कॉफीच्या फळांवरील रोग

कॉफी

कॉफीच्या फळांवरील रोग

Colletotrichum kahawae

बुरशी

थोडक्यात

  • फळांच्या वरच्या बाजूला टाचणीइतकी बारीक छिद्रे दिसतात.
  • हिरव्या फळांवर गडद खोलगट व्रण दिसतात.
  • फळे कोरडी होऊन अकाली गळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
कॉफी

कॉफीच्या फळांवरील रोग

कॉफी

लक्षणे

फळांवर गडद दबलेले डाग येतात, ज्यामुळे ती अकालीच आकसून गळतात. ह्यामुळे क्वचितच पानांवरही प्रभाव पडतो. झाड वाढीच्या सर्व टप्प्यांवर रोग संक्रमण करु शकतो. फुलधारणेच्या काळातही रोग संक्रमण करु शकतो पण लक्षणे फक्त हिरव्या आणि पक्व फळांवरच दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

प्रतिकारक वाण लावा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फुलधारणेच्या काळात पहिली फवारणी करा. रोगाचे नियंत्रण करण्यात मदत मिळविण्यासाठी कॉपर असणार्‍या बुरशीनाशकांची फवारणी एक महिन्या आड करा. जर आपण प्रतिबंधक उपचार केले नसतील तर सुरवातीची लक्षणे दिसताच सुरवात करा.

कशामुळे झाले

कलेक्टोट्रिचम काहावे नावाच्या बुरशीमुळे नुकसान उद्भवते. हिचा प्रसार पावसाच्या उडणार्‍या पण्याने, कॉफी वेचणार्‍यांद्वारे, पक्ष्यांमुळे आणि संक्रमित रोपांची ने-आण केल्याने होतो. हा एक गंभीर रोग आहे ज्यामुळे उत्पन्नाचे ८०% पर्यंत नुकसान होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • स्वच्छ आणि वेळीच तोडा करावा.
  • वाणाप्रमाणे लागवडी करताना शिफारशीत अंतर वापरावे.
  • मोसमाव्यतिरिक्तची फळे काढुन गोळा करा.
  • रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी पाणी साचू देऊ नका.
  • जुन्या फांद्या आणि संक्रमित फळे काढुन टाका किंवा रोगाचे स्त्रोत कमी करा.
  • झाडीतुन हवा खेळती रहाण्यासाठी कॉफीची झाडे छाटा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा