कोकोआ शेंग सड रोग

कॅकाओ

कोकोआ शेंग सड रोग

Moniliophthora roreri

बुरशी

थोडक्यात

  • फुगलेल्या शेंगांवर गडद तपकिरी ठिपके येतात जे जलदगतीने पसरतात.
  • संक्रमित भागांवर पांढर्‍या पावडरीचा थर दिसतो.
  • शेंगांचा आतील भागातील कूज लालसर तपकिरी रंगाची असते.
  • संक्रमित शेंगा निरोगी शेंगांपेक्षा जड होतात.
  • अखेरीस शेंगा वाळुन कडक काळ्या पडतात.

मध्ये देखील मिळू शकते

0 पिके

कोकोआ शेंग सड रोग

कॅकाओ

लक्षणे

कोको शेंग सड रोग, शेंगेच्या विविध टप्प्यांना संक्रमित करु शकतो, तसेच शेंगा जसजशा पक्व होत जातात त्याप्रमाणे संक्रमणाची लक्षणेही बदलत रहातात. हा रोग फक्त शेंगा आणि फळांनाच प्रभावित करतो, पाने किंवा फांद्यांना प्रभावित करत नाही. कोवळ्या शेंगा पृष्ठभागावरुन फुगतात, ती सूज किंचितशी पिवळसर असते. शेंगांचा आतील भाग मऊ आणि पाणेदार होतो. वाढणार्‍या शेंगांना जास्त गंभीर बेढबपण येतो आणि त्यांचा फुगीरपणा गडद तपकिरी डागांनी भरतो, जे नंतर पूर्ण पृष्ठभाग व्यापतात. आतील भाग पांढर्‍या पावडरीसारख्या बीजाणूंनी व्यापतो. शेंगा लवकर पक्व होतात आणि आतुन कूजतात, दिसण्यास लालसर तपकिरी दिसतात. पक्व शेंगांवर बेढब तेलकट तपकिरी डाग येतात जे मोठे होऊन एकमेकांत मिसळतात आणि त्यांवरही पांढर्‍या पावडरीचा थर तयार होतो. शेंगा चांगल्याच जड होतात आणि अखेरीस आक्रसून कडक काळ्या पडतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

रसायनिक बुरशीनाशकांप्रमाणेच जैविक नियंत्रणही तेव्हाच चांगले प्रभावी ठरते जेव्हा शेंगा संक्रमित होण्यापूर्वीच उपचार केले जातात. काही ट्रायकोडर्मा प्रजातींना जेव्हा नियमितपणे आणि प्रतिबंधकरीत्या वापरले गेले तेव्हा बुरशीवर नियंत्रण राखण्यात चांगलेच निकाल दिले आहेत.

रासायनिक नियंत्रण

रसायनिक बुरशीनाशके रोग नियंत्रणात मदत करतात पण जेव्हा चांगल्या शेती पद्धतींसह वापरले जातात तेव्हाच प्रभाव चांगला पडतो. रोगट झाडाला उपचार करण्यापेक्षाही प्रतिबंध हा नेहमीच चांगला आणि स्वस्त पडतो. शेंगांवर नेम धरुन फवारणी करा, खास करुन कोवळ्या शेंगांवर. कोरडे हवामान असतानाच फवारणी करा. चांगली फवारणी होण्यासाठी इंजिन फवारा यंत्र वापरा.

कशामुळे झाले

कोको शेंग सड रोग ही मोनिलिओफ्थोरा रोरेरी नावाच्या बुरशीमुळे होतो. कोवळ्या (०-३ महिने) शेंगा ह्या सर्वात संवेदनशील असतात, जर पक्व (५-६ महिने) शेंगात थोडी जास्त प्रतिकारकता असते. कूजीचे बीजाणू वार्‍याने, आणि पावसाच्या उडणार्‍या पाण्याने पसरतात तसेच त्यांना जास्त आर्द्रता धार्जिणी असते ज्यामुळे पावसाळी काळात ह्या रोगाचा प्रसार जास्त होतो. तसेच संक्रमित अवजारे, कपडे आणि शेंगांना शेतात इतरत्र हलविल्यासही बीजाणूंचा प्रसार होतो. दाट झाडीत हवा चांगली खेळत नसल्याने रोग प्रसारास धार्जिणी होते.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास कोकोआचे प्रतिकारक वाण वापरा.
  • दर अठवड्यास झाडांची तपासणी करत चला आणि संक्रमित शेंगा लगेच काढुन टाका - कोवळ्या शेंगांवर लक्ष केंद्रीत करा.
  • संक्रमित शेंगांना काढुन जमिनीत किमान ५० सें.मी.
  • खोल पुरा किंवा जाळा.
  • संक्रमित भागातील इतर शेंगा कधीही बाहेर नेऊ नका.
  • हवा चांगली खेळण्यासाठी वर्षातुन किमान दोनदा तरी झाडांची छाटणी करा.
  • आडव्या-तिडव्या आणि खोडातुन ताठ निघणार्‍या फांद्या छाटा.
  • झाडीची उंची कमी (३-४ मी.
  • उंच) ठेवा.
  • आर्द्रता कमी करण्यासाठी पाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था चांगली करा.
  • रोगाच्या जंतुंना थारा मिळू नये म्हणुन नियमितपणे तण नियंत्रण करा.
  • पक्व शेंगांना नियमितपणे काढा - जास्त पिकलेल्या शेंगा शेतात सोडू नका.
  • अवजारे स्वच्छ आणि निर्जंतुक करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा