टोमॅटो

तंबाखूवरील मोझाईक व्हायरस

TMV

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • संक्रमित पाने वेडीवाकडी होतात.
  • पानांवर हिरवे आणि पिवळे चट्टे येतात.
  • झाडांची वाढ विविध प्रमाणात खुंटते व फळधारणा खूप कमी होते.
  • पक्व होत असलेल्या फळांवर तपकिरी ठिपके येतात व गरामध्ये तपकिरी धब्बे दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके

टोमॅटो

लक्षणे

रोपाच्या वाढीच्या कोणत्याही काळात झाडाच्या कोणत्याही भागावर संक्रमण होऊ शकते. हवामान परिस्थितीवर (प्रकाश, दिवस किती मोठे आहेत, तापमान) लक्षणे अवलंबुन असतात. संक्रमित पानांवर हिरवे आणि पिवळे चट्टे किंवा ठिगळाची संरचना दिसते. कोवळी पाने थोडी विकृत असतात. जुन्या पानांवर गडद हिरव्या रंगाचे उंचवटे दिसतात. खोडावर आणि देठांवर काही वेळा गडद करपलेले पट्टे दिसतात. झाडांची वाढ विविध प्रमाणात खुंटते व फळधारणा खूप कमी होते. असमानपणे परिपक्व होऊन फळांवर तपकिरी ठिपके येतात व गरामध्ये तपकिरी धब्बे दिसतात. उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

बियाणे ७० डिग्री सेल्शियसच्या तापमानात ४ दिवस ठेवल्याने किंवा ८२-८५ डिग्री सेल्शियसच्या तापमानात २४ तास ठेवल्याने ह्या विषाणूचा नायनाट करता येतो. किंवा बियाणे ट्रायसोडियम फॉस्फेट १०० ग्रॅम प्रति लिटर द्रावणात १५ मिनिटे भिजवुन नंतर पाण्याने स्वच्छ धुवुन वाळवल्यासही विषाणूचे नियंत्रण होऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या रोगा विरुद्ध कोणतेही परिणामकारक रसायनिक उपचार उपलब्ध नाही.

कशामुळे झाले

हे विषाणू झाडात किंवा कोरड्या जमिनीतील मुळांच्या अवशेषात २ वर्षांपर्यंत (१ महिना बहुतेक प्रकारच्या जमिनीत) जगु शकतात. हे रोगाचे संक्रमण मुळांना झालेल्या बारीक जखमांमुळे देखील होऊ शकते. विषाणूचा प्रसार, संक्रमित बियाणे व रोप, तण आणि संक्रमित झाडांच्या भागांमुळे होऊ शकतो. वारा, पाऊस, नाकतोडे, बारीक सस्तन प्राणी आणि पक्षी ह्या विषाणूचे वहन एका शेतातुन दुसर्‍या शेतात करतात. रोप हाताळताना वापरलेल्या शेतीच्या वाईट सवयींमुळे देखील विषाणूचे वहन होते. दिवस किती मोठा आहे, तापमान आणि किती ऊन मिळते तसेच वाण आणि झाडाचे वय ह्यावर संक्रमणाची गंभीरता अवलंबुन आहे.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासुन धरलेले किंवा प्रमाणित स्त्रोतांकडील बियाणे वापरा.
  • प्रतिकारक किंवा सहनशील वाण लावा.
  • रोपवाटिकेतील मातीतुन विषाणूंचा नायनाट करण्यासाठी वाफ्यांचे निर्जंतुकीकरण करा.
  • ज्या शेतात पूर्वी संक्रमण झाले आहे तिथे लागवड करु नका.
  • रोपे हाताळताना हात स्वच्छ धुवा, हातमोजे वापरा आणि शेतकामाची हत्यारे आणि अवजारे निर्जंतुक करा.
  • टोमॅटोच्या झाडांजवळ तंबाखूचा वापर, (सेवन, धूम्रपान वगैरे) कोणत्याही प्रकाराने करु नका.
  • गादीवाफे आणि शेताचे निरीक्षण करुन संक्रमित रोपांना काढुन जाळुन टाका.
  • शेतातील आणि आजुबाजुनचे तण काढुन टाका.
  • पीक घेतल्यानंतर नांगरुन झाडांचे अवशेष काढुन जाळुन टाका.
  • टोमॅटोच्या जवळ पर्यायी यजमानांची झाडा लावु नका.
  • किमान दोन वर्षांसाठी तरी यजमान नसणार्‍या पिकाबरोबर पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा