टोमॅटो

अँथ्रॅकनोज बुरशी

Colletotrichum spp.

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पान, फांद्या, शेंगा किंवा फळांवर पाणी शोषल्यासारखे डाग येतात.
  • अंडाकृती डागांभोवती स्पष्ट दिसणार्‍या रंगीत कडा येतात.
  • फांदीचा खालचा भाग गडद तपकीरी आणि खडबडीत होतो.
  • गंभीर प्रकरणात पानगळ, झाड कोलमडणे किंवा फांद्यांची शेंडे मर होते.

मध्ये देखील मिळू शकते

25 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
केळी
अधिक

टोमॅटो

लक्षणे

पिकाचा प्रकार, वाण आणि हवामान परिस्थितीचा प्रभाव लक्षणांच्या गंभीरतेवर होतो. पान, फांद्या, शेंगा किंवा फळांवर राखाडी ते गव्हाळ डाग येतात. हे डाग गोलाकार, अंडाकृती किंवा अनियमित आकाराचे असु शकतात आणि त्यांच्या कडा गडद तपकिरी, लालसर किंवा जांभळट असतात. अनुकूल हवामान परिस्थितीत, डागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, ते मोठे होऊन एकमेकात मिसळतात, नंतर गडद तपकिरी किंवा काळे होतात. त्यांचे केंद्र हळुहळु राखाडीसर होत जाते आणि संक्रमणाच्या नंतरच्या टप्प्यावर, त्यात काळे सूक्ष्म ठिपके पसरतात. पानांच्या मध्यशीरांची लालसर रंगहीनताही काही पिकात सहसा दिसते. गंभीर बाबतीत पाने मरगळतात, वाळतात आणि गळतात ज्यामुळे झाडाची अकाली पानगळ होते. फांद्यांवरील डाग लांबट, खोलगट आणि तपकिरीसर असतात तसेच कडाही गडद असतात. जसे ते मोठे होतात, तसे हे डाग खोडाच्या बुडाला वेढतात, ज्यामुळे झाड मरगळते आणि कोलमडते. खोडाची किंवा फांद्यांची शेंडेमर सहसा दिसुन येते.

Recommendations

जैविक नियंत्रण

बियाणांना पेरणीपूर्वी कोमट पाण्यात (तापमान आणि वेळ पिकावर अवलंबुन आहे) बुडवुन रोगाचा प्रसार प्रतिबंधित करता येतो. निम तेलाची फवारणी केली जाऊ शकते. संक्रमणाचे नियंत्रण करण्यासाठी जैविक एजंटसची देखील मदत घेतली जाऊ शकते. ट्रायकोडर्मा हरझियानम बुरशी आणि स्युडोमोनाज फ्ल्युरोसेन्स जीवाणू, बॅसिलस सबटिलिस किंवा बी. मायलोलिक्वेफेशियनवर आधारीत उत्पादांचा वापरही बीजोपचाराचा भाग म्हणुन केला जाऊ शकतो. रोगाच्या विरोधात सेंद्रीयरीत्या मान्य कॉपर द्रावणाची विविध प्रकारच्या पिकांमध्ये फवारणी केली जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सकाळी लवकर फवारणी करा आणि उष्ण हवामानात फवारणी टाळा. तसेच पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करा. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करुन बुरशीला मारता येते. अॅझॉक्सिस्ट्रोबिन, बॉस्कॅलिड, क्लोरोथॅलोनिल, मॅनेब, मँकोझेब किंवा प्रोथियोकोनाझोल असणार्‍या बुरशीनाशकांची फवारणी प्रतिबंधासाठी वापरुन संक्रमणाची जोखीम कमी केली जाऊ शकते (कृपया आपल्या पिकासाठीची ठराविक रसायने आणि शिफारशी तपासा). काही बाबतीत ह्यातील काही उत्पादांच्या प्रतिकार निर्माणाचे वर्णन केलेले आहे. काही पिकात, कोणतेही प्रभावात्मक उपचार उपलब्ध नाहीत. शेवटी, काढणीनंतरचे उपचार आणि त्यासह खाद्य श्रेणीतील मेण वापरुन फळे निर्यात करताना होणाऱ्या घटना टाळता येतात.

