ऊस

ऊसावरील पायरिला

Pyrilla perpusilla

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • हिरवे ते तपकिरी किडे पानांच्या खालच्या बाजुने खातात.
  • पाने पिवळसर होतात आणि मरतात, रोपे खुजी होतात.
  • मधाळ रस उत्पादन आणि काळी काजळी बुरशी पानांच्या पृष्ठभागावर दिसते.
  • मक्याव्यतिरिक्त ते इतर गवती प्रजातींवर आणि धान्यांवरही सहजपणे हल्ला करतात.

मध्ये देखील मिळू शकते


ऊस

लक्षणे

पानांच्या खालच्या बाजुने रस पिताना उपद्रवास पाहिले जाऊ शकते. ह्यामुळे पाने प्रथम पिवळी पडतात आणि मग मरतात. संक्रमण कमी असल्यास पिवळे धब्बे पानांच्या पृष्ठभागावर दिसतात. प्रकाश संश्र्लेषण कमी झाल्याने रोपे खुजी होतात. तुडतुडे मधाळ रसही सोडत असल्याने त्याचा थरही पृष्ठभागावर दिसतो. ह्यावर संधीसाधु बुरशी आकर्षित होते जिच्या वाढीमुळे पाने काळी पडतात. ह्यामुळे प्रकाश संश्र्लेषण जास्तच कमी होते ज्यामुळे उत्पन्नाचे नुकसान होते. मक्याव्यतिरिक्त ऊस, बाजरी, भात, बार्ली, ओटस, ज्वारी, बाजरी आणि जंगली गवतांना सहजपणे संक्रमित करते.

Recommendations

जैविक नियंत्रण

पुष्कळसे परजीवी ह्यांच्या अंड्यांना आणि पिल्लांना खातात. टेट्रास्टिचस पायरिले, चहिलोन्युरस पायरिले, ऊएनसिरटस पायरिले, ओ. पिपिलियोनस आणि अॅगोनियास्पिस पायरिले अंड्यांवर हल्ला करणार्‍या परजीवीत येतात. लेस्टोड्रिनस पायरिले, पायरिलोक्झेनॉस ओम्पॅक्टस, क्लोरोड्रिनस पायलिडस, एपिरिकानिया मेलॅनोल्युका हे पिल्लांवर हल्ला करतात. कोसिनेला सेप्थेम्प्युनक्टाटा, चिलोमेनेस सेक्समॅक्युलाटा, ब्रुमस स्युच्युरॅलिस सारख्या लेडीबर्डच्या पुष्कळशा प्रजाती ह्या किड्यांच्या शिकार्‍यात येतात. निंबोवा बॅसिप्युन्कटाटा, गोनियोप्टेरिक्स प्युसाना अंड्यांचे शिकारी आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मॅलेथियॉन असणारे उत्पाद ह्या उपद्रवाविरुद्ध परिणामकारक आहे.

कशामुळे झाले

पायरिला पेर्पुसिलाच्या प्रौढांमुळे नुकसान होते, जे रोपांवरील फार सक्रिय तुडतुडे आहेत आणि त्यांचे प्रजनन वर्षभर होत असल्याने एका शेतातुन दुसर्‍या शेतातही जाऊ शकतात, ज्यामुळे मोठे नुकसान होते. प्रौढ हिरवट ते पिवळ्या गवती रंगाचे असुन लांबीला सुमारे ७-८ मि.मी. असतात. ते आधाशीपणे रोपांना खाताना आढळतात आणि हलविल्यास चटकन उड्या मारत पळतात. त्यांच्या टोकेरी सोंडा तोंडात लपलेल्या असतात ज्या खुपसुन ते रोपातील भाग शोषतात. उच्च आर्द्रता आणि रोपाची झपाट्याने होणारी वाढ ह्या उपद्रवाच्या फैलावास अनुकूल आहे, उदा. जास्त शेणखत किंवा खत दिलेले शेत. जास्त सिंचन किंवा पावसाळी मोसमही ह्यांच्या फोफावण्यात योगदान देतो.


प्रतिबंधक उपाय

  • उपद्रवाच्या लक्षणांसाठी शेताचे नियमितपणे निरीक्षण करा.
  • काढणीनंतर संक्रमित रोपे काढुन जाळुन टाका.
  • मित्र किड्यांवर विपरित परिणाम होईल म्हणुन विस्तृत श्रेणीची कीटनाशके वापरु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा