वांगी

वांग्याच्या पानावरील सर्कोस्पोरा ठिपके

Cercospora melongenae

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • छोटे, गोल, पिवळे आणि थोडे खोलगट डाग पानाच्या वरच्या बाजुला दिसतात.
  • डाग मोठे होतात आणि एकमेकांत मिसळुन तपकिरी ओबडधोबड आकाराचे, पिवळसर कडांचे होतात.
  • जास्त लागणीने पाने मुडपतात आणि पाने कच्ची रहातात, नंतर गळतात.
  • जास्त लागणीने पीकाचे नुकसान होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

वांगी

लक्षणे

वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर लागण होऊ शकते ती पानांवर, देठांवर आणि फांद्यांवर दिसते. सुरवातीची लक्षणे, छोटे, गोल आणि थोडेसे खोलगट डाग जुन्या, खालच्या पानांच्या वरच्या बाजुस दिसतात. काही वेळानंतर ते डाग मोठे, ओबडधोबड होतात आणि भवताली पिवळ्या प्रभावळी असतात. नंतर हे डाग पानाच्या दोन्ही बाजुंनी दिसतात. जुने डाग एकमेकात मिसळतात आणि पानावर त्यांचे स्थान कुठे आहे त्याप्रमाणे वेगळाच पैलु दर्शवितात. त्यांचा रंग तपकिरी ते राखाडीसर (पानांच्या वरच्या बाजुला) आणि हलका तपकिरी (पानांच्या खालच्या बाजुला) दिसतो. जर लागण जास्त असेल; तर पाने मुडपतात आणि गळु शकतात. जरी बुरशी फळांवर थेट संक्रमण करीत नसली तरी ह्यामुळे फळांची वाढ कमी होते कारण रोपाची उत्पादनक्षमता कमी होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

जैविक घटक संसर्गाचे नियंत्रण करण्यात मदत करु शकतात. बॅसिलस सबटिलिस स्ट्रेन क्युएसटी ७१३ ह्या जंतुंवर आधारीत जैव बुरशीनाशक पानांवरील फवारणीद्वारे वापरले जाऊ शकतात जे कर्सस्पोरा मेलोंगेनीशी स्पर्धा करतात. अझाडिराच्टा इन्डिका रोपाचे तेल (कडुनिंबाचे तेल) ह्या संसर्गाचे नियंत्रण करण्यातही मदत करु शकते.

रासायनिक नियंत्रण

रोगाच्या नियंत्रणासाठी नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा. जर कीटनाशकांची गरज असेल, तर उत्पाद ज्यात क्लोरोथॅलोनिल, मॅन्कोझेब किंवा ऑक्टॅनॉइक अॅसिड असेल आणि त्यांचे संयोग कॉपर सॉल्टबरोबर जमिनीत किंवा पानांवरील फवारणीसाठी वापरले जाऊ शकते.

कशामुळे झाले

सर्कोस्पोरा मेलोंगेनी ही रोपाची रोगजनक बुरशी आहे. बुरशीचे बीज पालापाचोळ्यात आणि जमिनीत किमान १ वर्ष तग धरते. नंतर ते विवध प्रकारांनी रोपाच्या खालच्या, जुन्या पानांवर नेले जातात. ते बहुधा वारा आणि पाणी (पाऊस किंवा फवारणी) ने पसरतात, पण ते संसर्गित हत्यारे आणि माणसांद्वारेही पसरतात. नंतर ते फांद्यांवर आणि नविन पानांवर जातात. आद्रता आणि उच्च दमटपणा त्यांच्या संसर्गास आणि वाढीस अनुकूल असतो. म्हणुन ते जास्त करुन पावसाळ्यात (ओल्या हवेत, सतत ओल्या रहाणार्‍या रोपात) आढळतात.


प्रतिबंधक उपाय

  • लवचिक, सहनशील किंवा प्रतिरोधक प्रकारांची वाण लावा.
  • निरोगी किंवा प्रमाणित कीडमुक्त बियाणे आणि रोपणीचे सामान वापरा.
  • रोपांमध्ये थोडी जास्त जागा सोडा ज्यामुळे हवा चांगली खेळती राहील आणि रोग पसरणार नाही.
  • पुरेसे खत द्या.
  • आद्रता कमी करण्यासाठी जास्त पाणी देऊ नका आणि फवार्‍यांनी उंचावरुन पाणी देऊ नका.
  • पाणी संध्याकाळऐवजी सकाळी द्या.
  • जेव्हा रोपे ओली असतात तेव्हा शेतात काम करणे टाळा.
  • तण जास्त वाढु देऊ नका.
  • रोगी रोपे आणि कचरा जाळुन किंवा नांगरुन नष्ट करा.
  • त्या काळात यजमान नसलेल्या पीकांबरोबर पीक फिरवणी करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा