इतर

पीचची फांदी पोखरणारा किडा

Anarsia lineatella

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • वसंत ऋतुत मरगळलेली पाने आणि नविन फुटव्यांची मर, हे कोवळ्या रोपात स्पष्ट दिसते.
  • छिद्रे, पोकळ बोगदे किंवा दोन फळांच्या देठाच्या बाजुला पृष्ठभागावरील खळगे किंवा फांदीवर दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

4 पिके
बदाम
जर्दाळू
चेरी
पीच

इतर

लक्षणे

बागेतील उपद्रवाच्या उपस्थितीची पहिली लक्षणे पानांच्या मरगळीतुन दिसते किंवा वसंत ऋतुन नविन कोंबांच्या मरण्यातुन दिसते. पानांत, फुटव्यातील ही मरगळ ठळकपणे कोवळ्या रोपात जास्त दिसते. वर्षांत नंतर, जुन्या फुटव्यांवर आणि फळांवरही नुकसान दिसु शकते. फळांवरील देठाच्या बाजुला, दोन फळांच्या पेरांमध्ये किंवा जिथे पाने फळांना स्पर्श करतात तिथे छिद्रे दिसणे हे विशेष लक्षण आहे. अळ्या पृष्ठभागावर खळगे किंवा उथळ बोगदे करुन खातात. जर लोकसंख्या जास्त झाली तर कोवळ्या रोपांना किंवा रोपवाटिकेतील साठवणीला चांगलेच नुकसान होऊ शकते. फळांवरील पौर्वात्य फळमाशीच्या नुकसानासारखेच असते.

Recommendations

जैविक नियंत्रण

अॅनारशिया लिनेटेलाच्या नैसर्गिक शत्रुंच्या सुमारे ३० प्रजाती माहितीत आहेत. पॅरालितोमॅस्टिक्स वेरिकॉर्निस, हायपेरटेलेस लिव्हिडस आणि मॅक्रोसेन्ट्रस अॅन्सिलिव्होरस नावाचे परजीवी वॅस्पस, पीचच्या काटक्या पोखरणार्‍या अळीवर आपली अंडी घालतात, ज्यामुळे त्या हळुहळु मरतात. मुंग्याही अळ्यांना खातात. ह्या नैसर्गिक शत्रुंमुळे अळ्यांची लोकसंख्या खूप कमी होऊ शकते पण आर्थिक नुकसान सहन करण्याइतकी नाही. म्हणुन सेंद्रिय पद्धतीचे मान्य तेले, पायरेथ्रिन, स्पिनोसॅड किंवा बॅसिलस थुरिंगिएनसिसवर आधारीत कीटनाशकांचा वेळत वापर केल्यास ह्या उपचारांस पूरक आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. १) वाढीव सुप्तावस्थेचा काळ, २) फुलधारणेचा काळ आणि ३) फुलधारणेनंतरचा काळ, ह्या काळात पीचच्या काटकीला पोखरणार्‍या किड्यांसाठी चांगली व्यवस्थापन योजना म्हणजे कीटनाशके वापरुन वेळेत उपचार करणे आहे. मेथॉक्झिफेनोझाइड किंवा डायफ्ल्युबेनझ्युरॉनवर आधारीत मिश्रणे १ ल्या आणि २र्‍या टप्प्यात वापरली जाऊ शकतात. पहिल्याला क्लोरँट्रानिलिप्रोलबरोबरही फुलधारणेच्या नंतरच्या काळात वापरले जाऊ शकते. इतर उत्पादही ह्या प्रकारच्या उपचारांसाठी उपलब्ध आहेत.

कशामुळे झाले

अॅनारशिया लिनेटेला नावाच्या अळीमुळे हे नुकसान उद्भवते, जी पुष्कळशा पिकांच्या झाडांवरील मोठा उपद्रव आहे. प्रौढ पतंगांचे शरीर राखाडीसर ते तपकिरी असुन त्यावर विखुरलेले किंवा पट्टेरी पुढचे पंख असतात. माद्या कोवळ्या फुटव्यावर, फळांवर आणि पानांच्या खाली शिरांच्या बाजुला अंडी घालतात. अळ्या छोट्या असतात, शरीर तपकिरी असुन त्यावर एक सोडुन एक पांढरी वलये असुन डोके काळे असते. सालीखाली, जुन्या लाकडांच्या फटीत किंवा छाटणीच्या जखमात विश्रांती घेतात. फुलधारणेच्या काळात त्या बाहेर येऊन इतर काटक्या आणि फांद्यांवर पसरतात, जिथे त्या नविन उमललेली पाने, फुले आणि फुटव्यांवर हल्ला करतात. कोवळ्या फुटव्यात बोगदे करतात ज्यामुळे पाणी आणि पोषणांचे वहन होत नाही ज्यामुळे ती मरगळतात आणि मर होते. जुन्या फुटव्यांच्या कोंबातही त्या नुकसान करतात ज्यामुळे फांद्यांची मर होते आणि काही वेळा आडव्या फांद्या वाढतात. ह्या किड्यांच्या सुमारे ३-४ पिढ्या प्रतिवर्षी असे जीवनचक्र असते.


प्रतिबंधक उपाय

  • वसंत ऋतुत बागेत उपद्रव आहे का हे पहाण्यासाठी तपासणी करा.
  • फुटव्यांना उघडुन आत अळ्या आहेत का ते पहा.
  • कामगंध सापळे वापरुन पतंगांचे निरीक्षण करा.
  • मित्र किड्यांवर प्रभाव पडु नये म्हणुन कीटनाशकांचा वापर नियंत्रित ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा