कॉफी

कॉफीवरील नागअळी

Leucoptera sp.

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पानाच्या वरील पृष्ठभागावर अनियमित तपकिरी डाग येतात.
  • कॉफी पानांच्या त्वचेवर फिकट पिवळ्या रेषा दिसतात.
  • मोठे वाळलेले धब्बे दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
कॉफी

कॉफी

लक्षणे

सुरवातीला बोगदे बनतात आणि नंतर पृष्ठभागाचा मोठा भाग व्यापला जातो ज्यामुळे वाळलेले धब्बे दिसतात. ह्या बोगद्यातुन अळ्या असतात ज्या पानाच्या आतील भाग खात रहातात. पाने दूषित होतात आणि प्रकाश संश्र्लेषण होऊ शकत नाही. झाडांची पानगळ होते आणि अखेरीस वाळतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

पीक व्यवस्थापन पद्धती आणि जमिनीची रचना ह्यांचा प्रभाव कीड समुदायावर पडतो आणि नैसर्गिक भक्षकांनी पुरविलेली इको प्रणाली सेवा त्यांच्या विविधतेत आणि असंख्यतेत भर घालते. इकॉलॉजीकली गुंतागुंतीची कॉफी प्रणाली ही परजीवी वॅस्पस, मुंग्या आणि इतर भक्षकांच्या जास्त जैव विविधतेशी संबंधित आहे. तरीही ह्या नैसर्गिक भक्षकांना जैव नियंत्रण म्हणुन वापरण्याचा विशेष प्रयत्न केलेला दिसत नाही. कामगंध वापरुन किडींच्या नैसर्गिक वागण्यात हस्तक्षेप वा बाधीत केले जाऊ शकते ज्यामुळे किडींची लोकसंख्या कमी होईल.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सध्या कॉफीची लागवड करणारे ऑर्गॅनोफॉस्फेटस, कार्बामेटस, पयरेथ्रॉइड, नियोनिकोटिनॉइडस आणि डायामाइडस सारखे न्यूरोटॉक्झिक कीटनाशक वापरतात. तरीही रसायनिक नियंत्रण हे अपुरे आहे आणि त्यांच्या वापराने कीडींत प्रतिकार निर्माण झाल्याने त्यांचा प्रभावीपणा कमी होतो.

कशामुळे झाले

कॉफी नागअळी (सीएलएम) च्या अळ्यांमुळे नुकसान उद्भवते ज्या फक्त कॉफीचीच पाने खातात. प्रौढ रात्री संभोग करतात आणि माद्या कॉफीच्या पानांच्या वरील पृष्ठभागावर अंडी घालतात. २० अंश तापमानात अंडी घालण्यापूर्वीचा काळ ३.६ दिवस असतो, प्रत्येक अंडे सुमारे ०.३ मि.मी. असते आणि नुसत्या डोळ्यांनी ती दिसण्यास कठिण असतात. ऊबल्यानंतर अळ्या अंड्याच्या पानांवरील बाजुने बाहेर पडतात आणि पानांत शिरतात. अळ्या पारदर्शक असतात आणि ३.५ मि.मी. लांबीपर्यंत वाढु शकतात. अळ्या पानांतील मेसोफिल द्रव्य खातात आणि पानांत बोगदे करतात. ह्या बोगद्यांमुळे पाने वाळणे आणि पानांच्या पृष्ठभागातुन प्रकाश संश्र्लेषण कमी होणे असे घडते. ह्यामुळे झाडाचा एकुणच प्रकाश संश्र्लेषण दर कमी होतो आणि झाड हळुहळु मरते. अळ्यांचे चार टप्पे आहेत. बोगद्यातुन बाहेर पडताना अळ्या बहुधा पानांच्या देठांच्या भागात X आकाराचे रेशमी कोष तयार करतात. झाडाच्या खालच्या बाजुला जिथे वाळलेली पाने जमा झालेली असतात तिथल्या पानांवर बहुधा कोष जास्त असतात. कोषातुन प्रौढ बाहेर पडतात. त्यांच्या शरीराची लांबी सरासी २ मि.मी. आणि पंखांची व्याप्ती ६.५ मि.मी. असते. त्यांच्या अंगावर पांढर्‍या केसांचे खवले असुन लांब मिशा असतात ज्या ओटीपोटाच्या शेवटापर्यंत पोचतात आणि पंख तपकिरीसर पांढरे झालरवाले असतात. कोषातुन बाहेर आल्यानंतर प्रौढ संभोग करुन अंडी घालतात ज्याने चक्र पुन्हा सुरु होते. ह्या किडीला कोरडा मोसम आणि जास्त तापमान भावते.


प्रतिबंधक उपाय

  • आदर्शपणे, नाग अळीची वर्षभरात वाढती लोकसंख्या प्रतिबंधित करण्यासाठी पहिल्याच पिढीचे नियंत्रण प्रभावीपणे करावे.
  • डेल्टा सापळे वापरुन किडींच्या लोकसंख्येचे नियंत्रण करण्यासाठी नियमित निरीक्षण करत चला.

प्लँटिक्स डाऊनलोड करा