कॉफी

डोळ्यांसारखे तपकिरी ठिपके

Mycosphaerella coffeicola

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर पिवळ्या प्रभावळीचे तपकिरी ठिपके दिसतात, फळांवर हे ठिपके बारीक असतात.
  • गंभीर संक्रमण झाल्यास पानगळ आणि खोडमर लवकर होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
कॉफी

कॉफी

लक्षणे

पानांवर सुमारे १५ मि.मी. रुंदीचे गोलाकार, फिकट तपकिरी/राखाडी केंद्रांचे, सभोवताली जाड गडद तपकीरी वर्तुळ असलेले आणि पिवळ्या प्रभावळीचे तपकिरी ठिपके येतात. हे ठिपके बहुधा शिरांमध्ये असतात तसेच कडांपाशीही असतात. काहीवेळा ठिपके वाढुन मोठे धब्बे तयार होतात आणि पानावर करपा होतो. असे बहुधा सुमारे ६०० मी. उंचीवरील थंड, ओल्या भागात होते. फळांवरील संक्रमण बहुधा छोटे, सुमारे ५ मि.मी. रुंद असते पण काही वेळेस ते पूर्ण फळास झाकोळते. सामान्यपणे त्यांचा आकार हा पानांवरील आकारापेक्षा जास्त बेढब असतो आणि मुख्यकरुन सूर्यप्रकाश पडणार्‍या भागात दिसतो. गंभीर बाबतीत, अकाली पानगळ आणि खोडमरही होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजपर्यंत तरी या रोगावर कोणतेही जैविक नियंत्रण उपचार माहितीत नाहीत. आपल्यास माहिती असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर गरज भासलीच तर कॉपर्स किंवा ट्रायझोल्ससारखे उत्पाद वापरा. फुलधारणेच्या सुरवातीपासुन कॉपरची फवारणी तीन महिने करा. टीप: कॉपर बुरशीनाशकांमुळे मित्र किडी मरु शकतात.

कशामुळे झाले

मायकोस्फेरेला कॉफिकोला नावाच्या बुरशीमुळे ठिपके येतात. हिला जास्त आर्द्रता, जास्त पाऊस, उबदार तापमान आणि दुष्काळाचा ताण, खासकरुन फुलधारणेच्या काळात, आवडतो. पानांच्या अवशेषांत जंतु रहातात. बीजाणूंचा प्रसार वार्‍याने, पावसाच्या उडणार्‍या पाण्याने आणि शेतातील मानवी हालचालींनी होतो खास करुन जेव्हा पाने ओली असतात आणि बीजाणू अंकुरण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. कोवळी आणि सावलीत नसलेली झाडे जास्त संवेदनशील असतात.


प्रतिबंधक उपाय

  • रोपवाटिकेत सुमारे ३५-६५% सावली सह पुरेशी जागा व खेळती हवा असु द्या.
  • पुरेसे अन्नद्रव्य खासकरुन नत्र आणि पलाश द्या.
  • पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या.
  • लागवडीच्या जागेतुन पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या आणि शिफारशीत अन्नद्रव्ये देऊन झाडांवरील ताण कमी करा.
  • झाडीत हवा चांगली खेळण्यासाठी छाटणी करा.
  • संभावित पुनर्संक्रमण टाळण्यासाठी छाटणी केलेला कचरा शेतातुन काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा