बाजरी

बाजरीवरील काणी /काजळी

Moesziomyces bullatus

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • दाणे हिरव्या बीजाणूफळात (बुरशीच्या बीजाणूच्या बीजकोषात) बदलतात.
  • नंतर बुरशी काळी पडते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

बाजरी

लक्षणे

बाजरीचे दाणे हिरव्या बीजाणूफळात बदलतात. हे धान्याच्या दाण्यांपेक्षा मोठे असतात आणि लंबगोलाकार / शंकुच्या आकाराच्या (मुरमुरे सारखे) बीजकोशांसारखे दिसतात. जसजसा रोग वाढत जातो तसतशी बीजाणूफळे काळी पडतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

मोस्झियोमायसेस ब्युलाटसच्या विरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

आर्थिक दृष्टिकोनातून, रासायनिक उपचार व्यवहार्य नाहीत.

कशामुळे झाले

ह्या रोगाचे संक्रमण बियाणांद्वारे होते.


प्रतिबंधक उपाय

  • डब्ल्युसी-सी७५, आयसीएमएस ७७०३, आयसीटीपी ८२०३ आणि आयसीएमव्ही १५५ सारख्या प्रतिकारक वाणांची निवड करा.
  • निरोगी बियाणे वापरा.
  • नत्रयुक्त खतांचा अधिक वापर टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा