बेदाणा

लाल बेदाण्यावरील फोड आणणारा मावा

Cryptomyzus ribis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • लालसर, जांभळट किंवा पिवळसर हिरवे फोड वरील पानांवर येतात.
  • विकृत भागाच्या आजुबाजुला रंगहीन भाग दिसतात.
  • जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने विकृत होतात.
  • मधाळ रस काळ्या काजळी बुरशी वाढीला अनुकूल असतो.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
बेदाणा

बेदाणा

लक्षणे

लाल आणि पांढर्‍या बेदाण्यांच्या पानाच्या पात्यांच्या वरच्या बाजुला ठळक लालसर ते जांबळट फोड दिसतात. काळ्या मनुकांवर हे फोड बहुधा पिवळसर हिरवे असतात. विकृत भागांच्या सभोवतालचा भाग बहुधा रंगहीन होतो. प्रामुख्याने फुटव्याच्या पानांची टोक सुरकुतलेली किंवा विकृत दिसतात. जास्त प्रदूर्भावात पानांची गंभीर विकृती होते. वसंत ऋतुत लवकर- उन्हाळ्यात लवकर फोड आलेल्या भागांच्या खालच्या बाजुला फिकट पिवळा मावा बसलेला आढळतो. मधाळ रस पानांवरही असतो जो संधीसाधू काळ्या काजळी बुरशीच्या वाढीस अखेरीस अनुकूल ठरतो. सामान्यतः, झुडुप सौम्य प्रदूर्भावातही सामान्य पीक देऊ शकते.

Recommendations

जैविक नियंत्रण

नैसर्गिक भक्षकात लेडीबग्ज येतात - ज्यांना उद्रेक होताक्षणीच शेतात सोडले पाहिजे. बागायती साबण किंवा साबणाच्या सौम्य द्रावणाचा वापर लाल बेदाण्यांवर फोड आणणार्‍या माव्यांचे नियंत्रण करण्यास पुरेसे आहे. नळीने पाण्याचा जोरदार फवारा मारल्यासही मावा जागेवरुन पडु शकतात. विश्रांती घेत असलेल्या अंड्यांना मारण्यासाठी चांगल्या प्रतीची बागायती तेलेही वापरली जाऊ शकतात. बाहेर येणार्‍या माव्यांना मारणार्‍या इतर सेंद्रीय द्रावणात येतात पायरेथ्रम किंवा पायरेथ्रम आणि फॅटी अॅसिडस.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. गंभीर प्रदूर्भावात बाहेर येणार्‍या माव्याच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रिन किंवा लँब्डा-सायहॅलोथ्रिन कीटकनाशके असणारी फवारणी करावी. कार्रवाही करण्यासाठी लक्षणे दृष्य होण्याची वाट पाहू नये कारण एकदा का पाने सुरकुतली कि मग फवारणी करण्यात काहीच अर्थ नसतो. फुलधारणेच्या काळात फवारणी करु नये कारण मधमाशा आणि इतर परागीकरण करणार्‍या किड्यांना त्याचा त्रास होईल.

कशामुळे झाले

क्रिप्टोमायझस रिबिस नावाच्या लाल बेदाण्यावर फोड आणार्‍या माव्यांमुळे नुकसान उद्भवते. पानांच्या खालच्या बाजुने रस शोषण करीत असलेल्या पंखहीन, फिकट पिवळ्या माव्यांपेक्षा जे वसंत ऋतुच्या शेवटाच्या सुरवातीला किंवा उन्हाळ्याच्या सुरवातीलाच लक्षात येतात, सुरकुतलेल्या आणि फोड आलेल्या पानांचे भाग बहुधा जास्त ठळकपणे लक्षात येतात. रस शोषणाच्या प्रक्रियेदरम्यान झाडीमध्ये सोडलेल्या रसयानांमुळे फोड आणि रंगहीनता दिसते. मध्य उन्हाळ्यापर्यंत पंखवाल्या माव्यांचे प्रजोत्पादन होऊन ते दुय्यम यजमान झाडांवर प्रामुख्याने हेज वाऊंडवॉर्ट (स्टाचिस सुलव्हॅटिका), स्थलांतरीत होतात. हे स्थलांतरीत मावे शरद ऋतुत बेदाण्यांवर परत येतात आणि कोंबांमध्ये विश्रांती घेणारी अंडी घालतात. अंडी वसंत ऋतुत ऊबतात आणि माव्याची वस्ती निर्माण करतात जिथुन ते पानांच्या खालच्या बाजुला स्थलांतरीत होतात. बेदाण्यांवर फोड आणणारा मावा, लाल, पांढर्‍या बेदाण्यांना आणि काळ्या मनुकांना प्रभावित करतात तसेच संबंधित जंगली जॉस्टबेरी (ज्यांना जीनस राईब ही म्हणतात) लाही प्रभावित करतात. जरी पिकावर बहुधा परिणाम होत नाही, तरी जास्त गंभीर बाबतीत नियंत्रण उपायांची गरज भासते.


प्रतिबंधक उपाय

  • लाल बेदाणा आणि संबंधित यजमानांवर सी.
  • रिबिस ची उपस्थिती आणि त्याच्या लक्षणांसाठी नियमित निरीक्षण करत चला.
  • अविवेकीपणे कीटकनाशकांचा वापर करु नका कारण ह्यामुळे लेडीबग्जसारख्या नैसर्गिक भक्षकांच्या लोकसंख्येवर परिणाम होईल.
  • नत्रयुक्त खते जास्त वापरणे टाळा कारण भरगच्च झाडीमुळे मावा आकर्षित होतो.
  • आधीच्या लागवडीचे अवशेष काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा