मॅनिओक

अरारुटच्या पानांवरील पांढरे ठिपके

Passalora manihotis

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानाच्या वरच्या बाजुला पांढरे ठिपके येतात.
  • सभोवताली अनियमित लालसर रेषा आणि पिवळी प्रभावळ असते.
  • राखाडी केंद्रे पानाच्या खालच्या बाजुला दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
मॅनिओक

मॅनिओक

लक्षणे

वाण आणि हवामान परिस्थितीवर लक्षणे अवलंबुन असतात. बहुधा जुन्या पानांवर नुकसान फार असते आणि कोवळ्या पानांपर्यंत कमी होत जाते. खोलगट, पांढरे, कोनाकृती किंवा गोलाकार ठिपके पानांच्या वरच्या बाजुला येतात जे बहुधा लालसर रेषेने वेढलेले असतात आणि मोठी पिवळी प्रभावळ असते. पानाच्या खालच्या बाजुच्या पातळ सालीवर हे ठिपके अंधुक रंगाच्या कडेने दर्शिविले जातात. जशी बुरशी वाढते आणि लक्षणे विकसित होतात, तसे हे ठिपके राखाडी, मखमली होतात जे खासकरुन आर्द्र हवामानात स्पष्ट दिसतात. हा रोग सामान्यपणे आर्द्र पण थंड हवामानातील अरारुट लागवडींवर दिसतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजपर्यंत, या बुरशीच्या प्रसाराचे नियंत्रण करण्याचे जैविक उपाय उपलब्ध नाहीत. रोग टाळण्यासाठी रोगमुक्त लागवड सामग्री वापरणे आणि उचित प्रतिबंधक उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. थायोफेनेट (०.२०%), क्लोरथॅलोनिल असलेल्या बुरशीनाशकांचा महिन्याच्या अंतराने वापर केल्यास अरारुटच्या पानांवरील पांढर्‍या ठिपक्यांचे नियंत्रण प्रभावीपणे केले जाऊ शकते. कॉपर बुरशीनाशके, मेटालॅक्झिल आणि मँकोझेबचीही शिफारस केली जाते. तणनाशकांचा वापर शेतातील तण नियंत्रणासाठी केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

फेयोरामुलारिया मानिहोटिस नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात जी कोरड्या हंगामात जमिनीवर गळलेल्या, झाडाच्या जुन्या संक्रमित पानांत रहाते. अनुकूल हवामान परिस्थितीत ही पानाच्या खालच्या बाजुच्या वाळलेल्या भागात बीजाणू तयार करते. तिथुन तिचे बीजाणू नविन झाडांवर वार्‍याने किंवा पावसाच्या उडणार्‍या पाण्याने पसरतात. निरोगी झाडाच्या पानावरील नैसर्गिक छिद्रातुन बीजाणू आत प्रवेश करतात आणि हळुहळु झाडात वस्ती करतात, ज्यामुळे लक्षणे दिसु लागतात. जास्त लांब अंतरावर हिचा प्रसार तेव्हा होतो जेव्हा रोगट झाडांची सामग्री इतर शेतात किंवा बागेत नेली जाते. काही तणही पर्यायी यजमानाचे काम करतात. हे बहुधा अरारुटच्या झाडासाठी हानीकारक नसतात आणि जर संक्रमण गंभीर नसेल तर उत्पन्नावर फारसा परिणाम होत नाही. तरीही, थंड आणि आर्द्र, पावसाळी हवा ही बुरशीच्या जीवनचक्रास अनुकूल असते आणि रोगाची गंभीरता त्यामुळे वाढु शकते.


प्रतिबंधक उपाय

  • रोगमुक्त कलमेच वापरा.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • झाडीत हवा खेळण्यासाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • ओल्या हंगामात लवकर लागवड करा म्हणजे संवेदनशील टप्प्यापूर्वीच (कोरड्या हंगामात ६-८ महिने वयाची झाड) पिकाला जोम धरेल.
  • रोग होऊ शकणार्‍या संभवित जुन्या अरारुट पिकाशेजारीच नवी लागवड टाळा.
  • संक्रमणाचा स्त्रोत नाहीसा करण्यासाठी अरारुटची गळलेली पाने गोळा करुन जाळा.
  • किंवा संक्रमित झाड खोल गाडुन अथवा जाळुन टाका.
  • अरारुटच्या लागवडीसाठी वापरलेल्या उपकरणांची स्वच्छता चांगली राखा.
  • झाडांची सामग्री संभवित संक्रमित भागातुन दुसर्‍या भागात नेऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा