कापूस

वनस्पतीनाशकांमुळे नुकसान

Herbicides Growth Regulators

इतर

5 mins to read

थोडक्यात

  • पाने विकृत होतात, फांद्या आणि देठ तसेच शिरा (पट्टे पडणे) लांबतात.
  • पाने रंगहीन होतात.

मध्ये देखील मिळू शकते


कापूस

लक्षणे

लक्षणे जास्त करुन कोवळ्या, वाढत्या पानांत दिसतात आणि दुमडणे, वाकणे किंवा पाती गोळा होणे अशी वैशिष्ट्यपूर्ण असतात. फांद्या आणि देठ (पट्टे) लांबतात आणि पृष्ठभागावर फोड विकसित होतात त्यामुळे 'चाबकासारखी' किंवा 'चेटकीच्या हातासारखी' दिसतात. पानांच्या शिरा एकमेकात मिसळुन जाण्याऐवजी एकमेकांना समांतर जातात आणि पानाची झपाट्याने रंगहीनता होते. ही रंगहीनता बहुधा पिवळी ते पांढरी ते तपकिरी, दिसते. जुनी पाने किंवा विकसित बोंडात कोणतेही नुकसान दिसुन येत नाही.

Recommendations

जैविक नियंत्रण

या परिस्थितीसाठी कोणतेही जैविक उपचार उपलब्ध नाहीत. सर्वप्रथमत: नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंध आणि चांगल्या कृषी सवयी वागविणे हीच गुरुकिल्ली आहे. जर प्रमाण जास्त झाल्याची शंका असेल तर झाडाला चांगले धुण्याने मदत मिळु शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. तणनाशकांची फवारणी योजना करण्यापूर्वी, तण कोणते आहेत (मुख्यत: रुंद पानांचे कि गवती) ते समजुन घ्या आणि या हेतुसाठी इतर काही चांगला उपाय नाही का हे ही समजुन घ्या. तणनाशकाची निवड काळजीपूर्वक करा, लेबल काळजीपूर्वक वाचा आणि प्रमाण व सूचना त्यावर दिल्याप्रमाणे पाळा.

कशामुळे झाले

कपाशीची झाडे खासकरुन गॉसिपियम हिरसुटम आणि पिमा कापुस जी. बार्बाडेन्स नावांचा उंचावरील कापुस २,४-डी किंवा डायकॅम्बाला खूप संवेदनशील असतात. ही तणनाशके फेनॉक्सी अॅसेटिक अॅसिडस किंवा सिंथेटिक ऑक्झिन (गट I )ची असतात आणि रुंद पानांच्या तणांचे नियंत्रण करण्यासाठी वापरली जातात. अयोग्य वेळ, चुकीच्या द्रावणांची निवड किंवा फक्त अयोग्य हवामान परिस्थिती यामुळे कपाशीच्या झाडांवर झोत जाऊ शकतो. बाजुच्या शेतातुनही दूषितता होऊ शकते. चुकीच्या शेतकी सवयींमुळे झाडांवर आधीच पडलेल्या ताणाने लक्षणे आणखी ठळक होतात. लक्षणे किती काळ दिसू शकतात हे वापराचा प्रमाणावर अवलंबून असते आणि प्रमाण विशेषतः उच्च असल्यास काही पेरे ते संपूर्ण झाडापर्यंत असू शकतात. तणनाशकांची कमी मात्रा देखील पिकांना नुकसान करु शकते हे समजणे फार महत्वाचे आहे.


प्रतिबंधक उपाय

  • कोणत्या प्रकारचे तण आहेत (मुख्यत: रुंद पाने विरुद्ध गवती तण) याची खात्री करा.
  • आपल्या हेतुसाठी तणनाशके काळजीपूर्वक निवडा.
  • लेबल काळजीपूर्वक वाचुन त्यावरील प्रमाण आणि सूचनांचे पालन करा.
  • नेहमी फवारा (पंप) वापरल्यानंतर स्वच्छ करा म्हणजे वेगळ्या तणनाशकांची दूषितता होणार नाही.
  • शेतात वार्‍याने उडु नयेत म्हणुन जोराचा वारा असताना फवारणी करणे टाळा.
  • झोक कमी करणारी स्प्रे नोझल वापरा ज्यामुळे तणांना योग्य रीतीने लक्ष्य करता येईल.
  • तणनाशकांची चाचणी पडीक ठिकाणी करून परिणाम जाणून घ्या.
  • हवामान अंदाज काळजीपूर्वक तपासा आणि तापमान वाढण्याची आणि/किंवा आर्द्रतेची शक्यता असल्यास फवारणी करु नका.
  • फवारणी केलेली तारीख, उत्पाद, शेतातील जागा आणि हवामान परिस्थितीची नोंद ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा