मॅनिओक

अरारुटवरील तपकिरी पट्ट्याचा रोग

CBSV

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • विशिष्ट पिवळे किंवा करपट पट्टे शिरांवर दिसतात जे नंतर एकमेकात मिसळुन मोठे धब्बे तयार होतात.
  • गडद तपकिरी भाग कंदाच्या आत विकसित होतात.
  • रोगाच्या सुरवातीच्या टप्प्यावर तपकिरी डाग काही वेळा कोवळ्या फांद्यावरही दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
मॅनिओक

मॅनिओक

लक्षणे

अरारुटचे वाण आणि हवामान परिस्थितीप्रमाणे रोगाची लक्षणे अत्यंत विभिन्न असतात ज्यामुळे निदान करणे कठिण असते. लवकर दिसणार्‍या लक्षणात येते तपकिरी डाग किंवा पट्टे जे काही वेळा कोवळ्या हिरव्या फांद्यांवर दिसतात. पण जास्तकरुन आणि अधिक स्पष्टपणे ह्याचे वैशिष्ट्यपूर्ण पिवळे किंवा करपट शिरांवरील पट्टे पानांवर दिसतात. पिवळे झालेले भाग नंतर वाढत जाऊन मोठ्या पिवळ्या धब्ब्यात बदलतात. नंतरच्या टप्प्यावर, पूर्ण पानच वाळते आणि पानगळ होते. सामान्यपणे पक्व आणि पक्व होत आलेली पाने प्रभावित होतात पण विकसित होणारी कोवळी पाने प्रभावित होत नाहीत. एकुणच मुळांचा आकार कमी भरतो आणि कंदाच्या आत गडद तपकिरी भाग विकसित होतात. मुळांवरील डाग हे काढणीनंतर पिकाच्या र्‍हासाचे कारण बनतात. पाने आणि/किंवा फांद्यांवरील लक्षणे कंदातील लक्षणांविनाही दिसु शकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

एकदा का जिवाणूंनी झाडावर संक्रमण केले कि मग त्यावर कोणतेही जैविक नियंत्रण उपलब्ध नाही. रोगाचा प्रसार कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कीटनाशकांचा अतिरेकी वापर टाळणे कारण यामुळे मावा, कोळी, पांढरी माशी तसेच सीबीएसव्हीचे सर्व वाहक किडींचे नैसर्गिक भक्षक मारले जातील.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणूजन्य रोगांवर रसायनिक उपचार केले जात नाहीत. तरीही, पांढरी माशी, कोळी आणि मावा सारख्या वाहक किड्यांसाठी कीटकनाशकांचा वापर करुन रोगाच्या घटना कमी केल्या जाऊ शकतात.

कशामुळे झाले

अरारुटवरील तपकिरी पट्टे देणार्‍या विषाणूंमुळे लक्षणे उद्भवतात जे फक्त अरारुटच्या आणि त्याशी संबंधित रबराच्या झाडालाच (सेरा रबर झाड) संक्रमित करतात. सीबीएसव्हीचे वहन कोळी आणि माव्याद्वारे तसेच पांढरी माशी बेमिसिया टॅबासिद्वारे केले जाते. तरीही रोग प्रसाराचा प्रमुख मार्ग हा संक्रमित कलमांचे वहन मानवांद्वारे होणे आणि शेतात स्वच्छता न राखणे हाच आहे, उदा. शेती उपकरणांचा वापर. अरारुटची विविध वाणे संक्रमणास विविध पद्धतीने संवेदनशील असतात आणि प्रतिक्रिया देतात. कोणत्या भागात संक्रमण झाले आणि हवामान परिस्थितीप्रमाणे १८-७०% उत्पन्नाचे नुकसान होऊ शकते. संक्रमित स्थानावरुन संक्रमित कलमांचे वहन निरोगी भागात करण्यावर बंधन घालणे आवश्यक आहे.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोतांकडुन विषाणुमुक्त लागवड सामग्री घ्या.
  • सीबीएसव्हीला प्रतिकारक किंवा सहनशील मानल्या गेलेल्या वाणांची लागवड करा.
  • अरारुटाच्या वाढीत पहिले ३ महिने दर अठवड्याला शेताचे निरीक्षण करीत चला आणि रोगट किंवा विकृत झाडे काढुन टाका.
  • रोगट काढलेली झाडे लगेच पुरुन किंवा जाळुन नष्ट करा.
  • शेतात तण राहू देऊ नका कारण त्यामुळे सीबीएसव्हीचे वहन करणार्‍या अनेक किडींना टाळता येईल.
  • विविध शेतात काम करताना शेती उपकरणे निर्जंतुक करुन वापरा.
  • कलमे नविन शेतात किंवा भागात नेऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा