सफरचंद

बोरॉनची कमतरता

Boron Deficiency

कमतरता

5 mins to read

थोडक्यात

  • पाने पिवळी आणि जाड होतात.
  • पाने आणि फांद्या ठिसुळ होतात.

मध्ये देखील मिळू शकते

57 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
केळी
अधिक

सफरचंद

लक्षणे

पीक आणि वाढीची परिस्थिती याप्रमाणे लक्षणे बदलतात पण शक्यतो नव्या वाढीवरच पहिल्यांदा दिसतात. कोवळी पाने रंगहीन आणि जाड होणे हे प्राथमिक लक्षण आहेत. पानाच्या शिरांमधील भागात एकसारखा किंवा पसरलेला पिवळेपणा आढळून येतो, जो मुख्य शिरांपासुन दूर जात कमी होत जातो. शेंड्याकडील पाने आणि फांद्या ठिसुळ होतात आणि वाकवल्यास सहज तुटतात. पानावर उंचवटलेले भाग (शिरांमधील भाग थोडा उंचावतो) दिसतात आणि टोक तसेच पानाच्या कडा खालच्या दिशेने वळतात. देठ लहान पडतात, ज्यामुळे शेंड्याजवळ पाने घनदाट असतात. गंभीर प्रकरणात शेंडेमर होते. मुख्य मुळे शक्यतो लहान आणि बोथट असतात आणि जर कमतरता वाढत गेली तर चिरतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

शेणखत वापरुन चांगली सेंद्रिय सामग्री आणि पाणी धरुन ठेवण्याची क्षमता असणारी निरोगी जमिन राखण्याची खात्री करा.

रासायनिक नियंत्रण

  • बोरॉन (बी) ची मात्रा सुधारणारी खते वापरा.
  • उदा.: फवारणीसाठी डायसोडियम ऑक्टाबोरेट टेट्राहायड्रेट (बोरॉन २०%)
  • आपली जमीन आणि पिकासाठी सर्वोत्तम उत्पादन आणि प्रमाण जाणून घेण्यासाठी आपल्या कृषी सल्लागाराचा सल्ला घ्या.

पुढील शिफारशी: आपल्या पिकाचे इष्टतम उत्पादन मिळविण्यासाठी लागवडीचा हंगाम सुरु होण्यापूर्वी माती परीक्षण करण्याची शिफारस करण्यात येते. बोरॉनला जमिनीतून देणे चांगले आहे कारण फवारणीतून दिल्यास बर्‍याच पिकांचे पाने करपण्याची शक्यता जास्त असते.

कशामुळे झाले

बोरॉनची कमतरता सामान्यतः उच्च सामू असलेल्या जमिनीमध्ये आढळते कारण या परिस्थितीमध्ये हे घटक रसायनिक रुपात असतात म्हणुन झाडासाठी उपलब्ध नसतात. ज्या जमिनीत कमी सेंद्रिय घटक (<१.५%) असतात किंवा वालुकामय जमिनी (ज्यातुन पोषके वाहुन जातात) त्यासुद्धा बोरॉनच्या कमतरतेला संवेदनशील असतात. या बाबतीत झाडांना बोरॉन शोषता येत नसल्याने बोरॉन वापरून देखील कमतरता कमी होऊ शकत नाही. पानांवरील लक्षणे नकली कोळी, जस्त किंवा सौम्य लोहाच्या कमतरतेसारखी दिसु शकतात: मुख्य मुळांवर गाठी येणे आणि भेगा पडणे ही सुद्धा मुळात गाठी करणार्‍या सू्त्रकृमींसारखीच किंवा जमिनीतील आर्द्रता फार झपाट्याने बदलत असल्याची लक्षणे आहेत. कॅल्शियम कमतरतेमुळे देखील शेंडा आणि मुळांच्या टोकांची मर होते पण शेंड्याखालील कोवळी पाने जाड होत नाहीत आणि शिरांमधील भागात पिवळेपणा दिसत नाही.


प्रतिबंधक उपाय

  • उच्च सामू आणि चिकण माती, लोह किंवा अल्युमिनम ऑक्साइडसचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनी टाळा.
  • खतांचा अतिरेकी वापर टाळा किंवा चुनखडीचा वापर करु नका.
  • पिकांना जास्त पाणी देणे टाळा.
  • आपल्या जमिनीतील पोषकांची पातळी चांगली समजुन घेण्यासाठी माती परिक्षण नियमितपणे करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा