इतर

भुईमुगावरील हुमणी

Scarabaeidae sp.

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • ग्रब्ज पाने आणि मुळे खूप खातात ज्यामुळे झाडी मरगळते आणि पिवळी पडते.
  • गंभीर बाबतीत रोपे जमिनदोस्त किंवा उमळुन पडतात.
  • दीर्घ काळात त्यांचा जीवनकाळ कमी होतो आणि उत्पन्नावर सतत प्रभाव पडतो.
  • बाधीत रोपे पिवळसर होतात आणि मरगळतात आणि काही पूर्ण भाग मरु लागतात.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

अळ्या आणि प्रौढ हे दोघेही रोपांना किंवा झाडांना खाऊन नुकसान करतात. अळ्या मुळे खातात ज्यामुळे रोपे मरगळतात आणि झाडी पिवळी पडते. भुईमुगाच्या बाबतीत शेंगांवरही हल्ला करुन नुकसान पोचवितात. गंभीर बाबतीत रोपे मरतात आणि जमिनीतुन सहज उपटता येतात. हल्ला होऊनही पिकांबर लक्षणे लगेच दिसत नाहीत. दीर्घ काळात त्यांचा जीवनकाळ कमी होतो आणि उत्पन्न कमीकमी होत जाते. बारमाही रोपात, रोपाचे अचानक मरगळणे हे सगळ्यात लवकर दिसणारे लक्षण आहे नंतर अकाली पानगळ होते. बाधीत रोपे पिवळसर आणि मरगळलेली दिसतात आणि शेतातील काही भागात पूर्ण मरतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

सोलॅनम सुराटेन्स किंवा नीमच्या पानांचे अर्क बियाणांच्या उपचारांसाठी वापरावेत. मित्र सूत्रकृमी (उदा. हेटेरोहाब्डिटिस प्रजाती)चे द्रव सस्पेंशन फवारणी १.५ बिलियन सूत्रकृमी प्रति हेक्टरच्या मापाने मोसमात लवकर करावी. न्यूक्लियर पॉलिहेड्रॉइस विषाणू किंवा हिरवी मस्कार्डाइन नावाच्या बुरशीवर आधारीत कीटनाशकेही चांगले काम करतात. पेरणीपूर्वी दाण्यांना रॉकेल (एक ली. प्रति ७५ किलो बियाणे) लावावे. ब्रॅकोनिडस, ड्रॅगॉन फ्लाइज, ट्रिकोग्रामाटिडसना राखावे. ब्रॅकोनिडस, ड्रेगॉन फ्लाइज, ट्रिकोग्रामाटिडस कुटुंबातील किड्यांचे संरक्षण करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जमिनीतुन बाहेर आल्यानंतर प्रौढ जवळपासच्या काही ठराविक रोपांच्या पाल्यापाचोळ्याला खातात. ह्या रोपांवर रात्रीच्या वेळी जर कीटनाशकांची फवारणी केली तर अंडी घालण्यापुर्वीच प्रौढांची लोकसंख्या कमी होईल. क्लोरपायरिफॉस २०% इसीला ११२५मि.ली./हे. दराने ह्या कारणासाठी वापरले जाऊ शकते. ह्या किड्यांचा विकास होऊ नये म्हणुन बियाणांवरील उपचारांसाठी क्लोरपारिफॉसला ६.५ मि.ली./किलो बियाणे दराने वापरावे.

कशामुळे झाले

होलोट्रिचिया नावाच्या प्रजातींच्या हुमणींमुळे लक्षणे उद्भवतात. प्रौढ गडद तपकिरी आणि साधारण २० मि.मी. लांब आणि ८ मि.मी. रुंद असतात. पावसाळा सुरु झाल्यापासुन तीन ते चार दिवसात ते मातीतुन बाहेर येतात छोट्या अंतरांपर्यंत उडतात आणि आजुबाजुच्या रोपांना खातात. खाल्यानंतर ते परत जमिनीत लपण्यासाठी जातात आणि अंडी घालतात. माद्या २०-८० सफेद गोलसर आकाराची एकेकटी अंडी जमिनीत ५-८ सें.मी. खोलीत घालते. अळ्या पांढुरक्या पिवळ्या, अर्धपारदर्शक आणि साधारण ५ मि.मी. लांब असतात. पूर्ण वाढलेले हुमणी जाडजुड असतात आणि त्यांचा खालचा जबडा मजबुत असतो. त्यांचे डोके पिवळसर आणि शरीर सफेद मांसल आणि 'C' आकाराचे असते. ते जैव बाबींना काही अठवडे खातात आणि मग मुळांच्या तंतुंना आणि शेंगांना खातात. भुईमुगाव्यतिरिक्त हुमणी ऊसाची, मिरचीची, ज्वारीची, मक्याची, लाल चण्यांची किंवा मोती बाजरीची मुळेही खाते.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या बाजारात उपलब्ध असल्यास लवचिक प्रकारचे वाण निवडा.
  • किड्यांच्या उच्च लोकसंख्येचे नुकसान टाळण्यासाठी लवकर पेरणी करा.
  • ज्वारी, मका किंवा कांद्यासारखी सापळा पिके भुईमुगाच्या रोपांमध्ये लावा.
  • पावसाळ्याच्या सुरवातीला प्रकाशाचे सापळे लावा आणि किती बीटल्स सापडतात त्या संख्येवर लक्ष ठेवा.
  • शक्यतो सकाळच्या वेळी शेतातुन हुमणीला गोळा करुन नष्ट करा.
  • हिरवे खत जसे कि इटालियन रायगवत किंवा लेग्युमस वापरा ज्यामुळे नैसर्गिक शत्रु राखले जातील.
  • पोटॅशियमवर आधारीत खत वापरा ज्यामुळे मुळे सशक्त होतील आणि हुमणीच्या नुकसानाला सहन करु शकतील.
  • शरदात उशीरा आणि वसंतात रोपणी करण्याआधी खोल नांगरा.
  • जमिन दोन वर्षांसाठी पडिक ठेवा.
  • यजमान नसलेल्या पिकांबरोबर (भात) पीक फिरवणी करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा