चहावरील लाल कोळी

TEA

चहावरील लाल कोळी

Oligonychus coffeae

कोळी

थोडक्यात

  • पानांच्या मध्यशीरेच्या बाजूने पिवळे ठिपके येतात व बाजुला पसरतात.
  • पाने तांबेरी, लालसर किंवा जांभळट रंगाची होतात आणि गळतात.
  • पानांखाली बारीक रेशमी धाग्यांच्या जाळ्यात बारीक लाल अंडी दिसतात.
  • खूप बारीक कोळी जुन्या पानांच्या वरील बाजूस रस शोषण करतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
कॉफी

चहावरील लाल कोळी

TEA

लक्षणे

जुन्या पानाच्या मध्य शीरेभोवताली पिवळसर ठिपके येणे हे पहिले चिन्ह आहे. हे ठिपके बारीक सुरु होतात पण मोठे होऊन तपकिरी पडुन एकत्र मिसळुन मोठे धब्बे तयार होतात. खाणे चालूच राहिल्यास पाने तांबेरी, लालसर तपकिरी, किंवा जांभळ्या रंगाची पडतात. हे नुकसान बहुधा जुन्या पानांच्या वरील पृष्ठभागावर, मध्य आणि इतर शिरांच्या बाजूच्या खोलगट भागात सुरु होते. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पानांचे दोन्ही भाग संक्रमित होतात आणि लहान पाने देखील प्रभावित होतात. प्रभावित पानांच्या खाली बारीक रेशमी जाळ्यात छोटी लाल गोलाकार अंडी असतात. खूप नुकसानीत पाने कोरडी होऊन गळतात. जेव्हा खूप पानगळ होते तेव्हा चहाचे झाड नविन वाढ थांबविते आणि वाढ अत्यंत हळू होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

उपचारांचा पहिला पर्याय म्हणुन वनस्पती अर्क वापरा. निवडक फवारणीद्वारे नैसर्गिक भक्षकांची लोकसंख्या राखा. जैविक नियंत्रणासह योग्य मशागतीच्या पद्धतींचा संयोग करा. प्रतिकारतेचे निरीक्षण करा आणि रसायनिक निवड करा. हंगामातील कोळींच्या लोकसंख्या चक्रासह उपचारांच्या वेळेचे समायोजन करा.

रासायनिक नियंत्रण

ठराविक कोळीनाशक वापरुन अंड्यांना लक्ष्य केल्यास चांगले नियंत्रण मिळते. प्रतिकार निर्माण होऊ नये म्हणुन विविध रसायन गटातील कोळीनाशके वापरा. पिवळे ठिपके दिसताच उपचार करा. फवारणीचे लक्ष्य पानांची वरची बाजू ठेवा कारण तिथेच हे कोळी रस शोषण करतात. नैसर्गिक भक्षकांचे रक्षण करण्यासाठी कमी तीव्र असणारी मात्रा वापरा. कोरड्या हवामानापूर्वीच्या काळात उपचार करा.

कशामुळे झाले

चहावरील लाल कोळींमुळे (ओलिगोनयचस कॉफे) ही लक्षणे दिसतात, हे ८ पायांचे कोळी फक्त ०.३-०.४ मि.मी. मापाचे असतात. पुढून ते लाल असतात तर पाठीकडून लालसर तपकिरी किंवा जांभळे असतात. प्रौढ माद्या, अळ्या आणि पिल्ले सर्व पानांचे रस शोषण करतात. कोळी सर्व वर्षभर सक्रिय असतात पण मोसमांचे नमुन्यांचे अनुसरण करतात. जेव्हा तापमान थोडे थंड असते तेव्हाच प्रादुर्भाव सुरु होतो पण जसजसे तापमान वाढते तसतसा प्रादुर्भावाचा प्रसारही वाढतो. उष्ण कोरड्या हवेत सर्वात जास्त नुकसान होते. एकदा का पावसाळा सुरु झाला, कि हे कोळी पाण्याबरोबर वाहून जातात आणि जवळपास नाहीसे होतात. नंतर ते परत येतात पण त्या काळात ते जास्त गंभीर उपद्रव ठरत नाहीत. थंड हवेत संभोग खूप कमी होतो आणि लोकसंख्या अत्यंत कमी असते. चहावरील लाल कोळी हा अनेक देशातील चहा पिकांवरील गंभीर उपद्रव आहे. ह्याचे जर योग्य नियंत्रण केले गेले नाही तर पिकाचे गंभीर नुकसान होते.


प्रतिबंधक उपाय

  • शक्य असल्यास कोळी प्रतिकारक झाडे वापरा.
  • कोळींची वस्ती काढण्यासाठी जोमदार छाटणी करा आणि पाने कमी करा.
  • हंगामाच्या उच्चीवर दर अठवड्यास लक्षणांसाठी पहात चला.
  • कोरड्या हवामानात जमिनीची आर्द्रता चांगली राखा.
  • तोडणी करताना खालील जास्त संक्रमित पाने काढा.
  • एका शेतातुन दुसरीकडे जाताना अवजारे आणि कपडे स्वच्छ करा.
  • जोरदार वारा वहात असताना जास्त संक्रमित भागात काम करु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा