इतर

जाड कोळी

Polyphagotarsonemus latus

कोळी

5 mins to read

थोडक्यात

  • पाने, पानांच्या कळ्या, फुळांच्या कळ्या आणि फळे विकृत आणि रंगहीन होतात.
  • वाढ खुंटते.
  • कोंबांची मर होऊ शकते.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

तणनाशकचा गैरवापर आणि पोषकांच्या कमतरतेच्या लक्षणांसारखेच नुकसान दिसते. पाने मुडपतात, जाड आणि तपकिरीसर होतात. फिकट तपकिरी भाग खालच्या बाजुच्या मध्य शीरांच्या मध्ये दिसतो. फुले गळतात आणि कोवळी पाने विकृत असतात. वाढ खुंटलेली असते आणि कोंबांची मर दिसते जेव्हा लोकसंख्या जास्त असते. कोळ्यांनी खाल्ल्याने फळे रुपेरीसर होतात आणि त्यावर फिकट तपकिरी भाग दिसतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

नियोसेयुलस कुकुमेरिस आणि अँम्ब्लिशियस माँटडोरेनसिस सारखे मोठ्या कोळ्याचे नैसर्गिक शत्रु वापरुन संक्रमणानंतर रोगाचे नियंत्रण करण्यासाठी वापर करा. लसणीचे फवारे आणि कीटनाशक साबणही वापरुन पहा. कोवळ्या रोपांवर गरम पाण्याचे (४३ डिग्री सेल्शियस ते ४९ डिग्री सेल्शियस १५ मिनीटांसाठी) उपचार केल्यासही कोळ्यांच्या संक्रमणाचे नियंत्रण करता येते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. खूपच जास्त उपद्रव होत असेल तरच रसायनांचा वापर करा. कोळ्याच्या छोट्या जीवनचक्रामुळे ते लवकर प्रतिकार विकसित करणे संभव आहे म्हणुन कोळ्यांच्या उपद्रवाचे नियंत्रण रसायनिक उपचारांनी करणे कठिण आहे. जर कोळीनाशकाची गरज भासलीच तर अॅबामेक्टिन, स्पिरोमेसिफेन किंवा पायरिडाइन असलेले उत्पाद फवारा.

कशामुळे झाले

मोठे कोळी कोवळ्या पानांना जखमा करतात आणि त्यातुन गळणारा रस पितात. त्याच्या लाळेत रोपाच्या हॉर्मोनसारखे द्रव्य असते ज्यामुळे भाग विकृत होतात. कोळी छोटे असतात आणि भिंगाशिवाय दिसत नाहीत. प्रौढ सुमारे ०.२ मि.मी. लांब आणि अंडाकृती असतात. पिवळा आणि हिरवा ह्या रंगांमधील छटा असतात. प्रौढ माद्या सुमारे ५ अंडी प्रतिदिवशी पानांच्या खालच्या बाजुला किंवा फळांवरील खोलगट भागात घालतात. २-३ दिवसात अळ्या ऊबुन बाहेर येतात. कोळ्यांचा प्रसार फार सावकाश होतो, जोपर्यंत ते कोणत्या किड्याला वाहक बनवत नाहीत किंवा वार्‍याने वाहुन जात नाहीत. ऊबदार आर्द्र हवामान जसे कि हरितगृहात असते, त्यात ते फोफावतात.


प्रतिबंधक उपाय

  • संक्रमित पिकांपासुन वारा वाहण्याच्या दिशेने लागवड करु नका.
  • संक्रमित पिकांजवळ निरोगी पिके लावु नका.
  • लक्षणे दिसणारी रोपे काढुन टाका जेणेकरुन निरोगी झाडांवर संक्रमण होणार नाही.
  • कीटनाशकांचा वापर सीमित करुन नैसर्गिक शिकार्‍यांना प्रोत्साहन द्या.
  • काढणीनंतर रोपांचे अवशेष काढुन नष्ट करा आणि दुसरे पीक लावण्यापूर्वी किमान एक अठवडा तरी थांबा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा