आंबा

आंब्याच्या कोयीतील टोका (नट विविल)

Sternochetus mangiferae

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • फळांवर लालसर तपकिरी डागांच्या सभोवताली पाणी शोषल्यासारखे भाग दिसतात.
  • पिवळा घट्ट द्राव ह्या डागातुन झिरपतो.
  • कोयींना छिद्रे पडलेली दिसतात आणि फळांच्या आतील भाग काळा आणि सडलेला दिसतो.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

आंबा

लक्षणे

संक्रमित फळे पटकन ओळखळी जाऊ शकतात कारण सालीवर किड्यांनी केलेल्या जखमा आणि टोचलेले व्रण दिसतात तसेच लालसर तपकिरी डाग येत असून त्यांच्या भोवताली पाणी शोषल्यासारखे भाग स्पष्ट दिसतात. ह्याचा संदर्भ माद्यांनी अंडी घातलेल्या जागेशी आहे. ह्या भागातुन पिवळसर घट्ट द्राव झिरपतो. अळ्या उबुन बाहेर येतात आणि गरातुन छिद्रे पाडीत कोयीपर्यंत पोहोचतात. कोयींवर छिद्रे दिसतात आणि फळाचा आतील भाग काळा होऊन सडतो. क्वचित प्रसंगी, उदाहरणार्थ काही उशीरा-परिपक्व होणाऱ्या वाणात प्रौढ कोयीतुन निघुन गरात सुरंग बनवून बाहेर पडू शकतात. ह्यामुळे फळांच्या सालीवर व्रण रहातात ज्यामुळे दुय्यम लागण आकर्षित होते आणि फळे पूर्णत: सडतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

ओकोफिला स्माराग्डिना नावाच्या मुंगीला प्रौढांच्याविरुद्ध जैव नियंत्रण म्हणुन वापरले जाऊ शकते. फळांचा विकास होण्याच्या विविध टप्प्यांत गरम आणि थंड उपचार केल्याने कीटकांचा निवारण होऊ शकते. काही विषाणूही एस. मँगिफेरेच्या अळ्यांवर परिणाम करतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कार्बाइल, अॅसिफेट किंवा डेल्टामेथ्रिनने जेव्हा फळे साधारण २-४ सें.मी. ची होतात तेव्हा पहिली फवारणी आणि दुसरी १५ दिवसांनंतर केल्यास प्रादुर्भावावर यशस्वीरीत्या नियंत्रण मिळु शकते. कीटनाशके ज्यात थियामेथोक्झॅम आणि फिप्रोनिल आहे अशी औषधांची फवारणी केल्यास सुद्धा एस. मँगिफेरेच्या संक्रमाणाविरुद्ध चांगले परिणाम मिळतात.

कशामुळे झाले

आंब्याच्या कोयीतील टोक्याचे प्रौढ हा अंडाकृती किडा असून त्याचे डोके लांबट असल्याने सोंडेसारखे दिसते. माद्या दुधाळ पांढर्‍या, लंबगोलाकृती असतात आणि ऐकेक अंडे पाडाला लागलेल्या (हिरव्या) किंवा पिकलेल्या आंब्यावर घालतात. सालीवर जिथे प्रादुर्भाव होतो त्या जागेतुन वैशिषट्यपूर्ण रीतीने फिकट तपकिरी द्राव स्त्रवतो. ५-७ दिवसांनंतर १ मि.मी. लांबीच्या अळ्या उबुन बाहेर येतात आणि आंब्याच्या कोयीपर्यंत पोचण्यासाठी गरात बोगदे करतात. बहुधा एक अळी एका कोयीला खाताना दिसते पण क्वचित ५ अळ्याही एकाच कोयीत पाहिल्या गेल्या आहेत. काही अतिदुर्मिळ वेळा अळ्या गर खाताना आणि त्यातच कोष बनवितानाही आढळुन आल्या आहेत. प्रौढ बहुधा फळे गळल्यानंतर बाहेर येतात आणि झाडावर नविन फळे लागेपर्यंत वाढ प्रलंबित होऊन रहातात. जेव्हा आंबे वाटाण्याच्या आकाराचे होतात तेव्हा प्रौढ पुन्हा सक्रिय होतात आणि पानांवर ताव मारायला आणि संभोगाला सुरवात करतात. ह्या किड्यांचा प्रसार दूरवर अळ्या, कोष किंवा प्रौढ असणारी फळे, बियाणे, रोपे आणि/किंवा छाटणी केलेली झाडाच्या सामग्रीतुन होतो.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्रोतांकडील व निरोगी झाडापासून संपादित केलेली कलमे व कोयींचा वापर करा.
  • अळीच्या प्रादुर्भावाला प्रतिरोध करणार्‍या वाणांची निवड करा.
  • कोयींचे टरफल फोडून आतील बियाण्याची तपासणी केल्यास संभाव्य नुकसान टाळले जाऊ शकते.
  • झाडाच्या शेजारच्या जमिनीची नियमितपणे नांगरणी केल्यास जमिनीत लपलेले किडे उघडे पडल्याने शिकारी किडे व पक्षी त्यांना खाऊन त्यांची संख्या कमी करतात.
  • खाली पडलेल्या कोयी आणि गळलेली फळे बागेतून काढून टाका.
  • झाडावरील फळांना कागदाने झाकून घेतल्यास मादीचे फळांवर अंडी घालणे टळते.
  • संक्रमित कोयी किंवा फळे इतर भागात वाहुन नेऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा