डासासारखे किडे

TEA

डासासारखे किडे

Helopeltis sp.

किडा

थोडक्यात

  • कोवळ्या पानांवर आणि शेंड्यांवर बारीक गडद तपकिरी ठिपके येतात.
  • पाने काळी पडुन मुडपतात.
  • कोवळे शेंडे वाळुन मर होते.
  • फळांच्या पृष्ठभागावर गाठीसारखी (उठावदार) रचना आणि खरबरीत, कडक खपली येते.
  • हे किडे लाल, काळे आणि पांढरे असुन पंख काळे असतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
कॉफी
पेरु

डासासारखे किडे

TEA

लक्षणे

पेरुच्या फळाच्या पृष्ठभागावर तांबेरी ठिपके आणि काळे फोड यांद्वारे लक्षणे दिसतात. खाल्लेल्या छिद्रातुन चिकट स्त्राव गळतो. पाने आणि शेंडे तपकिरी होतात. प्रादुर्भाव खूपच जास्त झाला तर फळे अकाली गळतात. चहावरील लक्षणे ही खूप मूल्यवान अशा भागावर म्हणजेच कोवळ्या पानांच्या गुच्छांवर दिसतात. सर्वात कोवळ्या पानांवर आणि शेंड्यावर बारीक गडद तपकिरी ठिपके येतात. हे ठिपके ताजे असताना त्यांच्या केंद्रातुन रस गळतो आणि जसजसे ते वाळतात तसतसे ते काळे पडतात. प्रत्येक ठिपक्याच्या नुकसानित जागेसभोवतालचे भाग वाळून मर होते आणि वेळ जाईल तसे गडद होत जातात. पाने मुडपलेली आणि विकृत होतात. नविन वाढणार्‍या भागाचे नुकसान झाल्यामुळे पानेही परत येत नाहीत. हल्ला चांगलाच मोठा असला तर पूर्ण हिरवे शेंडेच वाळतात आणि मर होते. खूपच गंभीर नुकसानित झाडांच्या फांद्यांवरही देवीचे व्रण विकसित होतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जैविक नियंत्रणासह योग्य मशागतीच्या पद्धतींचा अवलंब करा. आधी नीम उत्पादने वापरा, गरज भासल्याच रसायनिक उत्पादने घ्या. चांगला प्रभाव मिळण्यासाठी हवामान वृत्तावर लक्ष ठेऊन उपचार करा. किडींची लोकसंख्या कमी करण्यासाठी स्थानिकरीत्या नैसर्गिक भक्षक मिळतायत का ते पहा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. प्रतिकाराचा प्रतिबंध करण्यासाठी रसायनिक वर्गांत फेरफार करीत रहा. निवडक कीटकनाशके वापरा जी नैसर्गिक भक्षकांना सुरक्षित राखतील. नुकसान कमी करण्यासाठी फुलोर्‍यापासुन दर २ अठवड्यांनी फवारणी घ्या. संध्याकाळी फवारणी घ्या कारण ह्यावेळी कीड सर्वात जास्त सक्रिय असते. झाडीतील सावलीच्या जागी लक्ष्य करा कारण तिथेच कीड लपते. कीटकनाशकांच्या अवशेष सुरक्षिततेसाठी तोडणीपूर्वी ७-१० दिवस आधी फवारणी थांबवा.

कशामुळे झाले

डासासारखे किडे हे सुमारे १.५ से.मी. लांबीचे बारीक किडे असतात, त्यांचा रंग लाल, काळा आणि पांढरा असा मिश्र असतो, त्यांचे पंख आणि मिशा काळ्या असतात. मादी सुमारे ५०० नळकांड्याच्या आकाराची अंडी, हिरवे शेंडे, कळ्या आणि पानांत घालते. त्यातुन निघणारी पिल्ले ही दिसण्यास मुंग्यांसारखी, केसाळ, तांबट पिवळ्या रंगाची असतात. प्रौढ आणि पिल्ले दोन्ही झाडाचे रस शोषण, कोवळे शेंडे, पान, मऊ फांद्या आणि फळांतुन करतात. त्यांना जास्त आर्द्र असलेल्या सावलीच्या जागा पसंत असतात आणि सकाळी लवकर तसेच संध्याकाळी उशीरा ते खूप सक्रिय असतात. कोवळे शेंडे आणि फळे योग्यरीत्या विकसित होत नसल्याने उत्पादनावर परिणाम होतो. ते दिसायला मच्छरासारखे असल्याने त्यांना मच्छरकीड असे म्हटले जाते.


प्रतिबंधक उपाय

  • किडीस अनुकूल काळात आपल्या झाडांची नियमित पहाणी करत चला.
  • पिवळे चिकट सापळे (१६-२० प्रति हेक्टर) लावा.
  • झाडांचे प्रभावित भाग खुडून नष्ट करा.
  • हवा चांगली खेळती रहाण्यासाठी नियमित छाटणी करा.
  • आजुबाजूचा भाग तणमुक्त राखा.
  • हवामानावर लक्ष ठेवा - आर्द्र काळात हल्ला गृहित धरा.
  • झाडांचे गळलेले अवशेष गोळा करुन नष्ट करा.
  • संक्रमण पसरु नये म्हणुन दाटीने लावलेल्या झाडांच्या फळांना पिशव्यांनी आच्छादित करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा