कृषीक्षेत्रात अमुलाग्र बदल घडवुन आणणे

आम्ही जगभरातील छोट्या शेतकर्‍यांना आणि कृषी-किरकोळ विक्रेत्यांना मदत करू इच्छितो. एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान, माहिती विश्र्लेषण आणि वैज्ञानिक संशोधन वापरुन योग्य उपाय प्रदान करणे, शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि शेतीची उत्पादकता वाढवणे हे आमचे ध्येयआहे.

छोट्या शेतकऱ्यांना डिजिटल शेतीद्वारे सक्षम करणे

जगासाठीच्या अन्न उत्पादनात त्यांचे महत्व काय आहे आणि त्यांना कोणत्या अडचणी येतात हे आम्ही समजतो. संसाधने, तंत्रज्ञान आणि माहितीतील मर्यादित प्रवेशामुळे त्यांना त्यांच्या शेतीत सुधारणा करणे कठिण होऊ शकते. म्हणूनच आम्ही प्लँटिक्स तयार केले, एक विनामूल्य अॅप जे शेतकऱ्यांना माहिती, तंत्रज्ञान आणि शेतीविषयक टिप्सची ओळख करुन देते.

शाश्वत आणि फायदेशीर शेतीला समर्थन देते

आपल्या कृषी प्रणालीचा कणाच मजबूत करण्यावर आमचा भर आहे - छोटे शेतकरी आणि कृषी किरकोळ विक्रेते. आमचे दोन अॅप, प्लँटिक्स आणि प्लँटिक्स पार्टनर हे फक्त टूलच नाहीत; तर ते कृषी उद्योगात होऊ घातलेल्या क्रांतीची पायाभरणी आहे, ज्यातुन शेतकर्‍यांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत मिळेलच तसेच कृषी किरकोळ विक्रेतेही त्यांच्या शेतकरी समुदायास चांगली सेवा देऊ शकतील.

कृषी उत्पन्न भरघोस घ्या

प्लँटिक्स डाऊनलोड करा

आपला कृषी-किरकोळ व्यवसाय वाढवा

प्लँटिक्स पार्टनर व्हा

लक्ष्य, काळजी, सक्षमीकरण, सामायिक करणे!

आमची ब्रँड मूल्ये, आम्ही कशावर विश्वास ठेवतो आणि आमचा व्यवसाय कसा निवडतो हे दर्शवितात. ती मार्गदर्शक तत्त्वे आहेत जी आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीला साकारतात.

लक्ष्य

पारंपारिक विचारसरणीला जरी आव्हान द्यावे लागले तरीही आम्ही उचित तेच करण्यासाठी वचनबद्ध आहोत. शक्यतो सर्वात मोठा प्रभाव पाडण्यासाठी आणि सर्वाधिक मूल्य निर्माण करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.

काळजी

काळजी घेणे म्हणजेच आपल्या कृतींचा, आपल्या सामाजिक आणि नैसर्गिक वातावरणावर कसा परिणाम होतो याची जाणीव असणे. सर्व काही एकमेकांशी जोडलेले आहे. म्हणुन आम्ही जे काही करतो त्यामध्ये दयाळूपणे, सहानुभूतीने मदत करण्याचा प्रयत्न करतो.

सक्षमता

आम्ही लोकांना स्मार्ट निवड करण्यास सक्षम करतो ज्यामुळे त्यांना प्रगत होण्यास आणि चांगले जीवन जगण्यास मदत होईल. यामुळे अधिक स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि यश मिळते.

सामायिक करा

आम्हाला विश्वास आहे की विश्वासार्ह माहितीमध्ये प्रवेश केल्याने आमच्या वापरकर्त्यांना चांगले परिणाम साध्य करण्यात मदत होते. म्हणून आम्ही अचूक, संबंधित आणि निःपक्षपाती माहिती जेथे आणि जेव्हा आवश्यक असेल तिथे ती प्रदान करतो.

उज्ज्वल भविष्य निर्मिती

जर्मनी आणि भारतात कार्यालये असलेली एक आंतरराष्ट्रीय कंपनी म्हणुन, सर्व स्तरातील आणि विविध सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना समान संधी प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे. प्रगती, कल्पकता आणि प्रामाणिकपणाला महत्त्व देणारी, प्रत्येकजण भरभराट करु शकेल असे वातावरण निर्माण करणार्‍या कार्यस्थळातील संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.

प्रथमत: ग्राहक
ग्राहकाचा आवाज
वापरकर्त्यांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि अपेक्षांवर लक्ष केंद्रित करतो.
लोक केंद्रित
काम आणि स्वतंत्र वेळेचा संतुलन
आम्ही कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन प्रत्येकास कामाच्या दरम्यान आणि नंतरच्या त्यांच्या वेळेचा आनंद घेण्यास प्रोत्साहित करतो.
प्रगतीचे स्तंभ
दूरदर्शीपणा
उद्देशाच्या तीव्र भावनेने आम्ही महत्त्वाकांक्षी आहोत. आम्ही आमच्या प्रयत्नांमध्ये नाविन्यपूर्ण आणि भविष्यवादी असण्याचा निर्धार केला आहे.
नैतिक आचरण
सर्वसमावेशकता
लिंग, धर्म, जात, वंश, आय गट तसेच दिव्यांगतेचा विचार न करता आम्ही सर्वांचे स्वागत करतो आणि समानतेने वागवितो.