भात

भातावरील पिवळ्या ठिपकेदार विषाणू

RYMV

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • नविन पानावर पिवळे पट्टे आणि ठिपके येतात व जुन्या पानावर पिवळे ते नारिंगी ठिपके दिसतात.
  • या पट्ट्यांच्या मध्यावर गडद छटा दिसते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

कोवळ्या पानांवर विखुरलेले पिवळे ते हिरवे ठिपके येतात. लागण झाल्यानंतर (२ अठवड्यांनी) हे ठिपके लांबुळके होतात आणि पानांच्या शिरांना समांतर वाढतात. या पिवळ्या पट्ट्यांच्या मध्यावर गडद छटा असलेले भाग विकसित होतात. जुन्या पानांवर पिवळी ते नारिंगी रंगहीनता दिसुन येते. झाडाची वाढ खुंटते आणि उत्पादन कमी येते.

Recommendations

जैविक नियंत्रण

संक्रमित झाडे व त्यांचे अवशेष खणून जाळुन किंवा गाडुन नष्ट करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या विषाणुंचे नियंत्रण करण्यासाठी कोणतेही थेट रसायनिक उपचार उपलब्ध नाहीत.

कशामुळे झाले

विषाणुंचे वहन विविध प्रकारच्या बीटल्स किंवा ग्रासहॉपर्सद्वारे तसेच, गायी, उंदीर आणि गाढवांद्वारे होते. ह्याचे संक्रमण झाडांमधील रसाच्या हालचालीने उदा. सिंचनाचे पाणी किंवा संक्रमित झाडाची निरोगी झाडांसोबत घर्षणाने आणि पीकांचे नष्ट न केलेले किंवा जमिनीत खोल राहिलेल्या अवशेषांद्वारे वहन होते.


प्रतिबंधक उपाय

  • जास्त प्रतिकारक वाणांची लागवड करा.
  • किड्यांची उच्चीची लोकसंख्या टाळण्यासाठी लवकर पेरणी करा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण नियमितपणे काढा.
  • मित्र किडींवर प्रभाव पडु नये म्हणुन कीटनाशकांचा वापर नियंत्रित ठेवा.
  • संक्रमित रोपांच्या अवशेषाखालुन नांगरा किंवा अधिक चांगले म्हणजे त्यांनाजाळुन टाका.
  • किंवा काढणीनंतर संक्रमित रोपे नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा