आंबा

आंब्याची कोय पोखरणारी अळी

Deanolis albizonalis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • कोवळ्या फळांवर काळी आत शिरल्याची छिद्रे दिसतात.
  • फळे फुटतात आणि अकाली गळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

आंबा

लक्षणे

वाटाण्याच्या किंवा लिंबाच्या आकारांच्या फळांवर बारीक काळ्या रंगाची आत शिरल्याची छिद्रे दिसतात, ज्याच्या बाजुने बहुधा गोल, रंगहीन धब्बा लटकलेल्या आंब्याच्या खालच्या टोकाला दिसतो. जेव्हा आंबा लिंबाच्या आकाराचा किंवा त्याहुन मोठा असतो तेव्हा चावलेला गर आणि रस सामग्री ह्या शिरकाव केलेल्या छिद्रातुन बाहेर झिरपत रहाते. पोखरणार्‍या किड्याच्या क्रियाशीलतेमुळे आंब्याचे फळ फुटु शकते. अळ्या मग इतर फळांवर स्थलांतरीत होतात. अळ्यांवर ओळीत लाल आणि पांढरी वर्तुळे असतात आणि डोके आणि मान काळी असते. जशा त्या मोठ्या होतात त्यांचा रंग हिरवट निळा होतो. सुरवातीला त्या गर खातात नंतर कोयही खातात. त्यांच्यामुळे खासकरुन कोवळी फळे अकाली गळतात. जास्त प्रादुर्भाव झालेल्या झाडाखाली शेकड्यांनी कोवळी फळे पडलेली दिसतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

निंबोळी अर्क (अॅझॅडिराकटिन) द्रावण डी. अल्बिझोनालिस विरुद्ध आपण अठवड्याच्या अंतराने फुलधारणे पासुन पुढील २ महिन्यांपर्यंत वापरु शकता. आंब्याच्या कोयीला पोखरणार्‍या किड्यांचे नैसर्गिक शत्रु जसे वॅस्प्स रिचियम अॅट्रीसिमम (जे अळ्या खातात) आणि ट्रायकोग्रामा चिलोनिस आणि ट्रायकोग्रामा चिलोट्री जे आंब्याच्या कोयीला पोखरणार्‍यांची ( किड्यांची अंडी खातात) संख्या अबाधीत ठेवा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. थियाक्लोप्रिड या कीटनाशकाची फवारणी केल्यास कोय पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण परिणामकारकरीत्या होऊ शकते. फेनप्रोपॅथ्रिनवर आधारीत कीटनाशकही परिणामकारक आहे.

कशामुळे झाले

प्रौढ पतंग साध्या राखाडी रंगाचे असतात आणि त्यांचे पंख साधारणपणे १३ मि.मी. लांब असतात. ते बहुधा एका अठवड्यापर्यंत जगतात आणि फळांच्या देठावर फांदीपाशी जोड्यांनी अंडी घालतात. अळ्या नंतर फळांत शिरतात आणि गर तसेच कोयही खातात. सालीमध्ये १-२ सें.मी. खोलीच्या छिद्रात कोष तयार करतात ज्यांना अळ्या चावलेल्या सालीच्या कणांनी बंद करतात ज्यामुळे त्या अदृष्य होतात. १०-१४ दिवसात प्रौढ बाहेर येतात आणि रात्रीच उपाद्रव करत असतात. अळ्या संक्रमित फळांच्या वहनाने पसरतात तर प्रौढ पतंग वेगवेगळ्या बागांमध्ये उडुन जातात.


प्रतिबंधक उपाय

  • स्वच्छ, मान्यताप्राप्त पुरवठादारांकडून प्रमाणित असलेली रोपे निवडा.
  • आपल्या बागेचे ह्या उपद्रवासाठी आणि नेहमीपेक्षा वेगळी लक्षणे खासकरुन फळधारणेच्या काळात दिसतायत का ह्यासाठी वारंवार निरीक्षण करा.
  • संक्रमित झाडांची फळे आणि साल नष्ट करा.
  • बागेभोवती दाट झाडी असणारी झाडे बांधावर लावा ह्यामुळे पतंगांचा आत शिरकाव थांबेल.
  • संक्रमित फळांचे इतर बागेत किंवा इतर भागांमध्ये परिवहन करणे टाळावे.

प्लँटिक्स डाऊनलोड करा