तिळ पिकावरील पान गुंडाळणारी अळी

SESAME

तिळ पिकावरील पान गुंडाळणारी अळी

Antigastra catalaunalis

किडा

थोडक्यात

  • लहात सुरवंट शेंड्यांच्या पानांना एकत्र गुंफतात आणि आत बसुन खातात.
  • पाने मुडपलेली, वाकडी तिकडी आणि बारीक रेशमी धाग्यांनी गुंफलेली दिसतात.
  • नंतर सुरवंट कोवळे शेंडे आणि विकसित होणार्‍या शेंगांना पोखरतात.
  • गुंफलेल्या पानांवर आणि शेंगांवरील छिद्रांजवळ गडद वाळूसारखी विष्ठा दिसते.
  • संक्रमित झाडांचे शेंडे वाळतात आणि दाण्यात छिद्र दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

0 पिके

तिळ पिकावरील पान गुंडाळणारी अळी

SESAME

लक्षणे

सुरवातीच्या काळात कदाचित बारीक सुरवंट रेशमी धाग्यांनी पाने गुंफताना दिसुन येईल. ह्या गुंफलेल्या रचनेत ते आत रहातात. ह्या गुंफण्याने पाने मुडपलेली वेडीवाकडी दिसतात. जसजसा सुरवंट मोठा होतो तो पानांवरुन शेंड्याच्या टोकावरील कोवळ्या कोंबावर जातो. ते ह्या फांद्यांत सोंड खुपसतात ज्यामुळे झाडाचे शेंडे मरगळुन वाळतात. मोसमात नंतर ते विकसित होत असलेल्या शेंगांना पोखरतात आणि आतील दाणे खातात. ह्यांच्या उपस्थितीची स्पष्ट चिन्हे म्हणजे त्यांची गडद, वाळूसारखी दाणेरी विष्ठा ही त्या गुंफलेल्या पानांना किंवा शेंगांवरील पोखरलेल्या जागेच्या आजुबाजूस दिसणे. गंभीर प्रादुर्भाव झाल्यास झाडाचा पूर्ण शेंडाच रेशमी धाग्यांचा गुंता आणि वाळलेली पाने असा होतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पर्यावरण पूरक पर्यायात येतात, वनस्पती अर्क जसे कि निंबोळी अर्क (एनएसकेई) किंवा नीम तेल, ज्यांचा किड्यांना नैसर्गिक तिटकारा असतो आणि म्हणुन सुरवंट खायचे थांबवितात. ब्युव्हेरिया बसियाना किंवा मेटार्‍ हिझियम अॅनिसोप्लिये सारख्या मित्र बुरशींयुक्त फवारणीही करु शकता, जी बुरशी अळ्यांना नैसर्गिकरीत्या संक्रमित करुन मारते. कोळी आणि शिकारी वॅस्पस सारखे नैसर्गिक भक्षक ही मदतगार असतात. रात्रीच्या वेळी प्रकाश सापळे लावुन प्रौढ पतंगांना पकडल्यास पिकांवर अंडी घालण्यासही थोडा आळा बसु शकतो.

रासायनिक नियंत्रण

सर्वसामान्य रसायनिक व्यवस्थापन हे छोट्या सुरवंटांना फ़ांदीत वा शेंगात खोल पोखरण्याची संधी मिळण्यापूर्वीच त्यापर्यंत पोचण्यावर लक्ष्य केंद्रीत करते. एकदा का हे सुरवंट झाडात लपले कि उपचारांचा परिणाम जास्त प्रभावी होत नाही. झाडांवर पहिला रेशमी धागा सापडताच लगेच उपचार केल्यास चांगला प्रभाव मिळतो. वेळ साधणे हे महत्वाचे आहे; तसेच हे उपचार सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा केले असता जास्त प्रभावी ठरतात कारण सुरवंट ह्या काळात जास्तच सक्रिय असतात.

कशामुळे झाले

हा किडा बारीक, तपकिरीसर नारिंगी रंगाचा पतंग असतो जो रात्री खूप सक्रिय असतो. मादी, छोटीसी, हिरवट अंडी पानांच्या खालच्या बाजूला, कळ्यांवर आणि कोवळ्या शेंगांवर घालते. त्यातुन बाहेर येणार्‍या सुरवंट अळ्या फिकट हिरव्या असुन बारीक काळे ठिपके असतात. त्या खूप सक्रिय असतात आणि डिवचल्यास पाठीवर देखील सरपटु शकतात तसेच रेशमी धाग्याच्या मदतीने जमिनीवरही पडतात. ऊबदार हवामान खासकरुन हलक्या पावसानंतर येणार्‍या कोरड्या काळ्यात ह्या किडी फोफावतात. नत्राचा अतिवापर केल्याने तिळाच्या झाडांवर हल्ला होण्याची शक्यता वाढते कारण कोवळ्या झाडीची वाढ भरपूर होते जी छोट्या सुरवंटांना खाण्यास आणि सोंड खुपसण्यास सोपी असते.


प्रतिबंधक उपाय

  • हंगामात तिळाची लागवड लवकर करा म्हणजे किडींची लोकसंख्या वयस्क होण्यापूर्वीच झाड पक्व होतील.
  • तूर किंवा मुगासह आंतरपीक घ्या.
  • झाडीची वाढ जास्त न होण्यासाठी नत्रयुक्त खताचा अतिवापर टाळा.
  • झाडांचे सर्व प्रभावित भाग आणि गुंफलेली पाने दिसताच काढुन नष्ट करा.
  • काढणीनंतर जुन्या पिकांचे अवशेष गोळा करुन जाळा म्हणजे विश्रांती घेणारे सुरवंट किंवा कोष नष्ट होतील.
  • कोळी किंवा वॅस्पसारखे नैसर्गिक भक्षकांचे रक्षण करा जे सुरवंटांना खातात.
  • शेंड्यावर आणि कळ्या तसेच गुंफलेली पाने कुठे दिसतायत का हे पहाण्यासाठी अठवड्यातुन एकदा निरीक्षण करत चला.

प्लँटिक्स डाऊनलोड करा