भेंडी

आडव्या पंखांचा पतंग

Xanthodes transversa

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पाने कुरतडलेली आढळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भेंडी

लक्षणे

सुरवंट पाने खातात ज्यामुळे पानगळ होते. पाने खाल्ली गेल्याने प्रकाश संश्र्लेषणात बाधा येते आणि परिणामी पिकाच्या वाढीवर तसेच उत्पादनावरही वाईट परिणाम होतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

या कमी महत्वाच्या किडींसाठी जैविक नियंत्रण उपलब्ध नाही. गरज भासल्यास त्यांना हाताने काढुन टाका.

रासायनिक नियंत्रण

जर सुरवंटांची संख्या झाडाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात जास्त असल्यास नुकसान न होऊ देण्यासाठी त्याचवेळी उपाय योजना करणे आवश्यक असु शकते. नुकसानाची चिन्हे दिसताक्षणीच उपाय योजना करावी. मोठ्या शेतातील भेंडी ही परदेशी पाठविण्यासाठी लागवड केली जातात, त्यामुळे पिकाच्या सुरुवातीच्या काळातच जर सुरवंटाची संख्या मोठ्या प्रमाणावर असली तर आर्थिक नुकसान होऊ शकते. कोणत्या उत्पादनाची उपाय योजना करावी हे जाणुन घेण्यासाठी एखाद्या कृषी तज्ञाचा सल्ला घ्या आणि कीटनाशके वापरताना नियमांचे पालन करण्यास विसरु नका.

कशामुळे झाले

झँथोडस ट्रांसव्हर्सा नावाच्या पतंगांमुळे नुकसान उद्भवते. हे आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या पुष्कळशा मालवेसी कुटुंबातील पिकांना खातात. माद्या पानांखालील बाजूस एकावेळी एकप्रमाणे अंडी घालतात. एक अठवड्यानंतर त्या अंड्यातुन छोटे सुरवंट बाहेर येतात. पूर्ण वाढलेले सुरवंट हे गडद हिरव्या रंगाचे असुन पिवळा उभा पट्टा शरीरभर असतो आणि नालाच्या आकाराची चिन्हे पिवळ्या पट्ट्यांच्या दोन्ही बाजूस असतात. नंतरच्या अवस्थेत सुरवंटांच्या रंगाची रचना थोडी वेगळी होते. कोवळ्या अळ्या ह्या दोर्‍यासारख्या असतात आणि खूप हिंडतात. त्या पानांची खालची बाजू खातात, तिथेच त्या सापडतात. सुरवंट जमिनीत कोषात जातात आणि काही अठवड्यातच त्यातुन पतंग बाहेर पडतात. प्रौढ पतंग पिवळ्या रंगाचे असुन तपकिरी रंगाच्या बाणाच्या आकाराच्या रेषा प्रत्येक पुढील पंखांवर असतात. उष्ण, आर्द्र हवामान ह्या किडीस भावते. जरी ही कीड फारसे नुकसान करीत नसली तरी ह्यामुळे पिकाचे नुकसान होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • सुरवंटांना शोधुन हातमोजे वापरुन नष्ट करा.
  • त्यांची नक्षी वेगळीच असल्याने शोधणे सोपे असते.
  • पिकांमध्ये तण राहू देऊ नका कारण हे सुरवंट त्यांत लपून बसतात आणि तिथेच जगतात.

प्लँटिक्स डाऊनलोड करा