कशामुळे झाले

कोलेटोट्रिकम प्रजातीच्या बुरशीच्या अनेक प्रजातींमुळे लक्षणे उद्भवतात. ही जमिनीत, बियांशी निगडित किंवा झाडाच्या कचर्‍यात आणि पर्यायी यजमानात ४ वर्षांपर्यंत जगते. नविन झाडांवर याचे संक्रमण दोन प्रकारांनी होऊ शकते. जेव्हा जमिनीजन्य किंवा बियाणेजन्य बीजाणू कोवळ्या रोपांना ऊगवताना संक्रमित करतात आणि पद्धतशीरपणे रोपांच्या भागांबरोबर वाढतात हे प्राथमिक संक्रमण असते. तर दुसर्‍या प्रकारच्या संक्रमणात बीजाणूंचे वहन पावसाच्या उडणार्‍या थेंबांद्वारे झाडांच्या खालील पानांवर होते आणि तिथुन संक्रमण सुरु होऊन वर चढत जाते. दुय्यम संक्रमणात जेव्हा पानांत किंवा फळात बीजाणू तयार होतात आणि पाऊस, दव, रस शोषक किडींद्वारे किंवा शेतातील कामगारांद्वारे वहन केले जातात. थंड ते ऊबदार तापमान (इष्टतम २० ते ३० अंश), जमिनीचा सामू जास्त असणे, पाने जास्त काळ ओली रहाणे, वारंवार पाऊस पडणे आणि दाट झाडी या रोगास अनुकूल असतात. संतुलित खत नियोजनामुळे पिके अँथ्रॅकनोज बुरशीने कमी प्रभावित होतात.


प्रतिबंधक उपाय

  • पाण्याचा चांगला निचरा होणार्‍या जमिनीत लागवड करा.
  • जमिनीत कंपोस्ट टाकून झाडांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यात मदत करा.
  • शक्य असल्यास कमी पावसाचे क्षेत्र लागवडीसाठी निवडा.
  • शेतातुन पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या.
  • निरोगी रोपांची किंवा प्रमाणित स्त्रोतांकडील बियाण्याची निवड करा.
  • जर आपल्या भागात उपलब्ध असेल तर जास्त प्रतिकारक वाण निवडा.
  • प्रतिकारक रोपांची लागवड करा किंवा निरोगी रोपेच लावा.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे किंवा बागेचे नियमित निरीक्षण करत चला.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण आणि स्वयंभू रोपे काढा.
  • टोमॅटो सारख्या उंच वाढणाऱ्या झाडांची बांधणी करा जेणेकरुन खोड व पाल्यात हवा चांगली खेळती राहील.
  • सापळा पिके किंवा झाडे शेताच्या आजुबाजुने लावा.
  • झाडांचा कचरा वगैरे काढुन शेतात किंवा बागेत चांगली स्वच्छता राखा.
  • पाने ओली असताना शेतात यंत्र आणि कामगारांची हालचाल टाळा.
  • आपली उपकरणे आणि हत्यारे चांगली काळजीपूर्वक स्वच्छ करा.
  • रोगाचा प्रसार टाळण्यासाठी झाडी ओली असताना शेतात काम करु नका तसेच वापरानंतर सगळी कृषी अवजारे निर्जंतुक (एक भाग ब्लीच प्रति ४ भाग पाणी) करण्याची खात्री करा. जर सिंचनाची गरज भासली तर सकाळी लवकर करा म्हणजे संध्याकाळपूर्वी पाने कोरडी होतील.
  • तुषार सिंचनाऐवजी ठिबक सिंचनाने पाणी द्या.
  • रोपे ओली असताना त्यांना हात लावु नका.
  • अतिखराब लक्षणे टाळण्यासाठी लवकर काढणी करा.
  • फळांना चांगल्या हवेशीर जागी साठवा.
  • झाडांचा कचरा जमिनीवर सोडा ज्यामुळे बुरशीचे विघटन तिथे लवकर होईल.
  • किंवा झाडांचा कचरा चांगल्या विघटनासाठी जमिनीत खोल पुरा.
  • यजमान नसलेल्या पिकांसह (३-४ वर्ष किंवा जास्त) पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा