भात

ओंबीतील ढेकण्या

Mythimna separata

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • सुरवंट पानाची टोक, कडा आणि काही वेळा संपूर्ण पान खातात.
  • ओंबीला देठापासुन कातरतात.
  • पाठीवर पट्टे असलेल्या गडद हिरव्या अळ्या रोपांवर दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

पानाचे टोक किंवा शिरांच्या बाजुने खाल्ल्याने नुकसान दिसणे, काही वेळा पानांच्या फक्त मध्य शिराच उरणे (पानांचा सांगाडा होणे) ही उपद्रवाची लक्षणे आहेत. गंभीर प्रादुर्भाव झाल्यास, जुन्या अळ्या पूर्ण पाने संपवु शकतात आणि उगवलेल्या रोपांना बुडापासुन पूर्ण खातात. या अळ्या ओंबीचा देठ सुद्धा कातरतात आणि जी काही शिल्लक रहातात ती वाकतात किंवा गळतात. पाठीवर पट्टे असलेल्या गडद हिरव्या अळ्या रोपांवर दिसतात. शेतातील एका भागातच नुकसान दिसते. अळ्या गटागटाने एका शेतातुन दुसऱ्या शेतात स्थलांतरण करत असल्याने साथ आल्यास बरेचशी शेते एकाच वेळी प्रभावित होऊ शकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

कोटेशिया रुफिक्रुस आणि युप्टेरोमालस परनारे वॅस्पसच्या आक्रमक जातींना शेतात सोडल्यास चांगले परिणाम मिळाले आहेत. हे किडे एम सेपाराटाच्या अळ्यात आपली अंडी घालतात आणि त्यामुळे अळ्या हळुहळु मरतात. एक महत्वाची नियंत्रण पद्धत म्हणजे कोषावस्थेत असताना शेतात पाणी भरल्यास ते बुडुन मरतात आणि भविष्यातील उपद्रवाचे प्रमाण कमी होते. शेतात पाणी भरल्याने एम सेपाराटाच्या अळ्यांचे एका रोपावरुन दुसर्‍या रोपावर जाणेही सिमित होते. भातशेतात बदके सोडल्यानेही यांची संख्या नियंत्रणात राहण्यास मदत होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सुरवंट आणि अळ्या एका शेतातुन दुसर्‍या शेतात जाऊ नयेत म्हणुन प्रभावित शेतांच्या कडांनी सायपरमेथ्रिनची फवारणी करा. जर लष्करी अळ्यांचा उपद्रव जास्त असल्यास रसायनिक फवारणीची गरज असते. सायपरमेथ्रिन १ मिली/ली. पाण्यात मिसळुन फवारण्याची शिफारस केली जाते. संध्याकाळची वेळ ही फवारणीसाठी उत्तम असते.

कशामुळे झाले

मिथिम्ना सेपाराटा नावाच्या सुरवंटाच्या अळ्यांमुळे नुकसान होते. प्रौढांचे पंख राखाडीसर पिवळे असुन गडद राखाडी किंवा लालसर पिवळी छटा असते आणि बरेच काळे ठिपके विखुरलेले असतात. माद्या हिरवट पांढरी ते पांढरी अंडी पानांवर अशीच किंवा काळ्या रंगाच्या पातळ थराने झाकलेली घालतात. पाठीवर पट्टे असणार्‍या हिरव्यागार अळ्या रोपांवर दिसतात आणि नुकसान करायला सुरवात करतात. कोरड्या हवामानाच्या काळानंतर जोरदार पावसाने प्रौढांचे आयुष्य, अंडी घालण्याचा आणि उबण्याचा काळ वाढतो. नत्रयुक्त खतांनी रोपाची वाढ चांगली होते आणि त्यामुळे जास्त अळ्या खाण्यासाठी आणि जगण्यासाठी येतात. पर्यायी यजमानात जव, गहू, मका, ओटस, ज्वारी, ऊस, बांबु, कापुस, रताळी, तंबाखु आणि कोबीवर्गीय पिके येतात.‍


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास भरपूर फुटवे असणारे वाण लावा.
  • एम सेपाराटाच्या उपस्थितीसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • जेव्हा अळ्या किंवा अंड्यांचे गुच्छ दिसतात तेव्हा ते हाताने वेचून काढा.
  • तण (खास करुन ग्रामिने कुटुंबातील) नियंत्रणात ठेवा कारण ते पर्यायी यजमान आहेत.
  • खतांचा वाजवी वापर करा कारण ते किड्यांना अनुकूल आहेत.
  • स्थलांतर करणार्‍या अळ्यांच्या मार्गात अडथळे (उदा.
  • खंदक) निर्माण करुन त्यांना पकडा.
  • शेताच्या आजुबाजुला काटक्या पसरा म्हणजे सुरवंट त्यात अडकतील.
  • गादीवाफ्यात पाणी भरा म्हणजे ते रोपांच्या टोकांवर चढतील जिथे त्यांवर कीटनाशकांचा उपचार करता येईल.
  • संवेदनशील नसणार्‍या पिकांसह फेरपालट करा पण गहू किंवा मक्यासारख्या पर्यायी यजमानांबरोबर करु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा