Rhizopus artocarpi
बुरशी
फुलांवर आणि फळांवर मऊ, पाणेदार, तपकिरी डाग येतात. राखाडी, केसाळ बुरशी त्वरित संक्रमित भागाला व्यापते. तो फणस काळा पडतो कारण बुरशी फळाच्या पूर्ण पृष्ठभागास व्यापते. फळ आक्रसते, कूजते आणि काढणीपूर्वीच गळते.
कॉपरवर आधारीत बोर्डॉ द्रावणासारखी उत्पादने फुलधारणेच्या काळात प्रतिबंधात्मक रीतीने वापरली तर थोडेसे संरक्षण देतात. स्युडोमोनास प्रजाती आणि ट्रायकोडर्मा सारख्या रायझोबॅक्टेरिया वर आधारीत जैविक उत्पादने रोगास कमी करण्यात मदत करतात. फणसावरील मऊ कूजीचे नियंत्रण करण्याचे पर्याय अत्यंत सीमित आहेत; प्रतिबंध आणि शेतीच्या चांगल्या पद्धती, स्वच्छता हा व्यवस्थापनाचा पाया आहे.
रसायनिक नियंत्रणाचे पर्याय खूपच सीमित आहेत; कोणतेही एकेकटे उत्पादन फणसावरील मऊ कूजीचे पूर्ण नियंत्रण करु शकत नाही.
बुरशी ही जमिनीतीत आणि झाडांच्या मृत होत असलेल्या अवशेषांत बहुधा सापडते. ही हवेतुन सहज पसरते. ऊबदार, आर्द्र आणि पावसाळी हवामान संसर्गास आणि प्रसारास खूप धार्जिणे असते. इतर पिकांप्रमाणे फणसावर कोणतीही जखम नसतानाही ही बुरशी त्यास संसर्ग करु शकते. काढणीनंतरही देठाच्या बुंध्यातुनही लागण होऊ शकते. साठवणीत, उच्च तापमान आणि खेळती हवा नसल्यास रोगाचा विकास जलद होतो आणि एका संक्रमित फळामुळे सभोवतालच्या फळांनाही काही दिवसातच लागण होते. रताळी, नीरफणस, कृष्णफळ, वांगे आणि लिंबूवर्गीय फळांसह ह्या बुरशीचे अनेक यजमान आहेत.