ऊस

ऊसाच्या पानावरील जिवाणूजन्य करपा

Acidovorax avenae

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर मध्यशीरांना लागुन आणि पानाच्या बुडाशी पाणेरी हिरवे पट्टे उमटतात.
  • लालसर पट्टे नंतर पूर्ण पानावर पसरतात.
  • पाने सुकतात आणि कुजतात.
  • मूळ प्रणाली कमी होते.
  • वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते


ऊस

लक्षणे

बहुतकरुन कोवळ्या आणि मध्यम वयाच्या पानांवर हा रोग येतो. लांब, अरुंद, समान आणि पाणेरी हिरवे पट्टे पहिल्यांदा मध्य शिरेच्या बाजुने आणि पानाच्या पात्याच्या बुडाशी येतात. रोगाच्या नंतरच्या टप्प्यावर पट्टे पूर्ण पानावर पसरतात, एकमेकात मिसळतात आणि पहिल्यांदा फिकट आणि नंतर गडद लाल रंगाचे ( करपलेले) होतात. पाने सुकतात, कुजतात आणि घाणेरडा वास सोडतात. जसजसे खोडात कुजणे वाढते तसतसे सांध्याच्या मधल्या जागेत मोठ्या पोकळ्या निर्माण होतात. रोगाच्या नंतरच्या टप्प्यावर, शेंडे आणि फुलोरा जमिनीवर गळुन पडतो ह्या लक्षणाला शेंडेकूज असेही म्हणतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजतागायत तरी कोणतेही परिणामकारक जैव नियंत्रण पद्धती उपलब्ध नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. प्राथमिक संक्रमण टाळण्यासाठी बियाणांना योग्य बुरशीनाशकाचे उपचार १५ ते २० मिनीटांसाठी केले जाऊ शकतात.

कशामुळे झाले

उच्च आद्रता आणि उच्च तापमान ह्या जंतुना भावते. प्राथमिक संक्रमण जमिनीतुन, दूषित मातीद्वारे होते तर दुय्यम संक्रमण हवा, पावसाचे उडणारे पाणी आणि जमिनीतुन होते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिरोधक वाणाची लागवड करा.
  • निरोगी पेरणीचे साहित्य रोपवाटिकेतुन मिळवा.
  • हिरव्या खतांच्या पिकांसह मोठी पीक फिरवणी करा.
  • पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या ज्यामुळे रोगाच्या घटना कमी होतील.
  • मध्यम प्रमाणात नत्रयुक्त खते द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा