तिळावरील फायलोडी रोग

SESAME

तिळावरील फायलोडी रोग

Candidatus Phytoplasma

इतर

थोडक्यात

  • फुलांची रचना हिरव्या पानांसारखी होते.
  • झाडे झुडपांसारखी होतात.
  • फुलांत बीजधारणा होत नाही.
  • संभवत: पिकाचे गंभीर नुकसान होते.
  • ह्या रोगाचा प्रसार तुडतुड्यांद्वारे आर्द्र, पावसाळी हवामानात होतो.

मध्ये देखील मिळू शकते

0 पिके

तिळावरील फायलोडी रोग

SESAME

लक्षणे

ज्या फुलांतुन तिळ बिया तयार होतात, अशा फुलांऐवजी संक्रमित झाडांवर छोट्या हिरव्या पानांचे गुच्छ विकसित होतात. पानांमध्ये जागा खूप कमी होऊन, झाड झुडपासारखे होऊन वाढ खुंटते. पाने लहानच रहातात आणि झाडाच्या शेंड्यास अधिकाधिक फुटवेच येत रहातात. जर फुल लागलीच तर ती नपुंसक असतात. काही झाडांचे बारीक शेंडे एकत्रच वाढत असतात ज्यामुळे ती झाडे झाडूसारखी दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

एकदा का झाडावर फयटोप्लाझ्मा रोगाचे संक्रमण झाले कि त्यावर काहीही उपाय नाही. तुडतुड्यांच्या प्राथमिक नियंत्रणासाठी नीमतेलाने सुरवात करा. जेव्हा पहिला तुडतुडा शेतात दिसतो तेव्हाच सुरवात करा आणि सक्रिय काळात दर १०-१५ दिवसांनी परत फवारणी घेत चला. जेव्हा तुडतुड्यांची लोकसंख्या धोकादायक पातळी ओलांडेल तेव्हाच रसायनिक कीटकनाशके वापरा. ह्या किडीच्या नियंत्रणासाठी स्थानिकरीत्या भक्षक वा परजीवी मिळतायत का ते पहा.

रासायनिक नियंत्रण

एकदा का झाडावर फयटोप्लाझ्मा रोगाचे संक्रमण झाले कि त्यावर काहीही उपाय नाही. रसायनिक नियंत्रण हे वाहक तुडतुड्यांना रोग प्रसारापूर्वी नियंत्रित करुन संक्रमणास प्रतिबंध करण्याचेच लक्ष्य राखते. जेव्हा तुडतुडे दिसू लागतात, तेव्हाच फवारणी घ्या. आर्द्र हवामानात दर १५ दिवसांनी परत फवारणी करत चला. वाहकांची लोकसंख्या वाढण्यास प्रतिबंध असे लक्ष्य धरुन उपचार करा. हवामानावर लक्ष राखून पावसाळ्यापूर्वी उपचार वाढवा. जर का रोगाची लक्षणे दिसू लागली कि उपचार थांबवा कारण ते निरर्थक ठरतात.

कशामुळे झाले

फायलोडी रोग हा फयटोप्लाझ्मा नावाच्या जिवाणूंमुळे होतो जे झाडाच्या पेशीत रहातात. हे फयटोप्लाझ्मा जिवाणू झाडाबाहेर जगू शकत नाहीत किंवा स्वत:हून पसरु शकत नाहीत. संक्रमित झाडांवरुन निरोगी झाडांवर जाण्यासाठी त्यांना तुडतुड्यांची मदत लागते. उच्च आर्द्रता (८५%+), जास्त पाऊस, आणि २०-२५ से. चे थंड तापमान हे तुडतुड्यांच्या क्रियाशीलतेस तसेच फयटोप्लाझ्माच्या विकसनास धार्जिणे असते. फयटोप्लाझ्मास तुडतुड्यांच्या शरीरात विकसित होण्यास १५-६३ दिवस लागतात आणि तिळाच्या झाडास संक्रमित केल्यानंतर लक्षणे दिसण्यास १३-६१ दिवस लागतात. एकदा का तुडतुड्याने फयटोप्लाझ्मास उचलले तर तो तुडतुडा त्याच्या जीवनभर संक्रमण पसरवित फिरतो. फक्त प्रौढ तुडतुडेच रोगाचे वहन करु शकतात - पिल्ले प्रसार करु शकत नाहीत. फायलोडी हा तिळावरील जगभरातील सर्वाधिक नुकसान करणारा रोग आहे. हिरव्या पानांच्या रचनेस फायलॉइडस म्हटले जाते म्हणुन फुलांची रचना हिरव्या पानांच्या गुच्छासारखी करणार्‍या ह्या रोगास फायलोडी म्हटले जाते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक वाण वापरा.
  • निरोगी, रोगमुक्त बियाणे, चांगल्या स्त्रोताकडुन मिळवा.
  • पान तुडतुड्यांच्या अतिरेकाच्या सक्रिय काळात पेरणी करु नका.
  • तिळासह, तूर ६:१ याप्रमाणे आंतरपीक लावा.
  • नियमित निरीक्षण करुन तुडतुड्यांच्या लोकसंख्येस आळा घाला.
  • आर्द्रता कमी करण्यासाठी शेतातुन पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या.
  • संक्रमित झाडे दिसताक्षणीच उपटून नष्ट करा.
  • फयटोप्लाझ्मा जिवाणूंस यजमान असणार्‍या तणांना शेतात येऊ देऊ नका.
  • यजमान नसलेल्या पिकासंह पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा