्यामुळे मोठा नुकसान होतो. हे प्राणी ओल्या हवामानात फोफावतात म्हणुन दव पडलेल्या रात्री किंवा पावसानंतर संक्रमण जास्त होते. बहुतेक प्रजाती थोडी थंडी सहन करु शकतात आणि वसंत ऋतुत पुन्हा सक्रिय होतात.


प्रतिबंधक उपाय

  • उच्च किंवा मध्यम प्रतिकारक वाण निवडा.
  • लवकर लागवड करा किंवा लवकर तयार होणारे वाण लावा.
  • जड जमिनीत लागवड करणे टाळा कारण गोगलगायींना त्या जमिनी आवडतात.
  • लागवड करण्यापूर्वी एकदा किंवा दोनदा नांगरुन गोगलगायींना भक्षकांसाठी उघड्यावर पाडा.
  • गोगलगायीला पळवुन लावण्यासाठी पिकाच्या आजुबाजुला कॉफीची पूड टाका.
  • पिकाभोवती कुंपण किंवा जाळी लावा.
  • प्राणघातक नसणारे सापळे जसे कि जुने ओले केलेले गोणपाट आणि सडलेल्या लाकडी फळ्या लावा.
  • संक्रमण संपविण्यासाठी गोगलगायींना हाताने वेचून काढुन टाका.
  • सकाळच्या वेळी जास्त पाणी देणे टाळा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण काढुन टाका.
  • भक्षकांच्या लोकसंख्येला प्रोत्साहन द्या.
  • शक्य तितक्या लवकर काढणी करा.
  • शेतातुन पालापाचोळा काढा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा