Golovinomyces cichoracearum
बुरशी
खालील जुन्या पानांच्या वरील बाजूस पांढरे पावडरी डाग प्रथमतः दिसतात. डाग हळूहळू वाढतात आणि पूर्ण पान ग्रासतात. गंभीर संक्रमणात हा पावडरीसारखा थर पानांच्या खालच्या बाजुस आणि खोडावर देखील येऊ शकतो. प्रभावित पाने पिवळी पडतात, नंतर तपकिरी होतात आणि मग वाळतात. जास्त प्रमाणात संसर्ग झालेल्या झाडांमध्ये वाढ कमी होते आणि लवकर वृद्धत्व (कोमेजणे) दिसून येते. संसर्गाच्या प्रगत टप्प्यांवर पांढर्या धब्ब्यांमध्ये बारीक गडद गोलाकार रचना दिसते.
ट्रायकोडर्मा आणि बॅसिलस सबटिलिस प्रजातींवर आधारीत जैविक नियंत्रण घटक, गंधकवर आधारीत उत्पादने, पोटॅशियम बायकार्बोनेट रसायने किंवा नीम तेलाची फवारणी लवकर केल्यास मदत होऊ शकते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जैविक व पर्यावरणास अनुकूल अशा उपचार पद्धतीचा वापर करा. जेव्हा रोगाची प्रथम लक्षणे दिसतात व प्रतिबंधात्मक वापर केला जातो तेव्हाच बुरशीनाशके जास्त प्रभावी ठरतात. फवारणी करताना झाडीच्या आत पोचेल असे फवारा कारण जंतु एका झाडावरुन दुसर्या झाडावर त्वरित पसरतात. प्रतिकार निर्माण होऊ नये म्हणुन बुरशीनाशके आलटुन पालटुन वापरा.
बहुतेक बुरशीजन्य रोगांविरुद्ध, ही बुरशी ऊबदार, कोरड्या हवामानात कमी आर्द्रतेत फोफावते. ऊबदार दिवस आणि थंड रात्री हिच्या प्रसारास धार्जिण्या असतात. ही हवेतुनही सहज पसरते. ह्या बुरशीस लागण करण्यासाठी पानांच्या पृष्ठभागावर पाणी असण्याचीही गरज नसते. बिन हंगामाच्या काळात ही बुरशी संक्रमित झाडांच्या अवशेषांत आणि जंगली सूर्यफुलांसारख्या जंगली यजमान झाडांत जगते. दाट झाडी आणि हवा खेळण्याचा अभाव ह्यामुळे संसर्गाची जोखीम वाढते.