सुर्यफुलावरील व्हेर्टीसिलियम मर

सुर्यफूल

सुर्यफुलावरील व्हेर्टीसिलियम मर

Verticillium dahliae

बुरशी

थोडक्यात

  • खालपासुन सुरवात होऊन वरपर्यंत पाने पिवळी पडतात.
  • पिवळेपणा सुरवातीस फक्त एकाच बाजूस दिसतो.
  • जर खोड उभे कापले तर आत तपकिरी रंगहीनता दिसते.
  • वाढ खुंटते आणि झाडाची अकाली मर होते.

मध्ये देखील मिळू शकते

0 पिके

सुर्यफुलावरील व्हेर्टीसिलियम मर

सुर्यफूल

लक्षणे

पाने पिवळी होण्याची सुरवात खालील पानांपासुन होते. लक्षणे बहुधा झाडाच्या एकाच भागात किंवा पानाच्या अर्ध्या भागातच दिसतात. संक्रमित झाड दिवसासुद्धा, पाणी दिले तरी मरगळते. जसजसे झाड वाढते तसतसे बारीक गडद डाग खोडावर तसेच खोडाच्या आतही दिसु लागतात. गंभीरपणे संक्रमित झाडे वाढुन निरोगी झाडांपूर्वी वाळतात ज्यामुळे दाणे आणि उत्पादन कमी भरते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पूर्ण प्रभावी जैविक व सेंद्रीय नियंत्रण उपाय सध्यातरी उपलब्ध नाही. कंपोस्टसारखे सेंद्रीय पदार्थ जमिनीत टाकल्याने, मित्र जंतुंच्या गतिविधीस चालना मिळुन उपद्रवी जंतू दबले जातात. सौरीकरण: शेतातील बहुतेक ओल्या जमिनीवर दुपारच्या वेळी प्लास्टिक अंथरल्याने जमिनीच्या वरच्या थरातील बुरशी जंतुंची संख्या कमी होते.

रासायनिक नियंत्रण

सूर्यफुलांवरील व्हर्टिसिलियम मरच्या नियंत्रणासाठी रसायनिक उपचार अत्यंत कमी आहेत कारण, एकदा का झाड संक्रमित झाले कि कोणतेच पूर्ण प्रभावी बुरशीनाशक सध्यातरी उपलब्ध नाही. बियांणांवर पेरणीपूर्वी जर बुरशीनाशकांचे उपचार केले तर कदाचित मदत होऊ शकते. पेरणीच्या वेळी उपचार करा कारण जमिनीजन्य जंतुंसाठी पानांवरील फवारणी काहीच प्रभाव देऊ शकत नाही. रसायनिक नियंत्रण हे नेहमीच प्रतिबंधास पूरक म्हणुनच वापरले जावे, एकच उपाय म्हणुन कधीच वापरले जाऊ नये.

कशामुळे झाले

व्हर्टिसिलियम डेलिया नावाच्या जमिनीजन्य बुरशीमुळे हा रोग होतो. बुरशी ही जमिनीत तिच्या यजमान झाडाशिवायही जगू शकते. ही झाडाच्या मुळांद्वारे आत शिरते आणि पाण्याचा अंतर्प्रवाह थांबविते. ही माती, अवजारे, झाडांचे अवशेष आणि बियाणांद्वारे प्रसारित होते. थंड (१५ ते २५ डिग्री) तापमानाची जमीन, हंगामात जमिनीत असणारी अति आर्द्रता व त्यानंतर लगेच कोरडे हवामान आणि कमी सेंद्रीय पदार्थ असलेली हलकी जमीन असे घटक रोगास धार्जिणे असतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित, रोगमुक्त बियाणे वापरा तसेच व्हर्टिसिलियम मर रोगास सुधारीत सहनशील असणारी वाणे निवडा.
  • किमान ३-४ वर्षांसाठी तृणधान्यांसारखी ह्या रोगास बळी न पडणार्‍या पिकांसह पीक फेरपालट करा; टोमॅटो, बटाटे, कापूस आणि स्ट्रॉबेरीसारखी ह्या रोगास संवेदनशील असलेली पिके घेणे टाळा.
  • काढणीनंतर शेतातील पिकाचे सर्व अवशेष नष्ट करा.
  • एका शेतातुन दुसर्‍या शेतात काम करण्यापूर्वी सर्व अवजारे चांगली स्वच्छ करा.
  • शेतात पाणथळ होऊ नये म्हणुन पाण्याचा निचरा चांगला होईल असे सुधार करा आणि नत्रयुक्त खताचा अतिवापर टाळा.
  • शेतात तसेच आजुबाजूलाही तण नियंत्रण करा.
  • नियमितपणे शेताची पाहणी करत चला, खासकरुन खालच्या पानांवर लक्ष ठेवा तसेच एखाद्या झाडाच्या एकाच बाजूस पिवळेपणा किंवा मर दिसतेय का ते पहा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा