भेंडी

भेंडीच्या पानांवरील ठिपके

Pseudocercospora abelmoschi

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांच्या खालच्या बाजुला काजळी काळे कोणाकृती ठिपके येतात.
  • पाने वाळतात, मरगळतात आणि गळतात.
  • फांदी आणि फळांवरही परिणाम होतो.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भेंडी

लक्षणे

सुरवातीला, हिरव्या अस्पष्ट रंगाचे ठिपके पानांच्या खालच्या बाजुला दिसतात. विशेषकरुन जुन्या पानांवर, जी जमिनीच्या जवळ असतात ती रोगाने पहिल्यांदा प्रभावित होतात. फिकट तपकिरी ते राखाडी बुरशीची वाढ प्रभावित पानांच्या पृष्ठभागावर दिसते. जसा रोग वाढत जातो, हे ठिपके वाळतात आणि पानांच्या वरच्या पृष्ठभागावर देखील दिसु लागतात. संक्रमित पाने अखेरीस वाळून गळतात. फांद्या आणि फळांवरही अशीच लक्षणे दिसतात. गंभीर संक्रमणात झाडाची संपूर्ण पानगळ होते. या रोगाच्या लक्षणांचा सी. मलेन्सिस च्या लक्षणांशी गोंधळ होऊ शकतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजतागायत ह्या आजपर्यंत या रोगाविरुद्ध कोणतेही जैविक नियंत्रण उपाय आम्हाला माहिती नाहीत. जर आपणांस या रोगाच्या घटना कमी करण्याच्या किंवा लक्षणांची गंभीरता कमी करण्याचे यशस्वी उपाय माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. दुपारच्या वेळी पानांच्या खालच्या बाजुला बुरशीनाशकांची फवारणी करा. पेरणीनंतर एक महिन्याने कॉपर ऑक्झिक्लोराइड ०.३%, मँकोझेब ०.२५% किंवा झिनेब ०.२% सारखी बुरशीनाशके वापरा आणि गंभीरतेप्रमाणे ही प्रक्रिया दर पंधरवड्याने करीत रहा. कार्बेंडाझिम ५० डीएफ ०.१% १५ दिवसांच्या अंतराने वापरल्यासही या रोगाच्या नियंत्रणात चांगले परिणाम मिळतात.

कशामुळे झाले

स्युडोसर्कोस्पोरा अॅबेलमोशी नावाच्या बुरशीमुळे पानांवर ठिपके उद्भवतात. ही संक्रमित झाडांच्या जमिनीतील अवशेषात जगते आणि विश्रांती घेते आणि भेंडीचे मूळ आणि खालील पानांना संक्रमित करते. हिच्या बीजाणूंचे वहन वारा, पाऊस, सिंचनाने आणि यांत्रिक हत्यारांनी होते. पानांवरील ठिपके हे आर्द्र मोसमात (फुलोर्याीच्या टप्प्यावर) सर्वसामान्य आहेत कारण बुरशीला उबदार आणि ओले हवामान आवडते.


प्रतिबंधक उपाय

  • फक्त प्रमाणित बियाणेच वापरा आणि लागवडीचे योग्य अंतर ठेवा जेणेकरून पाने लवकर वाळतील.
  • शेताचे नियमित निरीक्षण करुन संक्रमित पाने योग्य प्रकारे नष्ट (जाळणे हा ही एक पर्याय आहे) करा.
  • चांगले तण व्यवस्थापन करण्याची शिफारस करण्यात येते.
  • पुरेसे पाणी आणि खत देऊन झाडांवर ताण येऊ देऊ नका.
  • संध्याकाळ ऐवजी सकाळी सिंचन करा आणि तुषार सिंचन टाळा तसेच जमिनीवर पाणी साचू देऊ नका.
  • यजमान नसलेल्या पिकांसह पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा