द्राक्षे

पानावरील कोणेदार करपा

Pseudopezicula tetraspora

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर पिवळ्या कडांचे डाग येतात.
  • अकाली पानगळ होते.

मध्ये देखील मिळू शकते


द्राक्षे

लक्षणे

पानांवर सुरवातीला फिकट पिवळे डाग दिसतात आणि पान सुर्यासमोर धरल्यास हे डाग अधिकच स्पष्ट दिसतात. ह्या डागातील दुय्यम शिरा लालसर तपकिरी होतात. जसे डाग मोठे होत जातात ते पिवळ्या रंगावरुन लालसर तपकिरी रंगात रुपांतरीत होऊन कोणेदारही होतात कारण ते मुख्य शिरांमुळे मर्यादित होतात ह्यामुळेच ह्या रोगाचे नाव पानावरील कोणाकृत करपा असे पडलेले आहे. जसे पानावरील डाग करपतात त्यांच्या भोवती पिवळी कडा दिसु लागते. लाल द्राक्षांच्या जातींमध्ये ही कडा लाल असते. हंगामाच्या शेवटी प्रादुर्भाव झाल्यास पानांवर विखुरलेले ठिपके दिसतात आणि अकाली पानगळ होते व प्रादुर्भाव झालेले फुलांचे गुच्छ वाळून जातात. बोट्रिटिस ब्लाइटच्या विरुद्ध हा रोग फक्त फळांच्या फांद्यांनाच होतो पण मुख्य फांद्यांना होत नाही.

Recommendations

जैविक नियंत्रण

या रोगाविरुद्ध कोणतेही जैविक उपचार उपलब्ध नाही. जास्त नुकसान टाळण्यासाठी बाधीत फांद्या किंवा संपूर्ण वेल काढुन बागे पासुन दूरवर नेऊन खोल पुरा किंवा जाळुन नष्ट करा. तण नियंत्रण करा आणि पाण्याचा चांगला निचरा होईल अशी व्यवस्था करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ज्या बुरशीनाशकात मँकोझेब असते त्याचा वापर पावसाळी हवामानाच्या आधी केल्यास ह्या बुरशीचे नियंत्रण करता येते. उपचार जेव्हा नविन फुट दिसायला चालू होते तेव्हाच करायला पाहिजेत आणि फळधारणेपर्यंत करत राहिले पाहिजे, पावसाळी वातावरणात ह्या फवारण्या अजुन थोडे जास्त करणे गरजेचे आहेत.

कशामुळे झाले

पी. टेट्रास्पोरा नावाच्या बुरशीमुळे पानांवर कोणाकृत करपा दिसतो, ही थंडीच्या दिवसात बागेतील बाधीत गळलेल्या पाल्यापाचोळ्यात विश्रांती घेते. त्यामुळेच पाने नसणारी फांदी ह्या बुरशीचे वहन करीत नाही. वसंत ऋतुच्या ओल्या वातावरणात बीजाणू ह्या पालापाचोळ्यातून निघुन वार्‍याबरोबर आणि उडणार्‍या पाण्याच्या थेंबाबरोबर नविन पानांवर आणि फुलांच्या फांद्यांवर पसरतात. साधारणपणे पालापाचोळ्यात विश्रांती घेणारी ह्या बुरशीची ही एकच पिढी वसंत ऋतू मध्ये फक्त एकदाच संक्रमण करत असते. बरेचदा सलग पडणार्‍या पावसानंतर बीजाणू वेलींवरील वाळलेल्या पण न गळलेल्या पानांवरही तयार होतात. हे बीजाणू मात्र वाढीच्या हंगामात जर आद्र हवामान राहिले तर दुय्यम लागण करु शकतात. ह्यावरुन कळते कि हा रोग वर्षानुवर्षे डोके वर काढीत नाही पण ज्या वर्षी जास्त पावसाळी वातावरण राहते त्या वेळी मात्र मोठे नुकसान करून जातो.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोतांकडून उपलब्ध झालेले निरोगी लागवड सामग्री वापरावी.
  • गल्लीतील व दोन झाडातील अंतर जास्त ठेवा जेणे करून बागेत हवा खेळती राहील.
  • पर्यायाने खुल्या कनॉपीसाठी अनुकूल असलेली छाटणी पद्धत निवडावी.
  • ह्या रोगांच्या लक्षणांसाठी बागेची नियमित पाहणी करा.
  • स्वच्छता चांगल्या प्रकारची राखा उदा.
  • तण आणि वेलींचे अवशेष बागेतुन काढुन टाका.
  • सुकलेल्या किंवा बाधीत वेली काढुन बागेपासुन दूरवर खोल पुरुन किंवा जाळुन नष्ट करा.
  • संक्रमित बागेमधुन पालापाचोळ्याची वाहतुक करणे टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा