मका

काकडीवरील भुंगे

Diabrotica spp.

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • मुळे आणि फांद्यांवर खाल्याने नुकसान.
  • खोड कमजोर होऊन कोलमड होते.
  • नुकसान संधीसाधु जंतुंना अनुकूल असते.

मध्ये देखील मिळू शकते


मका

लक्षणे

प्रौढ मुख्यत: पाने, स्त्रीकेशर आणि फुले खातात ज्यामुळे परागीकरण आणि दाणे विकसित होण्यात बाधा येते. अळ्या मुळांचे केस, मूळ आणि खोड खातात, ज्यामुळे झाडाची पाणी तसेच पोषके जमिनीतुन शोषण्याची क्षमता कमी होते. मुळांचे टोक पार झाडाच्या बुडापर्यंत चावली जातात किंवा ती तपकिरी दिसतात आणि आत बोगदे केलेले असतात. दुष्काळ किंवा पोषणाच्या कमतरतेसारखीच लक्षणे दिसतात. झाडाच्या वाढीच्या पुढच्या टप्प्यावर, मुळांना झालेल्या नुकसानामुळे खोड कमजोर होते आणि आडवे होऊ शकते ज्यामुळे काढणीत त्रास होतो. अळ्यांनी केलेल्या जखमा संधीसाधु जंतुंना अनुकूल असतात. शिवाय, डायाब्रोटिकाच्या काही प्रजाती मक्यावरील क्लोरोटिक मॉटल व्हायरस आणि जिवाणूजन्य मरच्या जिवाणूचे वाहक आहेत. या उपद्रवामुळे उत्पादनात मोठे नुकसान होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

सूत्रकृमींच्या बरेचशा प्रजाती, भक्षक (कोळी, किडे) आणि परजीवी माशा आणि वॅस्पसना वापरुन यांच्या लोकसंख्येचे नियंत्रण केले जाऊ सकते. उदा. टाचिनिड माशी सेलाटोरिया डायाब्रोटिसेला काकडीवरील भुंग्याची संख्या जास्त नसल्यास शेतात सोडले जाऊ शकते. ब्युव्हारिया बॅसियाना आणि मेटार्हिटझियम अॅनिसोप्लिये बुरशी डायाब्रोटिकाच्या काही प्रजातींवर नैसर्गिक हल्ला करतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. काकडीवरील भुंग्याचे नुकसान करणार्‍या लोकसंख्येचे उपचार कीटनाशकांनी केले जातात. जर भुंग्याची संख्या खूप जास्त असेल तर असेटामिप्रिड किंवा फेंड्रोपाथ्रिनच्या गटातील कीटनाशकांचा वापर करावा, पण पर्यावरणीय मुद्दे ध्यानात ठेवावेत. पायरेथ्रॉइडसने जमिनीचे उपचार करणे हा आणखीन एक पर्याय आहे.

कशामुळे झाले

डायाब्रोटिका प्रजाती हा उपद्रवी किड्यांचा गट आहे जो शेतीतील महत्वाच्या बरेच पिकांना ज्यात फरसबी आणि मकाही येतो, यावर हल्ला करतात. काकडीवरील भुंगे बहुधा पिवळ्या हिरव्या रंगाचे असतात आणि त्यांच्या पैलुंप्रमाणे दोन गटात विभागलेले असतात. पहिल्या गटाच्या भुंग्यावर तीन काळे पट्टे पाठीवर खालच्या बाजुला असतात, तर दुसर्याल गटाच्या भुंग्याच्या पाठीवर वैशिष्ट्यपूर्ण बारा काळे ठिपके असतात. प्रौढ आजुबाजुच्या भागात विश्रांती घेतात आणि वसंत ऋतुच्या मध्यावर जेव्हा तापमान चढु लागते तेव्हा सक्रिय होतात. माद्या यजमान झाडाच्या जवळील जमिनीच्या भेगात पुंजक्यांनी अंडी घालतात. अळ्या पहिल्यांदा मूळ आतुन आणि बाहेरुन खातात, नंतर कोंबही खातात, तर प्रौढ झाडी, परागकण आणि फुले खातात. पर्यावरणीय स्थितींनुसार अंडापासून प्रौढापर्यंतचा विकास होण्यास सुमारे एक महिना लागतो. तापमानात वाढ झाल्यास, विकासाचा वेळ कमी होतो. काकडीवरील भुंग्याना आर्द्र भाग जिथे चांगला पाणी पुरवठा आहे त्या जागा आवडतात आणि गरमी अजिबात सहन होत नाही.


प्रतिबंधक उपाय

  • उशीरा लागवड केल्याने जास्त नुकसान टाळता येते.
  • कलिंगड, डांगर, किंवा शेंगवर्गीय पिकांसारख्या पर्यायी यजमानांजवळ लागवड करणे टाळा.
  • बीटल्सचे जीवनचक्र मोडण्यासाठी जमिनीवर आच्छादन करा.
  • बीटल्सना पळवुन लावण्यासाठी काओलिन क्लेचा संरक्षक थर द्या.
  • सापळे वापरुन किड्यांच्या संख्येचा अंदाज घ्या आणि मोठ्या संख्येने त्यांना पकडा.
  • काढणीनंतर रोपांचे अवशेष काढुन नष्ट करा.
  • यजमान नसलेल्या पिकाबरोबर पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा