गहू

गोठलेल्या दवाने नुकसान

Cell injury

इतर

5 mins to read

थोडक्यात

  • पाने रंगहीन आणि विकृत होतात.
  • पानांची टोके वाळतात.

मध्ये देखील मिळू शकते

57 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
केळी
अधिक

गहू

लक्षणे

पानांच्या शीरांमध्ये भाजलेले आणि फिकट तपकिरी धब्बे दिसतात. तसेच फुलांना आणि कोवळ्या फळांना नुकसान होते. पानांवर ओरखडे किंवा छोटी छिद्रे दिसतात आणि घाण वास सुटतो. पाने अकाली गळतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

ही घटना नैसर्गिक असल्याने कोणतेही जैविक नियंत्रण शक्य नाही.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ही घटना नैसर्गिक असल्याने कोणतेही रसायनिक नियंत्रण शक्य नाही.

कशामुळे झाले

गोठलेल्या दवामुळे नुकसान तेव्हा होते जेव्हा झाडांच्या भागांमध्ये पाणी साचून त्याचा बर्फ बनतो आणि झाडाच्या पेशींचे नुकसान होते, म्हणुन खरतर थंड हवामानापेक्षा बर्फ तयार होण्यानेच झाडांचे नुकसान होते. थंड हवेमुळे मुळांपेक्षाही सदाहरित झाडीतील आर्द्रता नाहीशी होते. ज्यामुळे पाने वाळतात खास करुन टोकाकडे आणि कडांनी. पूर्ण विकसित झालेल्या झाडांपेक्षाही कोवळी रोपे गोठलेल्या दवास जास्त संवेदनशील असतात.


प्रतिबंधक उपाय

  • गोठलेल्या दवापासुन वाचविण्यासाठी लागवडीची जागा काळजीपूर्वक निवडा.
  • सामान्यत: स्थानिक भागातील पाणथळीच्या जागी तापमान थंड असते आणि म्हणुन तिथे जास्त नुकसान झालेले दिसते.
  • थंड हवा जमा होणार्‍या जागा नष्ट करण्यासाठी जमीत समतल करा ज्यामुळे थंड हवा वाहून जाईल.
  • पुढच्या दव गोठणवेळी संरक्षण करण्यासाठी वाळलेली पाने आणि फांद्या झाडावरच ठेवा.
  • नविन पालवी फुटताना दिसु लागली कि मृत अवशेष काढुन टाका.
  • गोठलेल्या दवाचा अंदाज वर्तविला गेला तर झाडांना फ्लीस किंवा इतर योग्य सामग्रीने झाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा