लिंबूवर्गीय

लिंबुवर्गीय पिकांच्या कळ्यांवरील कोळी

Aceria sheldoni

कोळी

5 mins to read

थोडक्यात

  • वाढत्या कोंबाच्या टोकांना तसेच फुलांना नुकसान होते आणि पान, फुल आणि कोवळे कोंब विकृत आकाराचे होतात.
  • फांद्यांवर गुलाबाच्या फुलासारखी पानांची रचना दिसते.
  • झाडाची वाढ खुंटते आणि फळधारणा कमी होते.
  • संक्रमित फळे विकृत आकाराची असतात आणि किंचित पिवळसर ते रुपेरी मलीनता दिसते.
  • सर्व लिंबुवर्गीय प्रजाती प्रभावित होतात, परंतु नुकसान सामान्यतः लिंबांमध्ये खूप वाईट असते.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

जसे त्यांचे नाव आहे त्याप्रमाणे हे कोळी पान आणि फुलांच्या कळ्यांवर हल्ला करतात. फांदीवरील वाढते कोंब आणि फुले वाळत असल्यामुळे पाने, फुले आणि कोवळे कोंब विकृत आकाराचे होतात. फांद्यांवर गुलाबाच्या फुलासारखी पानांची रचना दिसते. झाडाची वाढ खुंटते आणि फळधारणा कमी होते. संक्रमित फळे विकृत आकाराची असतात आणि त्यावर किंचित पिवळसर ते रुपेरी झाक आणि जखमांची छिद्रे दिसतात ज्यामुळे बुरशीच्या संक्रमणास वाव मिळतो. वाढीच्या सुरवातीच्या टप्प्यावरच ती अकाली गळु शकतात. रसाचे प्रमाण आणि प्रत खालवल्यामुळे परिपक्व फळांचे विक्रीमूल्य खूप कमी असते. सर्व लिंबुवर्गीय प्रजाती प्रभावित होतात, परंतु नुकसान सामान्यतः लिंबांमध्ये खूप वाईट असते.

Recommendations

जैविक नियंत्रण

नैसर्गिक शत्रु कळ्यांवरील कोळ्यांचे जास्त नियंत्रण करु शकत नाहीत. भक्षक किडे वापरुन कळ्यांवरील कोळ्यांवर चांगले नियंत्रण मिळविले जाऊ शकते. जैविक कीटकनाशके याच्या संक्रमणाचे व्यवस्थापन करण्यासाठी उत्कृष्ट उपाय असु शकतो. २% तीव्रतेचे गंधकाचे मिश्रण कमी संक्रमण असताना वापरल्यास कळ्यावरील कोळ्यांचे नियंत्रण करण्यात मदत मिळु शकते. ३० अंश सेल्शियसवर तापमान असल्यास वर सांगीतलेले उपचार करु नयेत आणि दोन उपचारांमध्ये किमान ४ अठवड्यांचा अवधी असायला पाहिजे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कळ्यांवरील कोळ्यांमुळे होणारे नुकसान फायटोटॉक्झिक नॅरो रेंजच्या तेलांची फवारणी करुन भरुन काढता येते. अॅब्मेक्टिन, फेनब्युटॅटिन ऑक्साइड, क्लोरपायरिफॉस, स्पिरोटेट्रामॅट, फेनपायरोक्झिमेट किंवा त्यांची संयुगे यावर आधारीत उत्पाद तेलाबरोबर वापरल्यास परिणाम जास्त चांगला मिळतो.

कशामुळे झाले

अॅसेरिया शेल्डोनि नावाच्या लिंबुवर्गीय कळ्यांवरील कोळ्यामुळे लक्षणे उद्भवतात. हे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत पण लिंबुवर्गीय पिकांच्या बागांचे चांगलेच नुकसान करु शकतात आणि पिकाचे उत्पन्नही कमी करु शकतात. भिंगातुन पाहिल्यास बारीक, जंतांच्या आकाराचे, खास फिकट पांढरे किंवा अर्धपारदर्शक किडे कळ्यांवर पाहिले जाऊ शकतात. हिवाळ्याच्या महिन्यात ते कळ्यांच्या पुष्पकोषात रहातात. वसंत ऋतुत जेव्हा हवामान अनुकूल असते तेव्हा माद्या बाहेर येऊन नविन कोंबाच्या कळ्यांच्या पुष्पकोषांवर अंडी घालतात. पिल्ले बाहेर येऊन फांद्यांचे वाढते कोंब अणि फुलांमध्ये रससोषण करतात ज्यामुळे कोवळी पाने, कळ्या आणि कोंब विकृत आकाराचे होतात. परिणामी झाडाची वाढ खुंटते. फळे सुद्धा लहान आणि विकृत आकाराची असतात. ऊबदार कोरड्या हवेत कोळ्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढते आणि या हवामानात जर थोडेसेही संक्रमण झालेले असले तरी गंभीर नुकसान होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • बागेचा फांद्या आणि कोवळ्या कोंबाचे विकृत आकारासाठी नियमित निरीक्षण करा.
  • मित्र किड्यांना जोपासण्यासाठी कीटकनाशकांचा वापर सिमीत ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा