Alternaria helianthi
बुरशी
यजमान झाडांच्या पाने, फुलांचे कोष, बुंधे, फूल पाकळ्या आणि पुष्पकोषांच्या बाहेरील पाकळ्यांवर तपकिरी डाग दिसतात. बुरशीमुळे रोपांवर करपा येतो आणि फूलकूज रोगही होतो. पानांवरील डाग गडद तपकिरी, कडेने फिकट असुन पिवळी प्रभावळ दिसते. जसजसा रोग वाढतो तसतसे डागांचे मापही मोठे होऊन सुमारे २-३ सें.मी. व्यासाचे होते आणि अखेरीस हे डाग एकमेकात मिसळुन बेढब आकाराचे डाग होतात, ज्यामुळे करपा पडतो आणि पाने मरगळतात. डागांच्या सभोवतालील भाग करपल्यासारखे होऊन त्यांच्या मध्यभागी राखाडी पांढरट वाळलेली केंद्र तयार होतात. डाग प्रथमत: झाडाच्या खालील पानांवर दिसतात आणि नंतर मध्यावरील तसेच वरील पानांवर पसरतात. बुंध्यांवरील डाग हे गोलाकार, लांबुळके किंवा पट्टेरी आणि काळे असतात. पुष्पकोषाच्या बाहेरील पाकळ्यांवरील आणि फुलांच्या पाकळ्यांवरील डाग हे पानांवरील डागांसारखेच असतात पण लहान (०.५-२ सें.मी. व्यासाचे) असतात आणि नंतर एकमेकांत मिसळतात. ह्या संक्रमणामुळे करपा आणि पानगळ, फुले आणि दाण्यांच्या भागांचा नाश, मरगळ, बुंधा फुटणे आणि अखेरीस झाडाची मर होते. काही वेळा फुलांतील दाण्यांच्या भागाची कूजही होते.
शरद ऋतुपूर्वी काढणी झाल्यानंतर जमिनीची स्व-स्वच्छता धारणा वाढविण्यासाठी, ट्रायकोडर्मा प्रजाती किंवा फायटो जंतु (बॅसिलस प्रजाती, स्युडोमोनाज प्रजाती) सारख्या जैविक नियंत्रण एजंटांवर आधारीत जैविक उत्पादने वापरण्याची शिफारस केली जाते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पेरणीसाठी, इमाझलील आणि टेब्युकोनाझोल (आंतरप्रभावी बुरशीनाशक) यांनी युक्त बुरशीनाशकांनी उपचारीत बियाणे वापरा. झाडी धरण्याच्या काळात, सायमोक्झॅनिल (स्थानीय आंतरप्रभावी बुरशीनाशक), बोसकॅलिड आणि टेब्युकोनाझोल (आंतरप्रभावी बुरशीनाशक) यांचा वापर केल्यास रोगाचे नियंत्रण होऊ शकते.
अल्टरनारिया हेलियांथी नावाच्या बुरशीमुळे हे होते. हे जंतू, बियाणांत आणि झाडांच्या अवशेषांत जगतात. ऊगवणीच्या टप्प्यापासुन ते काढणीच्या टप्प्यापर्यंत झाडे या संक्रमाणास संवेदनशील असतात. हा रोग, ऊबदार, क्वचित पडणार्या पावसाच्या कोरड्या हवामानात अत्यंत झपाट्याने पसरतो. नत्रयुक्त खताच्या अतिवापराने झाडाचे नुकसान वाढते.