Phytophthora palmivora
बुरशी
शक्यतो शेंगांच्या वरच्या किंवा खालच्या भागात गोल तपकिरी ठिपके येतात. ठिपके झपाट्याने वाढुन पूर्ण शेंगेस १-२ अठवड्यात व्यापतात. ओल्या हवामानात, ह्या तपकिरी ठिपक्यांवर अधुन-मधुन पांढरे बीजाणू दिसतात. संक्रमित कोकोआ शेंगांतुन "मासळीचा" वास येतो. त्या शेंगा काळ्या पडतात आणि वाळुनही फांदीलाच लटकत रहातात. कोवळ्या कोकोआ शेंगात कूज दिसते; तर पक्व शेंगातील दाणे निरोगी असु शकतात. कोवळ्या फांद्यात झपाट्याने तपकिरीपणा दिसतो आणि पूर्ण मर होऊ शकते. फांद्यांवर अंडाकृती लालसर तपकिरी ठिपके दिसतात आणि त्या सालीखाली ठळक गुलाबी ते सोनेरीसर लाल रंग दिसतो. पाने शिरांच्या बाजुने रंगहीन दिसतात. बुंधा आणि बुडाजवळ गडद तपकिरी पाणी शोषल्यासारखे डाग येऊन त्यातुन लालसर तपकिरी चिकट स्त्राव गळतो.
रसायनिक बुरशीनाशकांप्रमाणे जैविक नियंत्रण जास्त प्रभावी तेव्हाच ठरते जेव्हा शेंगा संक्रमित होण्यापूर्वीच उपचार केले जातात. काही ट्रायकोडर्मा प्रजातींना जेव्हा नियमितपणे आणि प्रतिबंधात्मकरीत्या वापरले गेले तेव्हा बुरशी नियंत्रणाचे निकाल चांगले आढळून आले आहेत.
रसायनिक बुरशीनाशके रोगाचे नियंत्रण करण्यात मदत करतात, पण जर त्यांचा उपचार चांगल्या शेती पद्धतींसह केला गेला तर जास्त प्रभावी ठरतात. संक्रमित झाडावर उपचार करावे लागण्यापेक्षाही प्रतिबंध करणे हे नेहमीच चांगले आणि स्वस्त असते. रासायनिक बुरशीनाशकांचा वापर पावसाळी हंगाम सुरु होण्यापूर्वीच आणि फुलधारणा ते शेंगा पक्व होईपर्यंत करा. पावसाळ्यात दर ३-४ अठवड्यांनी फवारणी करा. गंभीर रोगाच्या दबावात प्रत्येक हंगामात ६-८ फवारणी घ्या. बुंधा आणि मुख्य फांद्यांना पावसाळी हंगामापूर्वी जास्तीची मात्रा द्या. दर हंगामात बुंध्यात दिलेले इंजेक्शन हे बहु फवारणी इतकेच प्रभावी ठरते.
काळी शेंग रोग हा फयटोफ्थोरा पालमिव्होरा नावाच्या जमिनीजन्य जंतुंमुळे होतो जो पूर्ण झाडास संक्रमित करतो. हा रोग, शेंगा, खोड, कोंब, पाने आणि मुळ यांना सर्व अवस्थेत संक्रमित करतो. बुरशीच्या जंतुंचा प्रसार वार्याने, पावसाच्या उडणार्या पाण्याने होते आणि जास्त आर्द्रता ह्यास धार्जिणी असते ज्यामुळे पावसाळ्यात ह्या रोगाचा प्रसार होण्याची प्रामुख्याने वेळ असते. संक्रमित झाडाचा थेट स्पर्श जर निरोगी झाडास झाला किंवा संक्रमित माती व अवजारे स्वच्छ न करता वापरली गेली तरी ह्या रोगाचा प्रसार होतो.