लीचीवरील दुर्गंधी कीड

LITCHI

लीचीवरील दुर्गंधी कीड

Tessaratoma papillosa

किडा

थोडक्यात

  • फुले वा नविन फळे अकाली गळतात.
  • कोवळ्या फांद्या वाळतात आणि टोकाला काळ्या पडतात.
  • प्रौढ दुर्गंधी कीड रंगाने तपकिरीसर पिवळी असुन लाल ठळक डोळे असतात.
  • जेव्हा ह्या किडीस डिवचले जाते तेव्हा ती उकळता द्राव फवारते.

मध्ये देखील मिळू शकते

0 पिके

लीचीवरील दुर्गंधी कीड

LITCHI

लक्षणे

कळ्या, शेंडे, पुष्पकोष आणि कोवळ्या फळांवर लक्षणे दिसतात. कोवळ्या काड्या आणि फांद्या टोकापासुन सुरु होऊन वाळतात, जी टोके नंतर काळी पडतात. मुख्य लक्षणांत येते, फुले तसेच फळे वाळतात आणि आक्रसतात. फळांवर विशिष्ट काळे डाग येतात वा साल काळी पडते. अशी फळे अकालीच गळतात ज्यामुळे झाडाचे फळ उत्पादन कमी होते. किडींची लोकसंख्या उच्च झाल्यास फांद्या आणि पानंची वाढ खुंटते. गंभीर प्रादुर्भाव झाल्यास झाडाची एकुणच वाढ खुंटते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

नैसर्गिक भक्षक ह्या किडीच्या सामना करण्यात मदत करतात. ते अंडी खातात आणि उद्रेक टाळतात. संभावित प्रजातींच्या सूचीसाठी स्थानिक अधिकारी वा कृषी सल्लागारांशी संपर्क साधावा.

रासायनिक नियंत्रण

चांगल्या परिणामासाठी फुलोर्‍याच्या सुरवातीच्या काळातच उपचार सुरु करा. चांगले कव्हरेज मिळण्यासाठी जास्त दाबाचे, जास्त प्रवाहाचे फवारे वापरा. दाट झाडी आणि पाने जिथे किडे लपतात तिथे लक्ष्य करा. थंड हवामानात जेव्हा किडे जास्त सक्रिय नसतात तेव्हा फवारणी घ्या. जास्त प्रादुर्भाव असल्यास फवारणी अधिक वेळा करावी लागू शकते. स्थानिक सरकार नियंत्रण कार्यक्रमांचा समन्वय करते.

कशामुळे झाले

लीचीवरील दुर्गंधी कीड (टेस्सारातोमा पॅपिलोसा) हा एक आक्रमक कीटक आहे जो मूळचा दक्षिण पूर्व आशियातील असुन सध्या संपूर्ण आशिया तसेच जगभरात झपाट्याने पसरत आहे. प्रौढ दुर्गंधी किड्याचा आकार हा विशिष्ट ढालीसारखा असुन तपकिरीसर पिवळ्या रंगाचा असतो. पिल्ले फारच डोळ्यात भरण्यासारखी चकचकीत लाल आणि शरीरभर पांढऱ्या पट्ट्यांनी व्यापित असतात. अंड्याचे पुंजकेही वैशिष्ट्यपूर्ण, संख्येने फक्त १४ च, हिरव्या पाचूच्या रंगाचे किंवा गुलाबी असुन, व्यवस्थित ओळीने असतात. प्रौढ आणि पिल्ले दोघेही कळ्या, शेंडे, पुष्पकोष आणि कोवळ्या लीची तसेच लोंगन आय फळांत टोकदार सोंड खुपसून खातात. त्यांच्या खाण्याने झाडाला जखमा होऊन बुरशीजन्य रोगांना आमंत्रण मिळते ज्यामुळे झाडाचे अधिकच नुकसान होते. लीचीवरील दुर्गंधी कीड ही झाडास तर विशिष्ट नुकसान करतेच पण मानवी स्वास्थ्यासही हानीकारक आहे. जेव्हा डिवचले जातात तेव्हा हे किडे घाणेरड्या वासाचे आम्ल द्रव फवारतात जे मानवी त्वचेच्या संपर्कात आल्यास, आग होते व ह्यापासुन पीडादायक असे व्रण येतात. डोळ्यात उडाल्यास दृष्टी जाऊ शकते. जर किड्याचा फवारा आपल्या त्वचेवर पडला तर लगेच तो भाग स्वच्छ पाण्याने धुवून टाका पण नंतरही जर आग कमी झाली नाही तर वैद्यकीय मदत मिळवा.


प्रतिबंधक उपाय

  • किडीसभोवताली काम करताना संरक्षक कपडे घाला.
  • झाडाच्या खोडाच्या बुडाला चिकट खळीची वर्तुळे काढा जेणेकरुन वर चढणारी कीड पकडता येईल.
  • अंडी, अळ्या किंवा प्रौढ दिसतायत का ह्यासाठी दर अठवड्यास पहाणी करत चला.
  • अंडी असलेली पाने लगेच खुडून गोळा करा.
  • फांद्या हलविल्यास किडी मेल्याचे सोंग करतात म्हणुन फांद्यांना जोरात हलवुन त्यांना खाली पाडा आणि उपकरणाने गोळा करा.
  • नविन प्रादुर्भाव दिसताक्षणी कृषी अधिकार्‍यांना सूचना द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा