पानावरील तुडतुडे

भुईमूग

पानावरील तुडतुडे

Cicadellidae

किडा

थोडक्यात

  • पानाच्या पात्यांवर खाल्ल्याठिकाणी सुकलेले भाग दिसतात.
  • पानांच्या कडांवर पिवळे भाग दिसतात.
  • पाने मुडपतात.
  • वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते

22 पिके
सफरचंद
द्वीदल धान्य
कारले
कॅनोला
अधिक

पानावरील तुडतुडे

भुईमूग

लक्षणे

दुष्काळाचा ताण किंवा पोषणाच्या कमतरतेसारखीच रोपाची नुकसानाला प्रतिक्रिया असते. पानावरील तुडतुडे पानाच्या खालची बाजु खातात. खाल्ल्या जागेच्या आजुबाजुला पिवळे भाग विकसित होऊन जखमा तयार होतात आणि पाने कडेने किंचित मुडपतात. सामान्यपणे लक्षणांना "तुडतुड्यामुळे करपणे" (हॉप्परबर्न) असेही म्हटले जाते. नंतर पिवळे भाग पूर्ण पान ग्रासतात. पाने खालच्या बाजुला मुडपतात आणि अखेरीस गळतात. ह्यामुळे रोपाची वाढ खुंटते आणि फळांचे उत्पन्न कमी होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

परजीवी किड्यांच्या जाती जसे कि अॅनाग्रस अॅटोमसला जैव नियंत्रण पद्धत म्हणुन वापरा. लेडीबग्ज आणि लेसविंग्जसारखे खादाड शिकारी मित्र किडे अंडी आणि अळ्या दोन्ही खातात. मेटार्‍हिझियम अॅनिसोप्लिये, ब्युव्हेरिया बॅसियाना, पपेसिलोमाइस फ्युमोसोरोसियस आणि व्हर्टिसिलियम लेकानिसारख्या परजीवी बुरशीच्या प्रजाती असणार्‍या जैव कीटनाशकांचा वापर खूप जास्त संक्रमण असल्यास केला जातो. कीटनाशक साबणही काम करतात. स्पिनोसॅड ०.३५ मि.ली दराने वापरावे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. क्लोरपायरिफॉस (२.५ मि.ली/ली), फिप्रोनिल किंवा फ्लोनिकॅमिड सारख्या ठराविक कीटनाशकांनी बियाणांचे उपचार केल्यास पानावरील तुडतुड्यांची लोकसंख्या नियंत्रण करण्यात सकारात्मक परिणाम मिळतात. जमिनीत वापर केला असता तिथे रहाणारे किडे मरतात आणि मुळांवर हल्ला करु शकत नाहीत आणि रोपालाही संरक्षण मिळते. पेरणीनंतर ३०, ४५, ६० दिवसांनी केलेला वापर प्रतिबंधक उपचारात येतो. क्लोरँट्रॅनिलिप्रोल + लँब्डा-सायहॅलोथ्रिन ०.५ मि.ली. /ली. , लँब्डा- लँब्डा-सायहॅलोथ्रिन १मि.ली. /१ली. पाणी मिसळुन पिकाच्या नंतरच्या टप्प्यावरही वापरता येते.

कशामुळे झाले

अमारास्का नावाच्या पानावरील तुडतुड्यांमुळे नुकसान होते. हा बहुधा हरितगृहातील उपद्रव आहे आणि जरी संख्या कमी असली तरी नुकसान करतात. प्रौढ पानावरील तुडतुडे हिरवे, सुमारे ३-४ मि.मी. मोठे असतात आणि सदाहरित रोपात विश्रांती घेतात. माद्या पानांच्या खालच्या बाजुच्या शिरांच्या भागात अंडी घालतात. १ ते ४ अठवड्यात अळ्या ऊबुन बाहेर येतात. पिल्ले आणि प्रौढ त्यांच्या यजमान रोपांच्या भागांतुन शोषण करतात. शोषण करताना किडे विषारी संयुगे सोडतात ज्यामुळे रोपाच्या नसा अवरोधित होतात आणि म्हणुनच लक्षणे पाणी आणि पोषकांच्या कमतरतेसारखी दिसतात.


प्रतिबंधक उपाय

  • पानावरील तुडतुडे रोपांच्या भागात अंड्याच्या रुपाने सहजपणे लपुन रहात असल्याने निरोगी रोपे घेण्याची काळजी घ्या.
  • अळ्यांची कात पानांच्या खालच्या बाजुला दिसते का ते पहा.
  • अंडी किंवा रोपाचे संक्रमित भाग हाताने काढुन टाका.
  • किंवा पिवळे चिकट सापळे वापरा ज्याकडे हिरवे पानांवरील तुडतुडे आकर्षित होतात.
  • लेडिबग्ज आणि लेसविंग्जसारख्या मित्र किड्यांना अनुकूल असे वातावरण राखा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा