ढोबळी मिरची आणि मिरची

मिरचीवरील चोनेफोरा करपा

Choanephora cucurbitarum

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • बुरशी बहुधा झाडाच्या वरच्या भागास प्रथम संक्रमित करते आणि नंतर खाली वाढत जाते.
  • पान आणि कळ्या ओलसर आणि रुपेरी होतात आणि कुजू लागतात.
  • फळांचे बहुदा बुडाकडील भाग तपकिरी ते काळे होतात.
  • बुरशीच्या वाढीचे थर संक्रमित भागात सहज दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

21 पिके
द्वीदल धान्य
कारले
कोबी
फुलकोबी
अधिक

ढोबळी मिरची आणि मिरची

लक्षणे

फुल, कळ्या किंवा शेंडे गडद होऊन मरगळणे (फुलोर्‍यावरील करपा) ही सुरुवातीच्या लक्षणांची वैशिष्ट्ये आहेत. रोगाचा प्रसार वरुन खाली होतो व पानांवर पाणी शोषल्यासारखे डाग येतात ज्यामुळे त्यांना रुपेरी छटा प्राप्त होते. जुने डाग करपतात आणि वाळल्यासारखे दिसतात ज्यामुळे पानाचा टोक आणि कडा करपतात. फांद्यांवर कुजीची लक्षणे, तपकिरी ते काळ्या चट्ट्यात दिसतात आणि मर होते. अखेरीस संपूर्ण झाडाची मर होते. काळी मऊ कूज कोवळ्या फळांवर बहुधा बुडाकडील भागात विकसित होते. जवळुन निरीक्षण केल्यास रुपेरी, केसासारखी वाढ संक्रमित भागात दिसते. झाडांमध्ये लक्षणे फायटोप्थोरा करप्यासारखी दिसतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

या रोगावर चांगले असे जैविक उपाय नाहीत. बेनिनमध्ये बॅसिलस सबटिलिस जिवाणूला त्याच्या विरोधक प्रभाव चाचणीसाठी चोनेफोरा कुकुरबिटॅरमविरुद्ध सकारात्मपणे वापरण्यात आले आहे. तथापि मिरचीवर याची चाचणी अजुनतरी करण्यात आलेली नाही.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या रोगावर कोणतेही बुरशीनाशक नसल्याने प्रतिबंध करणे हाच मंत्र आहे. बुरशीनाशकांचा वापर करुन लक्षणे कमी होण्यात मदत होऊ शकते पण हे व्यवहार्य नाही कारण झाडाला सातत्याने फुले येत असतात आणि म्हणुन या जंतुला संवेदनशील असतात.

कशामुळे झाले

चोनेफोरा कुकुरबिटॅरम नावाच्या संधीसाधु बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात जी मुख्यतः किडी किंवा शेतकामादरम्यान झालेल्या जखमांद्वारे आत प्रवेश करते. तिचे बीजाणू वारा, उडणार्‍या पाण्याचे थेंब, कपडे आणि शेतकामाच्या उपकरणांद्वारे पसरतात. रोगाचा उद्रेक बहुधा जास्त लांबलेला पावसाळी काळ, जास्त आर्द्रता आणि जास्त तापमान असताना होतो. म्हणुनच उष्ण कटिबंधीय हवामानात पावसाळ्यात लागवड केलेल्या मिरचीचा सर्वात मोठा नुकसान होतो. या परिस्थितीशी जास्त जुळवुन न घेतलेली पिके जास्त संवेदनशील असतात. फायटोप्थोरा करप्यापासुन वेगळा ओळखण्यासाठी (शक्य तो सकाळी) प्रभावित भागात राखाडीसर केस दिसतायत का ते निरीक्षण करा.


प्रतिबंधक उपाय

  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे निरीक्षण करा.
  • शेतातील आणि आजुबाजुचे पर्यायी यजमान आणि तण काढा.
  • शक्य असल्यास जमीन भुसभुशीत करा आणि निचरा चांगला होऊ द्या.
  • लागवड करताना रोपाच्या बुडाजवळ खळगे रहाणार नाहीत याची काळजी घ्या.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा आणि सरी वरंबे काढा.
  • तुषार सिंचन टाळा आणि पाने शक्य तितकी कोरडी ठेवा.
  • झाडीची वाढ करणारी पोषके जास्त देऊ नका.
  • संवेदनशील नसलेल्या पिकांसह पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा